FUNDAMENTAL ANALYSIS | मूलभूत विश्लेषण

             शेअर बाजार समजून घेण्यासाठी मुख्य दोन गोष्टीचा अभ्यास करणे आणि त्याचा योग्य वापर करणे खूप महत्वाचे आहे. बाजारात टिकून राहायचे असेल आणि त्याच बरोबर नफा कमवायचा असेल तर हे तुम्हाला आत्मसात करावेच लागेल.

  •    FUNDAMENTAL ANALYSIS :  मूलभूत विश्लेषण                                                                           
  •    TECHNICAL ANALYSIS :  तांत्रिक विश्लेषण 
  

  FUNDAMENTAL ANALYSIS म्हणजे काय ?

मूलभूत विश्लेषण म्हणजे एखाद्या कंपनीच्या शेअरचे वास्तविक किंवा वाजवी बाजार मूल्य निश्चित करण्याची एक पध्द्त. कोणत्याही स्टॉकचे एक अंतर्गत मूल्य असते ज्यामध्ये दररोज बदल होत नाही. ते अंतर्गत मूल्य काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण मूलभूत गोष्टींची मदत घेतो ज्याचा शेअरच्या किमतीवर परिणाम होतो. विश्लेषणाच्या या प्रकारामध्ये बाह्य घटनाचा  प्रभाव  तसेच आर्थिक स्टेटमेंट आणि इंडस्ट्री ट्रेंड याना जोडले जाते. 



FUNDAMENTAL ANALYSIS मध्ये मुख्यतः माहितीचे ३ संच वापरले जातात. 

  1. कंपनीच्या व्यवस्थापनाद्वारे केलेल्या घोषणा, कंपनीबद्दल सार्वजनिकपणे जाहीर माहिती,आणि कंपनीबद्दल इतरांचे मत. 
  2. कंपनीची ऐतिहासिक माहिती ज्यामुळे कंपनीची प्रगती / अधोगती समजेल 
  3. कंपनीची अशी माहिती जी सार्वजनिकरीत्या जाहीर केलेली नाही पण महत्वाची आहे उदा. व्यवस्थापन संकट , कामगार परिस्थिती इतर 

FUNDAMENTAL ANALYSIS  कश्यासाठी 

          शेअर बाजारात प्रत्येक दिवशी काहीतरी बातमी येत असते ज्याचा परिणाम रोजच्या रोज जाणवत असतो यामध्ये काही लोक नफा कमावतात तर काहींना नुकसान पाहावे लागते. बातमीच्या आधारावर प्रत्येक दिवशी ट्रेडर व्यवहार करतात पण सर्वच ट्रेडर नाही होऊ शकत काहींना गुंतवणूक करायची असते. गुंतवणूकदाराला ही अल्प मुदतीतील चढ उतारातील विचलित होणे  टाळायचे असते आणि हे टाळण्यासाठी मूलभूत विश्लेषण जमले पाहिजे. आणि ते जमल की तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता.  या विश्लेषणामुळे तुम्हाला कंपनीची विशेषता समजेल आणि तुमच्या जोखिमेचा अंदाज करणे सोप्प होईल. यासाठी कंपनी कशी चालते याची बेसिक माहिती असणे गरजेचे आहे. कंपनीचे सेक्टर कोणते हे माहिती करून घ्यावे लागेल. तुम्हाला थोडेफार गणिती आकडेमोड , व्यवसाय आणि लेख्याची मूलभूत माहिती करून घ्यावी लागेल. 

FUNDAMENTAL ANALYSIS  कसे सुरु कराल ? 

  • अगोदर कंपनीचे उत्पादन / सेवा समजून घ्या. 
  • कंपनी कोणत्या सेक्टर मधे येते ते जाणून घ्या आणि त्या सेक्टरची बेसिक माहिती मिळावा. 
  • कंपनीचे प्रतिस्पर्धी शोधून तुलना करा. 
  • कंपनीचे आर्थिक अहवाल समजून घ्या (BALANCE SHEET ) त्यावरून कर्ज स्थिती समजून येईल. 
  • कंपनीने मागे दिलेला परतावा आणि DIVIDEND ( किती आणि कितीवेळा ) हे तपासा 
  • भविष्यातील योजना आणि संधी याचा ताळमेळ बसतो आहे का ते पहा. 
या काही गोष्टी करून तुम्ही मूलभूत विश्लेषण करू शकता सरावाने तुम्हाला अजून काही माहिती यामधे जोडून जास्तीत जास्त बरोबर विश्लेषण करू शकता. 

 यासाठी काही महत्वाची माहिती मिळवावी लागेल आणि ती माहिती एकत्र करून त्याचे योग्य मांडणी करून विश्लेषण करावे लागेल ती माहीती  पुढीलप्रमाणे असेल :-

FUNDAMENTAL ANALYSIS चे प्रकार : - 

  1. गुणात्मक (QUALITATIVE )                                                                                         
  1. परिमाणात्मक  ( QUANTITATIVE )

       गुणात्मक मूलभूत विश्लेषण हे गुणवत्तेवर आधारित असते यामध्ये व्यवस्थापन, ब्रँड,आर्थिक कामगिरी, उत्पादने, बोर्ड इत्यादींचा विचार केला जातो. गुणात्मक विश्लेषण हे व्यक्तिनिष्ठ मत असू शकते उदा -  MRF कंपनीचे टायर हे APOLLOTYRE पेक्षा चांगले आहेत हे कोणाचे वयक्तिक मत असू शकते. 

  परिमाणात्मक विश्लेषण हे आकड्यांच्या आधारे केले जाते. याचा मुख्य आधार हा वित्तीय लेखाजोखा असतो आणि हे व्यक्तिनिष्ठ नसते. ते सर्वांसाठी सामान असते .  योग्य मूलभूत विश्लेषण करण्यासाठी दोहोंचा अभ्यास आणि ताळमेळ घालणे जरुरीचे आहे. 

FUNDAMENTAL ANALYSIS  चा गुंतवणूकदारास काय फायदा ?

 दीर्घ मुदतीचे गुंतवणूकदार म्हणून तुमची पहिली पसंती हि अंतर्गत मूल्यापेक्षा खूपच कमी किमतीला स्टॉक खरेदी करण्याला असली पाहिजे.मूलभूत विश्लेषणाने स्टॉक चे वाजवी / अंतर्गत मूल्य काढता येईल. जर SBI चे अंतर्गत मूल्य ३५० असेल तर SBI ३०० ला खरेदी करणे बरोबर आहे पण इथे तो ४०० ला खरेदी करणे हे आपल्या पोर्टफोलिओ साठी नुकसानकारक ठरू शकते. एखाद्या शेअरचे सध्याचा बाजारभाव जर त्याच्या वाजवी मूल्यापेक्षा कमी असेल तर तो शेअर स्वस्त आहे असे समजले जाते आणि बाजारभाव जर जास्त असेल तर तो शेअर महाग आहे आणि खरेदी साठी काही काळ वाट पाहावी हे संकेत मिळतात.  

  मित्रानो जर तुम्हाला गुंतवणूकदार बनायचे आहे तर तुम्हाला मूलभूत विश्लेषण समजून घेणे खूप गरजेचे आहे आम्ही या गोष्टीवर नेहमी भर देत आहोत कि अल्प काळासाठी कोणाच्या सल्ल्याने तुम्ही थोडेफार पैसे नक्कीच कमवू शकता पण त्याने तुम्ही गुंतवणूकदार नाही बनणार त्यासाठी तुम्हाला स्वतःला मेहनत घेऊन मार्केट ची माहिती घ्यावी लागेल त्यासाठी  FUNDAMENTAL ANALYSIS अभ्यासाने महत्वाचे आहे . पुढे आपण TECHNICAL ANALYSIS पण पाहणार आहोत.

 काय महत्वाचे ?

  तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल कि fundamental आणि TECHNICAL ANALYSIS पैकी महत्वाचे काय ? तर हे दोन्हीही महत्वाचे आहेत नजीकच्या कालावधीतील स्टॉकची मुव्हमेंट समजून घ्यायची असेल तर TECHNICAL आणि दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर FUNDAMENTAL. पण जर तुम्हाला या दोन्ही विश्लेषणाची सांगड घालायला जमली तर अतिउत्तम . 

BOOK LIST FOR FUNDAMENTAL ANALYSIS  - वाचावे ज्ञानासाठी  

शेअरबाजार, mutual fund तसेच फायनान्स विषयी महत्त्वाची  माहितीसाठी आणि चालू घडामोडी जाणुन घेण्यासाठी इथे भेट दया - Prakash Diwan Biography

  • शेअर्स चे फंडामेंटल अनालिसिस - अंकित गाला , खुशबू गाला                                                                   
  • FUNDAMENTAL ANALYSIS AND POSITION TRADING - THOMAS. N BULKOWASKI      
  • THE INTELLIGENT INVESTOR - BENJAMIN GRAHAM                                                           
  • फंडामेंटल अनालिसिस फॉर इन्व्हेस्टर - रघु पालट ( RAGHU PALAT )
यापैकी काही पुस्तके मराठी मध्ये आहेत तर काही मराठी मधे भेटत नाही तुम्हाला अजून काही माहित असतील तर तीही आम्हाला सुचवा 

आपुलकीचा सल्ला : मागच्या लेखामधे INDIGO PAINT या IPO विषयी माहिती दिली होती आज पहिल्याच दिवशी ११०% परतावा मिळालेला आहे. ज्यांना लिस्टिंग मधे भेटला त्यांचे अभिनंदन. 

यावेळेस  स्विंग ट्रेड साठी   १ शेअर POWERGRID  @ १९०  study purpose only

अधिक माहितीसाठी तुम्ही आमचा telegram channel subscribe करु शकता



6 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने