Share market basic information in marathi | शेेेेअर बाजाराची बेसिक माहिती मराठीत -2021

 Share market basic information in marathi |  शेेेेअर बाजाराची बेसिक माहिती मराठी मधे

                                                 अगोदरच्या भेटीमध्ये SHARE MARKET RULES IN MARATHI आपण शेअर बाजार विषयी काही ढोबळ गोष्टी विषयी चर्चा केलेलीच आहे. शेअर बाजाराविषयी बऱ्याच बाबी आपण ऐकलेल्या असतात , इंटरनेट, tv इतर ठिकाणी पाहिलेल्या असतात पण योग्य माहिती नसल्या कारणाने आपला गोंधळच जास्त उडालेला असतो आणि ऐकीव माहिती मुळे एकतर शेअर बाजार हा जुगार आहे ? किंवा अगदी यामध्ये रातोरात मालामाल होता येते.  या दोन टोकाच्या भूमिका आपण बनवून घेतो पण खरं तर मार्केट याच्या मधे कुठेतरी आहे. चला तर मग ते नक्की कुठे असू शकते त्याचा आढावा घेऊ या 

शेअर  या इंग्रजी शब्दाचा अर्थ भाग किंवा अंश असा होतो . शेअर बाजारात याचा योग्य अर्थ " कंपनीच्या भांडवलाचा भाग " असा आहे . आता हा भागच आपल्याला संपूर्ण बाजार उलगडून दाखवणार आहे



HISTORY OF SHARE MARKET:- इतिहास शेेेेअर बाजाराचा:-

                                                   BSE ( BOMBAY STOCK EXCHANGE ) हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे याची स्थापना १८७५ मध्ये झाली आहे. SENSEX हा BSE चा INDEX आहे.  दुसरा आणि महत्वाचा स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE ( NATIONAL STOCK EXCHANGE ) याची स्थापना १९९२ मधे झाली. NIFTY हा NSE चा INDEX आहे . संपूर्ण बाजाराला नियंत्रित करण्यासाठी एक संस्था आहे आणि ती म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ( SEBI ) याचीही स्थापना १९९२ मध्ये झाली .  ही  झाली बेसिक माहिती , चला तर जाणून घेऊ स्टॉक मार्केट काय आहे SHARE MARKET ALL INFORMATION IN MARATHI ? यामध्ये आपण महत्वाची सर्व माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हाला मार्केट समजून घेण्यास आणि नफा कमावण्यास त्याचा उपयोग होईल . 

शेअर मार्केट म्हणजे काय ? |WHAT IS SHARE MARKET IN MARATHI ?

शेअर बाजारातील कंपनीत असलेल्या आपल्या भागाला आपण SHARE  म्हणू शकतो . उदा - समजा एका कंपनीचे बाजारात १०० शेअर्स आहेत आणि "अ" ने त्या कंपनीचे २० शेअर् खरेदी केले तर अ  चा त्या कंपनीतील हिस्सा २०% झाला .  अ  हा हिस्सा विकू शकतो किंवा अजून काही शेअर खरेदी करून तो वाढवूही शकतो. व्यक्ती जवळ असणारे STOCKS त्या व्यक्तीचा हिस्सा दर्शवितात. कंपन्यांच्या शेअर्स किंवा STOCKS चे मूल्य BSE  आणि NSE वर नोंदविलेले असतात. कंपनीची  कामगिरी व  नफा - तोटा यानुसार शेअर्स / STOCKS च्या किमती मधे चढ - उतार होतात . अजूनही काही घटक या चढ उताराला कारणीभूत असू शकतात त्याविषयी आपण नंतर माहिती घेऊ . 

शेअर मार्केट मधे कोणती कंपनी येऊ शकते ?

SEBI कडून परवानगी मिळाल्या शिवाय कोणतीही कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध होऊ शकत नाही . सेबी च्या परवानगी नंतर च एखादी कंपनी आपली INITIAL  PUBLIC OFFER ( IPO ) जाहीर करू शकते. * २०२० हे वर्ष IPO साठी सुवर्ण काळ ठरलय हे लक्षात असू द्या बरं * STOCK मार्केट मध्ये सूचिबद्ध होण्यासाठी , कंपनीला एक्सचेंजशी अनेक लेखी करार करावे लागतात. त्याअंतर्गत कंपनीला वेळोवेळी आपल्या कार्याची माहिती सेबी ला द्यावी लागते. कंपनीचे मूल्यांकन त्या माहितीच्या आधारे केले जाते . जर एखादी कंपनी नियमांचे पालन करत नसेल तर सेबी तिला एक्सचेंज वरून काडून टाकू शकते. कंपनी ला मार्केट मध्ये लिस्ट ( दिसण्यासाठी ) खालील काही निकष पूर्ण करावे लागतात .

 ELIGIBILITY CRITERIA FOR IPO :

  • मागील ३ वर्षात कंपनीची निव्वळ किंमत ( NET WORTH ) ३cr  पाहिजे . 
  • मागील ५ पैकी किमान ३ वर्षात निव्वळ नफा १५cr  असावा. 
  • IPO  ची किंमत कंपनीच्या किमतीच्या ५ पटी पेक्षा जास्त नसावी 
  कंपनी LISTING नंतर ही काही कडक नियमांचे पालन करावे लागते. 

   शेअर्स चे प्रकार :-

                      शेअर्स चे असे काही प्रकाराची कोठे काही व्याख्या केलेली नाही पण समजण्यासाठी आपण साधारण तीन प्रकारचे शेअर्स समजून घेणार आहोत. 

१) PREFERRED SHARE :- काही विशिष्ट लोकांसाठी या प्रकारचे शेअर्स राखीव असतात जसे कि कंपनीतील कामगार . पैसा उभा करण्यासाठी कंपनी काही प्रमाणात हे शेअर्स बाजारात आणते आणि ते खरेदी करण्याची मुभा फक्त काही विशिष्ट लोकांनाच असते. 

२) COMMON SHARE :- हे सर्वात सामान्य प्रकारचे शेअर्स असतात यामध्ये कोणीही खरेदी विक्री करू शकते. 

३) BONUS SHARE :-  कंपनी आपल्या नफ्या मधील काही भाग म्हणून  आपल्या शेअर्स धारकांना पैसे ऐवजी अजून काही शेअर्स देते. हे शेअर्स मिळण्यासाठी  आगोदर ज्यांच्याजवळ त्या कंपनीचे शेअर्स आहेत ते च फक्त पात्र असतात. 

स्टॉकची खरेदी :-

 NSE किंवा BSE वर स्टॉक खरेदी करण्यासाठी तुम्हाला अगोदर चांगले  BROKER निवडून खाते उघडायला लागेल त्याला DMAT असे म्हणतात . BROKER यासाठी तुमच्याकडून काही फी आकारेल. आता तुम्ही जे STOCKS खरेदी करतात ते तुमच्या DMAT  अकाउंट मध्ये येतील. हे खाते तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असेल त्यामुळे तुम्ही बँक खात्यात पैसे काढू शकता. आपल्याला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही UPSTOX  मध्ये DMAT खाते घेऊ शकता. - UPSTOX ACCOUNT साठी CLICK करा 

TRADING IN SHARE MARKET । शेअर मार्केट मधे ट्रेडिंग 

                                        आज काल ट्रेडिंग हा शब्द शेअर मार्केट चा पर्यायी म्हणूनच जास्त चलनात आहे. पण या दोन्ही वेगवेगळ्या  संकल्पना आहेत. TRADE । ट्रेड  चा साधा सरळ अर्थ आहे देवाण घेवाण आता शेअर मार्केट मधील ट्रेडिंग म्हणजे स्टॉक ची खरेदी विक्री.  हा व्यवहार  अल्प काळासाठी किंवा दीर्घ मुदतीसाठी ही असू शकतो. आणि या कालावधीच्या आधारेच ट्रेडिंगचे काही प्रकार आहेत ते समजून घेणे महत्वाचे आहे. स्टॉक काही कालावधी साठी विकत घेऊन त्याची किंमत वाढली कि तो विकून नफा कमविणे याला PROFIT BOOKING म्हणतात.  

TRADING । ट्रेडिंगचे प्रकार 

  • इंट्रा डे  ( INTRADAY TRADING )  :- यामधे खरेदी केलेले  शेअर्स त्याच दिवशी  मार्केट बंद होण्याच्या आगोदर विकले जातात. हा लोकांच्या सर्वात आवडीचा प्रकार आहे , या प्रकारात  जास्त जोखीम असते. आणि तसाच परतावा ही जास्तच असतो आणि ब्रोकर नुसार तुम्हाला MARGIN हि मिळू शकते . पण हा प्रकार नवीन अनुभवहीन लोकांसाठी नाही त्यासाठी खूप अभ्यास आणि मार्केटची समज हवी.


  • SCALPER TRADING ।  स्काल्पर ट्रेडिंग  : एखादी अचानक बातमी किंवा घटना यावेळेस मार्केट मध्ये वेगाने होणाऱ्या चढ उताराच्या वेळेस अश्या प्रकारे TRADING केलं जातं. यामध्ये १०- १५ मिनिटात खरेदी आणि विक्रीचा पूर्ण व्यवहार होतो. हा सर्वात जोखिमेचा प्रकार आहे . यामध्ये व्यवहार शक्यतो टाळावेच 


  • स्विंग ( SWING TRADING ):- यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार काही दिवस , आठवडे किंवा महिन्यात पूर्ण केला जातो. यात जोखीम कमी प्रमाणात असते ज्यांना TRADER बनायचं आहे आणि मार्केट मध्ये जास्त काळ टिकून राहायचं असेल त्यांनी स्विंग ट्रेड पासून सुरवात करावी हे माझे मत आहे.


  • लॉँग टर्म ( LONG TERM TRADING ) - शेअर्स विकत घेऊन ते दीर्घ काळापर्यंत आपल्या जवळ ठेवले जातात खर तर  याला ट्रेडिंग पेक्षा गुंतवणूक म्हणणे जास्त योग्य ठरेल . यामध्ये जोखीम सर्वात कमी असते . प्रत्येक ट्रेडर चे अंतिम लक्ष हे गुंतवणूकदार बनणे हेच असायला हवे. 
स्टॉक मार्केट तस तर खूप धोकादायक मानले जाते खास करून मराठी माणूस यापासून अंतर ठेवणेच पसंत करतो. यामध्ये धोका तर नक्कीच आहे पण याचा अर्थ असा नाही कि यामध्ये आपण येऊच नये. मराठी माणसाने हि नक्कीच हे क्षेत्र हि पादाक्रांत करायला हवे पण योग्य अभ्यास करूनच .... 

अजून माहिती हवी असल्यास आणि ट्रेडिंग आइडीया साठी आमचा telegram channel subscribe करु शकता..




9 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने