Double Candlestick patterns explained in marathi

 

CANDLESTICK PATTERN 2 | कॅण्डलस्टीक  पॅटर्न 2

            आपण मागील लेखांमध्ये कँडलेस्टिक पॅटर्न म्हणजे काय ? आणि काही सिंगल कँडलेस्टिक पॅटर्न विषयी माहिती घेतलेले आहे. ती माहिती तुम्ही पाहिली नसेल तर अगोदर एकदा ती माहिती वाचून घ्या. म्हणजे तुम्हाला या लेखामध्ये ज्या डबल कँडलेस्टिक पॅटर्न विषयी आपण माहिती घेणार आहोत ते समजायला सोप्प होईल. शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करण्यासाठी फंडामेंटल अनालिसिस गरजेचे आहेच, पण त्याचबरोबर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस ही समजायला हवे आणि ते समजण्यासाठी तुम्हाला कॅण्डलस्टिक पॅटर्न कळणे गरजेचे आहे.

आपली नवीन weekly prediction series ला नक्की भेट द्या. निफ्टी, निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्स ची आठवडा भरची चाल काय असेल याविषयी माहिती रविवारी सांगितली जाते.

आता आपण काही डबल कँडलेस्टिक पॅटर्न विषयी माहिती पाहणार आहोत.

 1) हरामी  कँडलेस्टिक पॅटर्न | HARAMI CANDLESTICK PATTERN 

             हरामी या जपानी शब्दाचा अर्थ आहे गर्भवती महिला यावरूनच या कॅण्डल स्टिक ला हरामी हे नाव पडले. यामध्ये दोन कँडलेस्टिक चा संच असतो, ज्यामधे 1 कॅण्डल स्टिक आईला निर्देशित करते तर दुसरी कॅण्डल स्टिक ही बाळाला. हरामी कँडलेस्टिकचे दोन प्रकार असतात





1)  बुलीश हरामी कॅण्डलस्टिक पॅटर्न| BULLISH HARAMI CANDLESTICK PATTERN 

  1.  नावावरूनच ही कॅण्डल स्टिक पॅटर्न तेजी दर्शविणारी आहे, हे लक्षात आलेच असेल.
  2.  यामध्ये दोन कॅण्डलचा संच असतो ज्यामध्ये पहिली कॅण्डल की मोठी बेरीश कॅण्डल असते, म्हणजेच ती लाल रंगाची असते आणि  दुसरी कॅण्डल छोटी बुलीश कॅण्डल म्हणजेच हिरवी कँडल असते. 
  3.  पहिली कॅण्डल म्हणजे बेरिश  ही आईला निर्देशीत करते, तर दुसरी कॅण्डल म्हणजे बुलिश ही तिच्या पोटातील बाळाला दर्शविते. 
  4. एखाद्या शेअर मध्ये किंवा निर्देशांकामध्ये चालू असलेल्या मंदीत चार्टच्या बॉटमला हा कॅण्डल स्टिक पॅटर्न बनतो. म्हणजेच आता त्या  शेअर/ निर्देशांका मधील मंदी संपून तेजी सुरू होणार आहे, असे संकेत मिळतात.
  5.  पहिली कॅण्डल बेरिश असते दुसरी कॅण्डल बुलिश असते.बुलिश कॅण्डल ही बेरिश कॅण्डलच्या बॉडीच्या मध्येच ट्रेड करत असायला हवी. 
  6. या पॅटर्नमध्ये ˈव्हॉल्यूम खूप महत्वाचा असतो पहिल्या कॅण्डल पेक्षा दुसऱ्या कॅण्डल मध्ये ˈव्हॉल्यूम शक्यतो जास्त असावा.
  7.  पहिली कॅण्डल ही बेरिश मारुबोजू असु शकते मारूबोजू कॅण्डल विषयी माहितीसाठी तुम्ही आपला अगोदर चा लेख वाचू शकता.
          हा पॅटर्न डेली चार्ट, विकली चार्ट,  मंथली इत्यादी चार्ट वरती दिसू शकतो. इंट्रा डे ट्रेडिंग साठी शक्यतो पाच मिनिट किंवा पंधरा मिनिट या टाईम फ्रेम चा उपयोग करावा आणि स्विंग किंवा पोझिशन ट्रेडिंग साठी डेली आणि विकली टाईम फ्रेम चा उपयोग करावा

 बूलिश हरामी कॅन्डल स्टिक नुसार खरेदी कशी कराल

         हा हरामी पॅटर्न बनल्यानंतर त्यानंतरची कॅण्डल हे कन्फर्मेशन कॅण्डल म्हणून लक्षात घ्यावी ती कॅण्डल हरामी पॅटर्नमधील बेरीश कँडल च्या हाय ( high )  याच्या वरती गेल्यावरच खरेदीसाठी प्रयत्न करावा आणि स्टॉप लॉस हा पॅटर्न मधील बेरीश कॅण्डल च्या लो ( low) च्या खाली लावा, आणि टारगेट जोपर्यंत ट्रेंड रिव्हर्सल चा संकेत मिळत नाही. किंवा ट्रेलिंग स्टॉपलॉस हिट होत नाही, तोपर्यंत असावे. ट्रेड करताना पाळायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो सांभाळूनच ट्रेड करावा.

2)  बेरिश हरामी कॅण्डलस्टिक पॅटर्न| BEARISH HARAMI CANDLESTICK PATTERN 

          या कॅन्डल स्टिक पॅटर्नचे नाव गर्भवती महिलेवर ठेवण्यात आलेले आहे. 



  1. यामधील पहिली कॅण्डल हे बुलिश प्रकारातील कॅण्डल असते, जी हिरव्या रंगाची असते, ती आईला निर्देशित करते. तर दुसरी लहान बेरिश कॅण्डल बाळाला निर्देशित करते. 
  2. नावावरूनच ही एक मंदी दर्शविणारे कॅण्डल स्टीक पॅटर्न आहे हे वेगळे सांगायला नकोच. याप्रकारचा कॅण्डलस्टिक पॅटर्न चार्ट वर सर्वोच्च स्तरावर बनल्यानंतर आता तेजी थांबणार असून इथून मंदीचा ट्रेंड सुरू होणार असल्याचा संकेत हा पॅटर्न देतो. 
  3. हा पॅटर्न बनवण्यासाठी पहिली मोठी कॅण्डल ही बुलिश प्रकारातील कॅण्डल असावी तर दुसरी कॅण्डल ही बेरीश असतानाच पहिल्या बुलिश कॅन्डल स्टिक च्या बॉडीच्या मध्येच ट्रेड करत असली पाहिजे. आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता. 
  4. या पॅटर्न साठी ˈव्हॉल्यूम खूप महत्त्वाचा आहे ˈव्हॉल्यूम शक्यतो पहिल्या बुलीश कॅन्डल स्टिक पेक्षा दुसऱ्या बेरीश कॅण्डल मध्ये जास्त असायला हवा याने या पॅटर्नचा चांगला परिणाम मिळण्याची शक्यता वाढते. ˈव्हॉल्यूम कमी होणारा असेल तरीही हा पॅटर्न काम करतो परंतु वाढणारा असल्यास अति उत्तम.
  5. पहिली कॅण्डल ही बूलिश मारूबोजू ही असू शकते. 
          हा पॅटर्न तुम्हाला डेली, विकली, मंथली या चार्ट वरती दिसू शकतो.

   इंट्राडे ट्रेडिंग साठी 5 मिनिट आणि 15 मिनिट ही टाइम फ्रेम तर स्विंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग साठी डेली आणि विकली टाईम फ्रेम जास्त फायद्याची ठरते.

 

 बेरिश हरामी कॅन्डल स्टिक नुसार विक्री कशी कराल

                          बेरिश हरामी कॅन्डल स्टिक पॅटर्न बनल्यानंतर ची कॅण्डल गॅप डाउन ( gap down) सुरू झाल्यावर ती कॅण्डल किंवा त्यानंतरची कॅण्डल ही हरामी पॅटर्नमधील बुलीश कॅन्डल स्टिक च्या लो (low) च्या खाली जाताना विक्री करावी. स्टॉप लॉस हा हरामी पॅटर्नमधील बुलीश कॅन्डल स्टिकच्या हाय ( high) यांच्यावरती लावावा. टारगेट हे ट्रेंड रिव्हर्सल संकेत मिळत नाही किंवा ट्रेलिंग स्टॉपलॉस  हिट होत नाही तोपर्यंत ठेवावा. ट्रेड करताना पाळायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशोचे भान ठेवावे.

              हरमी कॅन्डल स्टिक पॅटर्न मध्ये अजूनही काही प्रकार आहे. जसे की हरामी बुलिश,  हरामी बेरीश क्रॉस. यामध्ये दुसरी कॅण्डल ही डोजी | DOJI असते.  DOJI ची माहिती आपण सिंगल कॅन्डल स्टिक पॅटर्न या लेखामध्ये घेतलेली आहे. यांचे काम ही वरती सांगितलेल्या हरामी कॅन्डल स्टिक पॅटर्न प्रमाणेच असते हरमी कॅन्डल स्टिक पॅटर्न हा इंडियन स्टॉक मार्केट बरोबरच कमोडिटी ट्रेडिंग , फॉरेस्ट ट्रेडिंग, क्रिप्टोकरेंसी ट्रेडिंग यामध्येही उपयोगी येतो.

2) एन्गल्फींग कॅण्डलस्टिक पॅटर्न | ENGULFING CANDLESTICK PATTERN 

               एन्गल्फींग या जपानी शब्दाचा अर्थ आहे गिळंकृत करुन टाकणे. या कॅन्डल स्टिक प्रकाराचे नाव हे सूर्यग्रहण यावरून ठेवलेले आहे. यामध्ये पहिली कॅण्डल की लहान असते तर दुसरी कॅण्डल ही मोठी कॅण्डल असते, जी पहिल्या कॅण्डलला गिळुन टाकते. याचे दोन प्रकार पडतात.


1) बूलिश एन्गल्फींग कॅण्डलस्टिक पॅटर्न | BULLISH ENGULFING CANDLESTICK PATTERN 

  1. हा पॅटर्न दोन कॅन्डल स्टिक चा संच असतो यामध्ये पहिली लहान कॅण्डल ही बेरीश कॅण्डल असते तर दुसरी मोठी कॅण्डल ही बुलीश कॅण्डल असते.
  2.  पहिल्या बेरिश कॅण्डल नंतरची कॅण्डल ही गॅप डाऊन म्हणजे बेरीश कॅण्डल च्या लो (low) च्या खाली ओपन होऊन बंद व्हायला बेरीश कॅण्डल च्या हाय ( HIGH) च्या वरती जाते.
  3.  म्हणजेच पहिली कॅण्डल ही दुसऱ्या कॅण्डल च्या बॉडीच्या मध्येच ट्रेड करत असते. 
  4. व्होल्युम एक महत्त्वाचा भाग आहे. व्होल्युम हा चढता असेल, तर उत्तमच परंतु कमी होणारा असेल तरीही हा पॅटर्न काम करतो. 
  5. हा पॅटर्न तेजी दर्शक कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे. म्हणजे शेअर किंवा निर्देशांक मधे चालू असलेल्या मंदीला विराम लागणार असून, आता पुन्हा एकदा शेअर किंवा निर्देशांकाचे तेजीच्या दिशेने वाटचाल सुरू होण्याचा संकेत चार्ट च्या बॉटम ला बनलेल्या या पॅटर्न ने मिळतो. 
  6. यामध्ये दुसरी कॅण्डल ही बूलिश मारूबोजू कॅन्डल स्टिक असू शकते.


 

बूलिश एन्गल्फींग कॅण्डलस्टिक पॅटर्न नुसार खरेदी कशी करावी 

      
                        हा पॅटर्न बनल्यानंतर ची कॅण्डल GAP UP ओपन झाली आणि पॅटर्न मधील बुलीश कॅण्डल च्या हाय (HIGH)  च्या वरती जात असताना खरेदी करावी. आणि जरी GAP UP ओपन नाही झाली तरी पॅटर्न मधील बुलिश कँडल चा हाय (high) क्रॉस करताना खरेदी करावी आणि स्टॉप लॉस बुलीश कैंडल च्या लो (low) च्या खाली लावावा. टारगेट जोपर्यंत ट्रेंड रिव्हर्सल चा संकेत मिळत नाही किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत असावे. ट्रेडिंग करताना रिस्क रिवॉर्ड रेशो चे पालन करावे. हा कँडलस्टिक पॅटर्न डेली चार्ट, विकली चार्ट, तसेच मंथली चार्ट वरती ही दिसून येतो.

 इंट्राडे ट्रेडिंग करताना 5 आणि 15 मिनिटाची टाईम फ्रेम चा उपयोग करावा. तसेच स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग करत असाल तर चार्ट वरती डेली किंवा विकली टाईम फ्रेम चा उपयोग करावा याने चांगले परिणाम मिळण्याची शक्यता वाढते.

2) बेरिश एन्गल्फींग कॅण्डलस्टिक पॅटर्न | BEARISH ENGULFING CANDLESTICK PATTERN 




  1. हा पॅटर्न दोन कॅण्डल स्टिक्स चा संच असतो. यामध्ये पहिली लहान कॅण्डल ही बुलिश  असते तर दुसरी मोठी कॅण्डल बेरीश असते.
  2.  पहिल्या बुलीश कॅण्डल नंतरची बेरिश कॅण्डल स्टिक्स जी की ओपन होऊन बुलीश कॅण्डल च्या लो (LOW) च्या खाली बंद व्हायला हवी, म्हणजे पहिली बुलीश कॅण्डल ही दुसऱ्या बेरीश कॅण्डल च्या बॉडी मध्ये कामकाज करणारी हवी. 
  3. ही एक मंदी दर्शवणारा कॅण्डल स्टिक पॅटर्न आहे. म्हणजेच शेअर किंवा निर्देशांक मधील तेजीला आता ब्रेक लागणार असून मंदीला सुरुवात होणार असे संकेत मिळतात. 
  4. हा कॅन्डल स्टिक पॅटर्न चार्ट च्या सर्वोच्च स्तरावर बनतो यामध्ये व्होल्युमलाही खूप महत्त्व असते व्होल्युम चढत्या क्रमाने असलेला कन्फर्मेशन साठी उपयुक्त असतो परंतु कमी होणारा असेल तरीही या पॅटर्नमध्ये काम करतो.

बेरिश एन्गल्फींग कॅण्डलस्टिक पॅटर्न नुसार विक्री कशी करावी

                      बेरिश एन्गल्फींग कॅन्डल स्टिक पॅटर्न  बनल्यानंतर ची कॅण्डल ची gap down ओपन होत असेल, तर विक्री करण्याचे कन्फर्मेशन असते आणि जर तसे ओपन नाही झाले तर या पॅटर्नमधील बेरिश  कॅन्डल स्टिक चा लो ( low) ब्रेक करताना विक्री करावी. या परिस्थितीत तुमचा स्टॉपलॉस  हा बेरीश कॅन्डल स्टिक च्या सर्वोच्च स्तराच्या वरती असेल. आणि टारगेट हे तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशो नुसार जोपर्यंत ट्रेंड रिव्हर्सल चा संकेत मिळत नाही किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत असावे. 

                 याप्रकारचा कॅन्डल स्टिक पॅटर्न  डेली चार्ट, विकली चार्ट, मंथली चार्ट वरती दिसू शकतो. जर इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर 5 मिनिट आणि 15 मिनिट या टाईम फ्रेम चा उपयोग करावा आणि पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडिंग साठी डेली आणि विकली टाईम प्रेम चा उपयोग करावा.  कॅन्डल स्टिक पॅटर्न  इंडियन इक्विटी मार्केट बरोबरच फ्युचर मार्केट, कमोडिटी मार्केट, फॉरेक्स मार्केट, क्रिप्टोकरेंसी मार्केट याठिकाणीही उपयोगी आहे.

पिअर्सिंग लाईन कॅन्डल स्टिक पॅटर्न | PEARCING LINE CANDLESTICK PATTERN 

                       या कॅन्डल स्टिक पॅटर्नचे नाव जपानी लोकांनी ढगांमधून बाहेर पडणारा सूर्य यावरून ठेवले आहे. हा पॅटर्न दोन कॅन्डल स्टिकचा संच आहे. 




  1.  पहिली कॅण्डल ही मोठी बेरिश कॅन्डल स्टिक असते आणि दुसरी  मोठी बुलिश कॅन्डल स्टिक असते. 
  2. पहिल्या बेरिश कॅन्डल स्टिकच्या  लो / निम्नस्तर ( low) च्या खाली  म्हणजेच गॅप डाऊन होऊन, दुसरी कॅण्डल स्टिक पहिल्या कॅन्डल स्टिकच्या मध्यापर्यंत किंवा त्याच्या वरती बंद व्हायला हवी परंतु बुलिश कॅन्डल स्टिक ने पहिल्या बेरीश कॅन्डल स्टीकचा हाय / सर्वोच्च स्तर ( high) ब्रेक करता कामा नये.
  3.  यामध्ये दोन्ही पैकी एक किंवा दोन्हीही कॅण्डल स्टिक या मारूबोजू कॅन्डल स्टिक असू शकतात. 
  4. हा पॅटर्न तेजी दर्शक कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे. म्हणजेच मंदी संपून तेजीचे संकेत हा कॅन्डल स्टिक पॅटर्न चार्ट च्या बॉटम ला बनल्यानंतर देतो. त्यासाठी कन्फर्मेशन महत्त्वाचे असते. कॅन्डल स्टिक पॅटर्न चार्ट वर डेली टाईम फ्रेम, विकली टाईम फ्रेम किंवा मंथली टाइम फ्रेम वरती बनू शकतो.

पिअर्सिंग कॅन्डल स्टिक पॅटर्न  नुसार खरेदी कशी करावी

                 या कॅन्डल स्टिक पॅटर्न नंतरची कॅन्डल ही गॅपअप ओपन होत असेल तर ते एक स्ट्रॉंग कन्फर्मेशन समजावे. आणि पॅटर्नमधील बेरिश  कॅन्डल स्टिकचा हाय ( high)   ब्रेक करताना खरेदी करावी. अशावेळेस स्टॉप लॉस हा पॅटर्नमधील बुलिश कॅन्डल स्टिकच्या लो (low) च्या खाली लावावा. तर  टारगेट हे तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशो नुसार जोपर्यंत ट्रेंड रिव्हर्सल चा संकेत मिळत नाही किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत असावे. 

              इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी 5 मिनिट आणि 15 मिनिट ही योग्य टाईम फ्रेम आहे. तर स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडर्स साठी डेली आणि विकली टाईम फ्रेम ही गरजेची आहे. ज्याने जास्त योग्य प्रमाणात ट्रेंडचा अंदाज लावला जाऊ शकतो.

टेक्निकल अनालसिस मधील टेक्निकल इंडिकेटर्स आणि कॅन्डल स्टिक पॅटर्न यांची माहिती नंतर पुढील महत्वाचे म्हणजे चार्ट पॅटर्न विषयी माहितीची सेरिज सुरू करणार आहोत. कोणता चार्ट पॅटर्न सुरवातीला हवा असेल तर कमेंट करुन नक्की कळवा.

आपुलकीचा सल्ला: शेअर मार्केट मध्ये जर नफा कमवायचा आहे आणि जास्त कालावधी साठी गुंतवणुक करायची असेल तर फक्त न्यूज़ पाहुन किंवा अंदाजे ट्रेडिंग करुन चालणार नाही. त्यासाठी मार्केट विषयी  बेसिक माहिती मिळवत राहा. आपण weekly prediction series  सुरू केली आहे. भेट देवुन यावेळेस च्या लेवल पहा. अभ्यास किती मदत करतो हे लक्षात येईल. आणि telegram chanel जॉईन करु शकता तिथे वेळोवेळी अपडेट केले जाते.

4 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने