BEST INTRADAY TECHNICAL INDICATORS | बेस्ट इंट्राडे टेक्निकल इंडिकेटर

TECHNICAL INDICATORS । टेक्निकल इंडिकेटर्स - भाग २ 

                               यामागील टेक्निकल इंडिकेटर भाग १ यात  आपण मूव्हींग एवरेजेस , MACD (  एम ए सी डी )  आणि V-WAP  विषयी माहिती घेतली. या भागामध्ये आपण उर्वरित इंडिकेटर्स चा आढावा घेणार आहे . ज्यांनी कोणी अगोदरचे इंडिकेटर्स आणि टेक्निकल आनालयसिस विषयी लेख अभ्यासले नाहीत त्यांनी अगोदर ते पाहावेत म्हणजे हे समजायला सोप्प होईल . 




RSI | आर एस आय -  रिलेटीव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स 


         एखाद्या शेअरच्या किंमतीचा ट्रेन्ड ठरविताना "ट्रेडींग वोल्युम" फार महत्वाचे असतात-जसे कि साधारणपणे अपट्रेन्ड सुरू असताना वोल्युमही चांगला असेल तर तो अपट्रेन्ड टिकाऊ असतो, याऊलट डाऊनट्रेन्डमध्ये जास्त वोल्युम असतील तर डाऊनट्रेन्डही अधिक काळ चालू शकतो इ.

      याचा येथे पुन्हा उल्लेख यासाठी करण्यात येतोय  कि आपण यापूर्वी  मूव्हींग एवरेजेस या संकल्पनेमध्ये वोल्युम विचारात घेतलेले नसल्याने ट्रेन्ड आणि ट्रेन्ड-रिवर्सल सिग्नलच्या अचूकतेवर मर्यादा येतात. म्हणूनच आणखी काही इंडीकेटर्स (कि ज्यात वोल्युमही विचारात घेतले जातात) मूव्हींग एवरेजसह वापरून अधिक अचूक सिग्नल मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

           अशांपैकी रिलेटीव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स बाबत येथे माहिती घेऊया.हे  इंडीकेटर एका ठराविक रेन्जमध्ये फिरत असल्याने त्यांना ओसिलेटर्स म्हटले जाते. हे इंडीकेटर कसे तयार केले किंवा त्याचे मोजमाप कसे करतात तर 

RSI = 100-[100 / 1+RS]

RS = AVERAGE GAIN / AVERAGE LOSS    

त्याची माहिती असणे ट्रेडींगसाठी आवश्यक नसून त्याचा वापर कसा करतात हे समजणे महत्वाचे आहे. हल्ली इंटरनेटवर ओनलाईन चार्टींग सेवा सहज उपलब्ध असल्याने (जास्त खोलात जाता) आपण हे "रेडीमेड" इंडीकेटर्स आपल्या ट्रेडींग सेट-अप मध्ये वापरू शकतो.



RSI कसे काम करते ?

                   रिलेटीव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स हा (RSI)  ० ते १०० या रेंजमध्ये तो फिरत असतो. हा १०० च्या वरती आणि ० च्या खाली जात नाही. महत्वाचे ३ स्तर असतात  ३० , ५० , ७०. RSI मधील ५० ते १०० च्या झोन ला बुलिश झोन तर ० ते ५० ला बेरिश झोन समजले जाते.  RSI  ची किंमत ७० च्यावर गेली तर संबंधित शेअर हा Overbought किंवा महाग झाला असे समजतात, आणि ३० च्या खाली गेली तर Oversold किंवा स्वस्त झाला असे समजतात. जर RSI ८० च्या वर गेला तर त्याला EXTREME Overbought किंवा अतिमहाग आणि २० च्या खाली आला तर EXTREME Oversold किंवा अतिस्वस्त झाला असे मानतात . या दोन गोष्टी मध्ये गल्लत झाल्यामुळे खूप ट्रेडर्स ला नुकसान घ्यावे लागते बरेच जण ७० च्या वर म्हणजे महाग झालाय समजून विक्री करतात आणि नुकसान घेतात परंतु खरं तर ७० च्या वरती जाऊन रेसिस्टन्स तयार करून मार्केट पुन्हा माघारी फिरले तर तो विक्री साठी योग्य समजावा अगदी तसाच OVERSOLD विषयीही लक्षात असू द्या. RSI जर ५० च्या आसपास फिरत असेल तर मार्केट SIDEWAYS आहे असे समजावे . येथे एक महत्वाची बाब अशी आहे कि आपल्याला महाग किंवा स्वस्त असल्याची सूचना तर मिळाली आहे, मात्र आणखी किती काळ ही अवस्था राहणार आहे, आणि नेमका कधी ट्रेन्ड रिवर्सल होणार आहे ते मात्र आपल्याला अद्याप कळलेले नाही.(येथेच मार्केट हे कोणत्याही टेक्निकल्स आणि कोणत्याही ट्रेडींग सिस्टमपेक्षा श्रेष्ठ ठरते.) . RSI चा उपयोग टेक्निकल अनालायसिस बरोबरच फंडामेंटल अनालायसिस होतो. 

RSI चा ट्रेडिंग मध्ये वापर 

        १.  RSI ३०-७० च्या मध्ये असेल 

         जेव्हा RSI दिवसाच्या चार्ट वर ३० ला सपोर्ट ला घेत असेल किंवा ३० च्या खाली जाऊन पुन्हा वरच्या दिशेने ३० ला क्रॉस करत असेल तेव्हा खरेदीचा संकेत मिळतो याउलट जेव्हा मार्केट ७० ला सेसिस्टन्स घेऊन खाली येत असेल किंवा ७० च्या वरती जाऊन खाली येताना ७० ला क्रॉस करत असेल तर विक्रीचा संकेत मिळतो. INTRADAY  ट्रेडिंग साठी हे खूप फायदेशीर असू शकते. 

       २. RSI ५० -१०० मध्ये फिरत असेल 

        या वेळेस मार्केट मध्ये  बुलिश ट्रेंड - तेजी आहे असे समजावे.  जेव्हा मार्केट RSI ५० ला सपोर्ट घेते तेव्हा खरेदी करावी आणि मार्केट  RSI ७० च्या वरती निघालं तर अजून तेजी येते त्यामुळे या परिस्तिथी मध्ये विक्री करणे टाळावे 

           ३. RSI ० - ५० मध्ये फिरत असेल 

                 या वेळेस मार्केट मध्ये  बेअरिश  ट्रेंड -मंदी  आहे असे समजावे मार्केट जेव्हा RSI ५० ला रेसिस्टन्स घेऊन माघारी फिरत असेल तेव्हा विक्रीचा संकेत मिळतो आणि जर ३० क्रॉस झाला तर मार्केट मध्ये अजून मंदी वाढणार आहे असे कळते . या प्रकारच्या मार्केट मध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला जात नाही. 

    प्रत्यक्षात मार्केटमध्ये अशी परिस्थिती येते कि RSI ची किंमत ८० च्यावर किंवा अगदी १०० जरी दर्शवत असेल तरी त्या शेअरची किंमत मात्र आणखी काही काळ वाढतच रहाताना दिसते. तेजीच्या कालावधीत किंवा Strong Uptrend मध्ये असे होतच असते.अशा वेळी बारीक लक्ष ठेवून जेव्हा शेअरची किंमत किंचीत उताराला लागेल आणि त्याचवेळी RSI ची किंमतही वरून खाली येताना ८० पेक्षा खाली आली- याला RSI Exhaust होणे असे म्हणतात- तर तो ट्रेन्ड रिवर्सल असण्याची दाट शक्यता असते.येथे आपण तो शेअर विकण्याचा निर्णय घेतला तर यशाची शक्यता जास्त असते.

   याचप्रमाणे Oversold स्थितीमध्ये शेअरची किंमत अगदी तळाला असून, RSI २० ते ०  या दरम्यान असेल,आणि शेअरची किंमत किंचीत वाढायला लागली आणि RSI खालून वरच्या दिशेने २० च्यावर सरकू लागला तर खरेदीचा निर्णय घेतला जातो. मात्र यानंतरही क्वचित वेळी शेअरची किंमत पुन्हा मुळ दिशेने जाण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही, कारण कोणतीही सिस्टीम आपल्याला १००% अचूक सिग्नल देवू शकत नाही.त्यामुळे साहजिकच अधिक अचूकतेच्या शोधात प्रत्येक ट्रेडर असतो- ते गरजेचेही आहे.

  

                   कॅन्डलस्टिक  चार्टमध्ये ट्रेन्ड रिवर्सल चा अंदाज बांधताना, RSI  ने स्वस्त वा महाग सिग्नल दिल्यावर, candles चा रंग व दिशा बदलल्यावरच ट्रेन्ड रिवर्सलची खात्री केली जाते.( हा एक स्वतंत्र विषय असून पुढील भागांमध्ये त्याची चर्चा करूया ) त्याचप्रमाणे मूव्हींग एवरेज, MACD,  फिबोनासी लेवल्स अशा निरनिराळ्या इंडीकेटर्ससह RSI  वापरले जातात. इंट्राडे साठी ५ मि आणि १५ मि कॅन्डलस्टिक आणि गुंतवणूक किंवा स्विंग ट्रेंड साठी १ दिवसाची टाइम फ्रेम वापरावी 


SUPERTREND । सुपरट्रेंड 

सुपर ट्रेंड हा   एम ए सी डी ( MACD )  आणि मूव्हिंग एवरेज  प्रमाणे ट्रेंड च्या दिशेने जाणारा इंडिकेटर आहे त्यामुळे एका दिशेने जाणाऱ्या मार्केटमध्ये हा अतिशय उत्तम पद्धतीने काम करतो

               सुपर ट्रेंड हा एक असा टेक्नीकल इंडिकेटर आहे जो समजायला अतिशय सोपा आहे जर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस समजत नसेल तरीही तुम्ही सुपर ट्रेंडचा उपयोग करून चांगलं नफा कमवू शकता याचा उपयोग तुम्ही शेअर मार्केट (  SHARE MARKET ),  फ्युचर मार्केट ( FUTURE MARKRT ) , कमोडिटी मार्केट ( COMMODITY MARKET ) व फॉरेक्स मार्केट ( FOREX MARKET ) यापैकी कोणत्याही मार्केटमध्ये उपयोग करू शकता. सुपर ट्रेंड हा वापरायला सर्वात सोपा टेक्निकली इंडिकेटर  आहे यामध्ये तुम्हाला कुठे खरेदी करायचं कुठे विक्री करायची कुठे स्टॉपलॉस लावायचा आणि कुठे नफा घेऊन बाहेर पडायचं या सर्वांची माहिती मिळते तुम्ही मार्केटमध्ये नवे असाल तर हा अतिशय उपयोगी इंडिकेटर आहे.

सुपर ट्रेंड । SUPERTREND  चा ट्रेडिंग मध्ये वापर 



             V-WAP प्रमाणेच सुपरट्रेन्ड मध्येही फक्त एकाच रेषा असते. ती रेषा २ रंगात दर्शविलेली असते हिरवा हा तेजीचा तर लाल हा मंदीचा . त्या रेषेचा रंग हिरवा असेल तर तो खरेदीचा सिग्नल आहे. आणि रेषा जी लेवल दाखवत आहे तो तुमचा स्टॉपलॉस असेल  जस मार्केट वरती जाईल तसा तुमचा स्टोपलॉस ही वरती वरती जाईल जोपर्यंत तुमचा ट्रेंलिंग स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत तुमचे टार्गेट ओपन असेल. याचप्रमाणे जेव्हा रेषेचा रंग लाल असेल तर तो विक्रीचा सिग्नल आहे. यामध्येही स्टोपलॉस खरेदीप्रमाणेच ठेवावा. 

६.  FIBONACCI RETRACEMENT । फिबोनाची रेट्रेसमेंट

 फिबोनाची रेट्रेसमेंट हे एक टेक्निकल टूल आहे  फिबोनाची सिरीज ची सुरुवात इटलीचे गणितज्ञ  फिबोनाची यांनी केली होती आणि त्यांच्याच नावावरून याला  फिबोनाची सिरीज हे नाव मिळाले यामधील दुसरा शब्द रेट्रेसमेंट याचा अर्थ माघारी फिरणे म्हणजेच जर मार्केट  तेजीत असेल तर मार्केट कोणत्या ठिकाणावरुन माघारी फिरेल याचा अंदाज लावणे आता फिबोनाची सिरीज म्हणजे काय हे  समजून घेऊ 
0 १ १ २ ३ ५ ८ 13 21 34 55 89 १४४ २३३ ३७७ .. . .......   ही ती सिरीज आहे. एक बाब तुमच्या लक्षात आली असेल प्रत्येक अंकात पाठीमागचा अंक मिळवला की पुढची फिबोनाची संख्या मिळते. ही फिबोनाची सिरीज निसर्गातील खूप गोष्टींमध्ये तुम्हाला दिसून येईल जसे की फुल, काही फळ , आश्चर्य म्हणजे आपली शरीराची उंचीही या नंबर ला अनुसरून आहे बर का ....... ( तो विचार नंतर करा आणि मोजून पाहा )



FIBONACCI RATIO  । फिबोनाची रेशो 

  ८९ ÷ ८९ = १
  ५५ ÷ ८९ = ०. ६१
   ३४ ÷ ८९ = ०.३८ 
   २१ ÷८९ = ०.२३  


         वरील पद्धतीने कोणताही नंबर घेऊन तुम्ही रेशो काढलेत तरी ते सारखेच येतात यालाच फिबोनाची  रेशो असे म्हणतात. काही सॉफ्टवेअर मध्ये हे नम्बर २३.६ % , ३८.२ %  ७८.६% असे दिसेल ते सर्व सारखेच आहे. त्यामुळे गोधळून न जाता आहे याच पद्धतीने याचा वापर करावा.  

FIBONACCI GOLDEN  RATIO  । फिबोनाची गोल्डन  रेशो 

 फिबोनाची  रेशो मधील 38.2 % , ६१.८% , 78.६ % , १३८.२% , १६१.२%  .........  हे सर्व गोल्डन रेशो आहेत.  गोल्डन रेशो म्हणजे म्हणजे या ठिकाणावरून किमती पुन्हा माघारी फिरण्याची शक्यता जास्त असते.  या सर्व गोल्डन रेशोंचा  ट्रेडिंग मध्ये खूप महत्त्वाचा उपयोग असतो

HOW DOES FIBONACCI RETRACEMENT WORK ?  । फिबोनाची रेट्रेसमेंट काम कसे करते ? 



फिबोनाची २ पद्धतीने काम करते
  1. जेव्हा फिबोनाची इंडिकेटरला   चार्ट वर  सर्वात खालच्या स्तरावरून  ( LOWEST POINT ) सर्वात वरच्या स्तरापर्यंत ( HIGHEST POINT ) पर्यंत काढले जाते ( हे सॉफ्टवेअर मधे  अगोदरच एडजस्ट केलेलं असते ) मार्केट कोणत्याही  गोल्डन रेशो पासून पुन्हा  ० % पर्यंत परत येते. आता हा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि आम्हाला कसे समजणार की  कोणत्या गोल्डन रेशों वरून मार्केट पुन्हा माघारी फिरेल काय पडलाय ना !!!! तर ते असं आहे कि जर मार्केट ३८.२ या गोल्डन रेशो च्या खाली बंद झाले तर ते ६१.८ पर्यंत हमखास जाणार आणि त्याच्या खाली बंद झाले तर १०० आणि त्याखाली बंद तर १६१.८ गाठणार. आणि खाली बंद नाही झाले तर माघारी फिरून पुन्हा वरच्या रेशो कडे जाणार यामध्ये तुम्ही तुमचा ट्रेंड बनवू शकता. 
  2. जेव्हा फिबोनाची इंडिकेटरला चार्ट वर  सर्वोच्च स्तरावरून ( HIGHEST POINT )  सर्वात खालच्या ( LOWEST POINT ) पर्यंत काढले तर मार्केट पुन्हा गोल्डन रेशो वरून माघारी फिरून ० % पर्यंत येते . 
इंट्राडे ट्रेडिंग साठी फिबोनाची वापरत असाल तर ५ मि किंवा १५ मि टाइम फ्रेम वापरून काम करावे ५ मि ने जास्त बरोबर ट्रेड मिळू शकतात आणि जर पोजीशनल म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी उपयोग करत असाल तर १ दिवसाची टाइम फ्रेम चार्ट वर असावी. 

FIBONACCI RETRACEMENT  TRADING STRATERGY | फिबोनाची रेट्रेसमेंट ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी  

  1.  फिबोनाची रेट्रेसमेंट ट्रेंड रिव्हर्सल :- जेव्हा  वरच्या स्तरावरून खालच्या स्तरावर फिबोनाची काढला आहे आणि ३८.२ च्या वरती जर मार्केट बंद असेल तर येथे खरेदी करू शकता आणि २३.६ याठिकाणी स्टॉपलॉस लावयचा आहे आणि ६१.८ हे टार्गेट असेल या पद्धतीने तुम्ही खरेदी करून नफा घेऊ शकता. किंवा स्टोपलॉस ट्रेल करून नफा वाढवत जाऊ शकता.  याउलट तुम्ही खालून वर फिबोनाची काढून विक्री करू शकता . 
  2. फिबोनाची रेट्रेसमेंट ट्रेंड कन्टीनुएशन : - जेव्हा लोवेस्ट पॉईंट ते हायस्ट पॉईंट फिबोनाची इंडिकेटर काढले आणि मार्केटने ७८.६ % ला सपोर्ट घेऊन ५० % च्या वर बंद झाले तर तुम्ही खरेदी करू शकता. यामध्ये ६१.८ हा स्टोपलॉस तर ० % हे टार्गेट असेल . याउलट तुम्ही विक्री करू शकता. 

         वरीलपैकी सर्व टेक्निकल इंडिकेटर वापरून तुम्ही खरेदी विक्री करत असाल तर एक नियम तुम्ही काटेकोरपने पाळला पाहिजे आणि तो म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो तरच तुम्ही नफा कमावू शकता.  
अचूकता ही अनुभवाने वाढते, आणि टेक्निकल इंडीकेटर्स वरून निश्कर्ष काढणे हे शास्त्र तर आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त, ती अनुभवाने येणारी " कला " आहे हे जरूर नमूद करावेसे वाटते.

आपुलकीचा सल्ला :- या सदरात आपण काही स्टॉक अभ्यासासाठी देत असतो आजचा स्टॉक GIC @ २००  आणि दुसरी महत्वाची घोषणा म्हणजे आपण लवकरच निफ्टी चे वीकली चढउतार आणि पुढच्या आठवड्यातील संधी यावर एक लेख मालिका सुरु करणार आहोत तर कंमेंट करून काही सूचना किंवा इतर माहिती हवी असल्यास सांगू शकता.   अजूनही दररोजचे अपडेट आणि स्टॉक बद्दल माहिती हवी असल्यास majhemarket हा telegram चैनल जॉईन करा.

FAQ
  1.  RSI हा किती दिवसाचा सेट करावा ?
  • ९ ते १४ दिवसाचा RSI हा अप्लिकेशन मधे सेट असतो पण १४ बेस्ट आहे
      २. फिबोनाची लॉन्ग टर्म साठी उपयोगी आहे का ?
  • हो नक्कीच पण त्यासाठी १ दिवस आणि १ आठवडा टाइम फ्रेम वापरावी      




2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने