NIFTY WEEKLY PREDICTION 5-9 APR | निफ्टी विकली प्रेडीक्शन ५-९ एप्रिल

NIFTY WEEKLY PREDICTION 5-9 APR | निफ्टी विकली प्रेडीक्शन ५-९ एप्रिल  

                    आपण ही नवीन सिरीज सुरू करत आहोत. या अगोदरचा विकली अंदाज आढावा ( OVERVIEW ) आपण टेलिग्राम चैनल वरती पोस्ट केला होता. तो तुम्ही तिथे पाहू शकता  हा निफ्टीचा विकली अंदाज विषयीचा आढावा  वाचण्याच्या, अगोदर एक महत्त्वाची सूचना ज्यांना शेअर मार्केट विषयीच्या बेसिक गोष्टी जसे शॉर्ट फॉर्म आणि  मार्केटमधी काही शब्दांचा  अर्थ माहित नसतील त्यांनी अगोदर ते माहीत करून घ्यावेत. कारण यामध्ये ढोबळ मानाने वापरले जाणारे शब्द वापरूनच त्यानुसारच अंदाज मांडण्यात आलेला आहे. मार्केटमध्ये नवीन असणाऱ्या लोकांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा इथे त्यांचे विश्लेषण दिलेले नाही. टेक्निकल एनालिसिस म्हणजे काय ते कसं काम करत निर्देशांक सपोर्ट आणि रेसिस्टन्स काढताना त्याचा कसा उपयोग होतो. टेक्निकल इंडिकेटर्स काय हे अगोदर जाणून घ्या म्हणजे हे समजायला सोप्प जाईल. तसेच काही अर्थ समजण्यासाठी फंडामेंटल एनालिसिस पण थोडे फार माहित असायला हवे.  



शेअर मार्केट २०२०-२१ आढावा 

                                   2021- 22 या आर्थिक वर्षाचा हा पहिला आठवडा आहे. याविषयी चर्चा करणे अगोदर आपण मागील आर्थिक वर्ष २०२०-२१ विषयी काही महत्त्वाचे फॅक्ट्स जाणून घेऊ २०२०-२१ हे मार्केटच्या इतिहासातील सर्वाधिक उलथापालथ पाहिलेल्या वर्षांपैकी एक आहे.  याठिकाणी जास्त खोलात जाऊन माहिती न देता फक्त या वर्षातील परतावा तेवढा उदाहरणादाखल देत आहे 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये निफ्टी या निर्देशांकाने जवळजवळ 70 टक्के परतावा दिलेला आहे. सेंसेक्स ( SENSEX ) ने ६८%,  तर त्याचबरोबर बँक निफ्टी ( BANK NIFTY ) ने 74% ,  स्मॉलकॅप ( SMALLCAP )  102 टक्के , तर मींडकॅपने तब्बल (MIDCAP )  १२५ % असा भरभक्कम परतावा या आर्थिक वर्षात मिळालेला आहे. हे एक अपवादात्मक वर्ष होते त्यामुळे प्रत्येक वर्षी असा परतावा मिळण्याची अपेक्षा करणे योग्य नाही.  जर कोणी नवीन ट्रेडर्स या अपेक्षेने  मार्केटमध्ये सुरुवात करत असाल तर वेळीच सावध झालेले बरं. त्यासाठी एकदा मागील ५-१० वर्षाचा परतावा पाहून घ्या तो इथे देत नाही. आणि शेअरबाजार विषयी बेसिक माहिती मिळवुनच मार्केट मध्ये पाऊल ठेवा.

5 एप्रिल ते नऊ एप्रिल या आठवड्यासाठी मार्केट विषयी काही महत्त्वाच्या बाबी

  1. मार्केटचा विक्स ( VIX )  19. 99 आहे. याचा अर्थ मार्केट मधील चढ उतार जास्त असणार नाही. 
  2.  निफ्टी चा पीई ( PE )  33.6 आहे.  मार्चमध्ये मार्केटमध्ये जे करेक्शन म्हणजे मार्केट खाली पडणे झाले त्यामुळे पीई  40 वरून एवढा खाली आलेला आहे.  ३० आसपास असणारा पीई हा  मार्केट साठी फायद्याची गोष्ट आहे त्यामुळे मार्केट इथून वरच्या दिशेने जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
  3.  यु एस १० इयर बॉण्ड सध्या १.७१४ आहे.  हे थोडे चिंतेचे कारण असू शकते परंतु मार्केटला याविषयी अगोदरच अंदाज असल्याकारणाने मार्केट यावरती जास्त नेगेटिव्ह / खराब रिऍक्ट होतील असे वाटत नाही. हे बॉण्ड अचानक खूप वाढल्या शिवाय परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बॉण्ड  दोन च्या वरती जात नाही तोपर्यंत जास्त काळजी करण्याचे कारण नाही 
  4. निफ्टीचा पुट कॉल रेशो / पीसीआर ( PCR ) हा विकली म्हणजे 5 एप्रिल ते ९ एप्रिल या आठवड्यासाठी    ०.८३  तर एप्रिल सिरीज  साठी १.६६ एवढा आहे. 
  5.   कालच्या आकडेवारीनुसार कोरोनाचे दिवसाला  रुग्णसंख्या 100000 च्या वरती आपण पोहोचलो आहे.  मार्केट साठी हे एक चिंतेचे कारण असू शकते परंतु रुग्ण संख्येच्या तुलनेत होणारे लसीकरण, आणि जगात सध्यातरी कोठेही पूर्णतः लॉकडाऊन लावण्याची नसलेले शक्यता यामुळे  मार्केट कोविड वरती  जास्त निगेटिव्ह रिऍक्ट  करण्याची शक्यता नाही. 
  6. आरबीआयची (RBI )  मॉनिटरी पॉलिसीची बैठक ५ ते ७ एप्रिल च्या दरम्यान होणार आहे.  ही एक मार्केट साठी महत्वाची बातमी ठरू शकते.  परंतु सध्याची परिस्थिती पाहता अर्थव्यवस्थेवरती काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल असे निर्णय घेण्याची शक्यता फार कमी आहे. पण लक्ष असु द्या . 
  7. मार्चमधील जीएसटी (GST )  कलेक्शन १.२३ लाख करोड हे आतापर्यंतचे विक्रमी कलेक्शन झालेले आहे त्याचाही इम्पॅक्ट एप्रिल सिरीज वरती दिसू शकतो
  8.  रिलायन्स इंडस्ट्रीज  हा निफ्टी मध्ये सर्वात जास्त भाग असलेला स्टॉक आहे रिलायन्स मध्ये खूप दिवसापासून एका रेंज मध्ये व्यवहार चालू आहे.  टेक्निकल पाहता तो त्याच्या सर्वोच्च स्तराकडे जाण्याची शक्यता निर्माण झाले आहे.  त्यामुळे निफ्टी ला वरती जाण्यासाठी रिलायन्स ची मदत होऊ शकते. 
  9.  निफ्टी सध्याला 14867 वरती बंद आहे तर निफ्टीचा फ्युचर । NIFTY FUT APR  हा 14936 वरती बंद आहे त्यामुळे जवळ- जवळ 70 पॉईंट अधिकचा प्रीमियम आहे,  हा मार्केट वरती जाण्याचा / तेजीचा  एक संकेत आहे. 
  10.  सध्याला सर्व ग्लोबल मार्केट टेक्निकली तेजीच्या मार्केटमध्ये आहे.  त्यामुळे ग्लोबल मार्केट चे संकेत ही निफ्टी साठी पॉझिटिव्ह आहेत आणि निफ्टी मध्ये तेजी होईल हेच दर्शवितात
  11.  एफआयआय । FII  आणि डीआयआय ।DII चे  आकडे पाहता FII  ने मार्चमध्ये १२45 करोडची खरेदी केली आहे.  तर DII नेही गेल्या पाच महिन्यातील प्रथमच 5204 करोडची खरेदी केली आहे.  इथे समजून घेण्याची एक महत्त्वाची बाब म्हणजे DII म्हणजेच म्युचल फंड तीन महिन्यापेक्षा जास्त कॅश जवळ ठेवू शकत नाही,  त्यामुळे त्यांना खरेदी करणे अनिवार्य आहे सध्या मार्केटमध्ये FII  जरी विक्री केली तरी DII हे  खरेदी करत राहतील याचाच अर्थ असा की मार्केट खालच्या दिशेने जायला लागले तरी या खरेदीचा  मार्केटला आधार मिळू शकतो.  जास्तीत जास्त असे घडू शकते कि एफ आय आय ची विक्री आणि डी आय आय  ची खरेदी यामुळे मार्केट एक रेंज मध्ये काम करू शकते.  मार्केटमध्ये नवीन असणाऱ्यांनी हे डीआयआय आणि एफआयआय मधील उंदरा मांजराचा खेळ समजून घेतला तर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं थोडं सोप्प होईल. 

मार्केटमधील 5 एप्रिल ते ९ एप्रिल या आठवड्यात रेंज काय असू शकते ?

       NIFTY 50 | निफ्टी ५०     

                     निफ्टीचा बंद भाव आहे 14867 निफ्टी चा पहिला रेजिस्टन्स 14950 परंतु सध्याची परिस्थिती आणि एसजीएक्स (SGX )  भाव पाहता सोमवारीच निफ्टि येथे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पहिले टार्गेट 15150 हे असेल त्यावरती टिकून राहण्यात निफ्टी यशस्वी झाली आणि  तेजी चालू राहिली तर दुसरे टार्गेट१५३००/३५० ते  निफ्टी तिचा सर्वोच्च स्तर या ठिकाणी जाऊ शकते म्हणजे निफ्टी मध्ये वरच्या बाजूला तीन ते सव्वातीन टक्केची तेजी  येऊ शकते.  आता सपोर्ट पाहता निफ्टी चा पहिला सपोर्ट 14631 ते 14600  या ठिकाणी आहे तो ब्रेक होण्याची शक्यता कमी आहे आणि ब्रेक झालाच तर 14400 या ठिकाणी निफ्टी जाऊ शकते. 

NIFTY RANGE 14600 TO 15300 
NIFTY BUYER TARGET 14950/ 15150/15300 STOPLOSS 14630/14600 


BANKNIFTY | बॅंकनिफ्टी 

                                  बँक निफ्टी विषयी विकली पीसीआर । PCR  हा ०.८७  आहे.  तर मंथली पीसीआर 0.9 आहे.  बँक निफ्टी मध्येही जवळजवळ 300 पॉईंट चा प्रीमियम आहे बँक निफ्टी चा बंद भाव 33858 आहे. बॅंकनिफ्टी ला  34000 या लेवल ला  एक मोठा रेजिस्टन्स आहे.  जर तो ब्रेक झाला आणि तो ब्रेक होण्याची शक्यता जास्त आहे,  तर बँक निफ्टी चे पहिले टार्गेट 34500 हे असेल आणि सेकंड टारगेट साठी 34500 वरती एक दिवस बंद झाले तर ३५१५०/२००  हे टार्गेट असू शकते.  आता बँक निफ्टी ची निगेटिव्ह मोमेंट किती होऊ शकते हे जाणून घेऊ पहिला सपोर्ट 33500 या ठिकाणी आहे. जर बँक निफ्टी त्या खाली जाऊन ट्रेड करू लागले तर 33150 ते 33000 या ठिकाणी बँक निफ्टी सपोर्ट घेऊ शकते.

BANKNIFTY RANGE - 33000 TO 35200 

         वरील गोष्टी समजून घेताना एक लक्षात आले असेल की निफ्टी ही  बँक निफ्टी पेक्षा जास्त मजबूत आहे.  या आठवड्यात ट्रेड करताना आपला अंदाज जरी तेजीचा असला आणि डेली बेसेस वरती जर  सेल जनरेट होत असेल तर त्या पद्धतीने ट्रेड करावा.  परंतु आपण ट्रेंडच्या विरुद्ध ट्रेड करत असल्याने लॉट साइज कमी करून आपला रिस्क रिवॉर्ड रेशो लक्षात घेऊन ट्रेड करावा. 

मार्केट ची दिशा बदलू शकणारे घटक ;

  1.  अमेरिकन 10 इयर बॉण्ड  जर २ च्या  वरती जात असेल तर सावध ट्रेड करा मार्केट मध्ये नफा वसुली येऊ शकते.  
  2. डॉलर इंडेक्स सध्या 93 वरती आहे जर तो अचानक वाढत असेल. 
  3. जो बाईडन यांनी जबरदस्तीने कार्पोरेट टॅक्स जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला. 
  4. कोविड च्या केसेस खूपच प्रमाणात वाढायला लागले. 
                    या चार गोष्टींवर ती लक्ष असू द्या त्या मार्केट वरती निगेटिव्ह इम्पॅक्ट करू शकतात.  तरीपण मार्केट एकदमच पडण्याची म्हणजेच खूप मोठा डाऊनफॉल  येण्याची शक्यता कमी आहे. 

DISCLAIMER :  वरील सर्व एनालिसिस दिसणार्‍या डेटा वरून केलेले आहे मार्केटमध्ये चढ-उतार होऊ शकतात त्यामुळे खरेदी किंवा विक्री करताना तुमच्या फायनान्शिअल ॲडव्हायझर चा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. 

जर मार्केटमध्ये मध्येच काही बदल लक्षात आला किंवा वरतीचे  टारगेट लक्षात आले तर आपल्या TELEGRAM चैनल वरती अपडेट केले जाईल. ज्यांना काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या सुचना किंवा शंका विचारल्या तर चालतील. सर्वांच्या कमेंटचे स्वागत आहे. 

3 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने