Will cryptocurrency ban in india 2021 ? | भारतात क्रिप्टोकरन्सी वर बंदी येणार का ?

   WHAT IS CRYPTOCURRENCY | क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ?                  

  CRYPTOCURRENCY चे नाव जरी घेतलं तरी बहुतेकांच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे बिटकॉईन. पण फक्त बिटकॉइन हेच नाही तर  आश्या हजारो क्रिप्टोकरंसीज आहेत त्यामध्ये डोजेकॉइन, इथेरिअम, ट्रॉन्स , बीटीटी इत्यादींचा समावेश होतो. क्रिप्टोकरन्सीला मराठी मधे  आभासी चलन म्हणतात.  एक्सचेंज मधे माध्यम म्हणून काम करण्यासाठी डिसाइन केलेली मालमत्ता म्हणून आभासी चलनाचा वापर केला जातो, ते ब्लॉकचेन वापरून कार्य करते जे बऱ्याच संगणकावर पसरलेले विकेंद्रित तंत्रज्ञान आहे जे व्यवहार व्यवस्थापित करते. पहिली बिटकॉइन (BITCOIN) २००९ मधे  सातोशी नाकामोटो यांनी तयार केली  

image source-google | image by - 



भारतात क्रिप्टोकरन्सी वर बंदी येणार का ? 


                      भारत सरकारचे  आभासी चलनावर बंदी घालण्याचे विधेयक प्रस्थावित आहे. यामध्ये बिटकॉइन व इतर आभासी चालना विषयी चर्चेचा समावेश असेल. अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या राज्यसभेतील वक्तव्यानुसार या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी उच्च स्तरीय आंतर मंत्री समिती ( आय एम सी )  स्थापन केली गेली आहे. यानुसार सर्व खासगी आभासी चलने भारतात प्रतिबंधित केली जातील. अस्तित्वात असलेले सर्व क्रिप्टो करंसीला सरकार खाजगी आहे असे मानते. आज आपल्याकडे बरेच ऑनलाईन गेम (ONLINE GAME ) , चेन मार्केटिंग  कंपनी या क्रिप्टोकरन्सी मधे PAYMENT करत आहे. त्यामुळे त्यांचा व्यवहार तपासणे आव्हानात्मक होत आहे. तुम्हालाही मिळतायत का क्रिप्टो ? तर मग हे जाणून घ्या. भारतीय सरकार सध्या क्रिप्टो विषयी अतिशय गांभिर्याने विचार करत आहे.

ELON MUSK SUPPORTED CRYPTOCURRENCY | ELON MUSK चे क्रिप्टोकरन्सी ला समर्थन 

                      जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी नुकतेच  क्रिप्टोकरन्सी ला समर्थन दिले. त्यांच्या समर्थनानंतर क्रिप्टो मध्ये मोठी वाढ दिसून आली. त्यांची कार कंपनी टेस्लाने  ( TESLA ) बिटकॉईने मधे  १.५ बिलियन डच गल्डन ची गुंतवणूक केली त्यामुळे बिटकॉइन एका दिवसात २०% वरती गेले . असेच डोजेकॉइन ( DOGECOIN ) ५०%  मस्क यांच्या समर्थनानंतर वाढले. 

भारत स्वात:चे डिजिटल चलन बनवणार ?

                       प्रस्थावित विधेयकानुसार RBI समर्थित डिजिटल करन्सी सुरु करण्याचा प्रस्थाव ही ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदार आणि व्यापारी भारताचे आभासी चलन ( डिजिटल रुपया ) मिळण्याची शक्यता आहे . मध्यवर्ती बँकेद्वारे जारी केल्या जाणाऱ्या डिजिटल चलनाला CBDC ( CENTRAL BANK BACKED DIGITAL CURRENCY ) म्हणतात. ज्याला मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या चलनाची किंमत असते. यापूर्वी पीपल्स बँक ऑफ चायना ने CBDC चा प्रयोग करण्याची घोषणा केलेली आहे. यासाठी ६.२ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे आणि खूप झपाट्याने त्यावर काम करत आहे . CBDC आणि क्रिप्टोकरन्सी मधे हा महत्वाचा फरक आहे कि CBDC मध्यवर्ती बँकेच्या मान्यतेने व्यवहारात येतात तर क्रिप्टो या खाजगी चलन आहेत 

क्रिप्टोकरन्सी चा भारतातील प्रवास 

           २००९ मधे बिटकॉइन अस्तित्वात आल्यानंतर आंतराष्ट्रीय बाजारात क्रिप्टोकरन्सी चे प्रस्थ झपाट्याने वाढत होते. व्यवहार गुप्त राहतो आणि शोधणे जवळ जवळ अश्यक्य असल्यामुळे अवैध कामकाजासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर लागला होता. प्रथम २०१३ मध्ये RBI ने भारतातील वापरकर्त्यांना आभासी चलनाच्या जोखीमे विषयी सावधगिरीचा इशारा दिला होता. ज्यात RBI ने जाहीर केले होते की आभासी चलनातील व्यवहार हा एक सट्टेबाजीचा विषय आहे आणि यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला 

              सावधगिरीचा इशारा देऊन काही उपयोग होतोय असं RBI ला वाटलं नाही त्यामुळे ६ एप्रिल २०१८ रोजी RBI ने भारतातील बँकांना क्रिप्टो-फर्म आणि व्हर्च्युअल चलनात व्यवहार करण्यास प्रतिबंधित करणारे परिपत्रक जारी केले. या परिपत्रकात नमूद केल्यानुसार अशा सेवांमध्ये खाती राखणे, नोंदणी करणे, व्यापार करणे, सेटलिंग, व्हर्चुअल टोकन वर कर्ज देणे, क्लिअरिंग, आभासी चलनात व्यवहार करणाऱ्या एक्सचेंजची खाते उघडणे आणि याच्याशी संबंधित खरेदी विक्री खात्यात पैसे हस्तांतरण इत्यादी गोष्टी प्रतिबंधित करण्यात आल्या. २८ फेब २०१९ ला आभासी चालनावरील वित्त मंत्रालयाच्या समितीने क्रिप्टोकरन्सी वर बंदीची शिफारस केली आणि भारताने स्वात: चे डिजिटल चलन तयार करावे अशी सूचना केली. यामुळे सर्व क्रिप्टो व्यवहारावर बंदी घालणारे विधेयक तयार केले त्यानुसार २५ कोटी रुपये दंड किंवा १ ते १० वर्ष कारावास  किंवा दोन्हीही दंड अशी शिफारस होती पण हे विधेयक संसदे मधे मंजूर झाले नाही. पण या सर्वांवरून सरकारचे क्रिप्टोकरन्सी विषयी मत लक्षात येईल . 

क्रिप्टोकरन्सी विधेयक २०२१ 

                        २०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात "क्रिप्टोकरन्सी आणि ऑफिशिअल डिजिटल चलन विधेयक २०२१" सादर केले यानुसार सरकार RBI मार्फत भारतीय रुपयाची डिजिटल आवृत्ती बाजारात आणण्याची योजना आखत आहे. अर्थ राज्यमंत्री श्री अनुराग ठाकूर यांनीही आभासी चलनाचे नियमन करण्याच्या क्षमते विषयी चिंता व्यक्त केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार क्रिप्टोकरन्सी या चलन किंवा मालमत्ता नसतात त्यामुळे त्या RBI किंवा SEBI च्या नियमनाच्या बाहेर राहतात . यावरून एक बाब तर नक्की लक्षात येते कि जरी आभासी चलन पूर्ण प्रतिबंधित नाही झाले तरी सरकार त्यावर नियमन नक्कीच आणू शकते. 

इतर देशांच्या  भूमिका  

                          भारत हा एकमेव देश नाही जो स्वतःचे क्रिप्टो चलन सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही देशांनी यापूर्वीच स्वतःची क्रिप्टोकरन्सी जारी केले आहे उदा चीन , सिंगापूर , इक्वाडोर , सेनेगल या देशांनी चलनाची सुरवात केली आहे. काही देश पर्यायाच्या शोधात आहेत उदा एस्टोनिया , रशिया, जपान स्वीडन हे देश डिजिटल साठी पर्यायांच्या शोधात आहेत याही पुढे जाऊन थायलंडने तर १३ क्रिप्टो ला कायदेशीर मान्यता दिली आहे . चीन डिजिटल चलनात नवीन चाचण्या करण्यासाठी आक्रमक पणे प्रयत्न करत आहे . 

TRADING IN CRYPTOCURRENCY ;  ट्रेडिंग क्रिप्टोकरन्सी मधे  

                        जस आपण शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करतो किंवा फॉरेक्स मधे करतो अगदी तसंच आपण क्रिप्टो मधेही ट्रेडिंग करू शकतो यासाठी हि तुम्हाला अकाउंट ची गरज पडेल KYC वगैरे सर्व सोपस्कार पार पाडावे लागतील. WAJIRX , COINSWITCH , KUBER  अशी काही ब्रोकर आहेत जे तुम्हाला क्रिप्टोकरन्सी मधे ट्रेडिंग साठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतील. आता प्रश्न राहतो ट्रेडिंग कसे करणार तर यामध्ये हि FUNDAMENTAL ANALYSIS आहे . चार्ट पाहावे लागतील  अगदी शेअर मार्केट प्रमाणे. पण जोखीम खूप जास्त आहे  यामधे . जोखीम खालील कारणामुळे वाढते 

  • २४ तास चालू राहते 
  • मुक्त व्यवहार आहे यावर कोणतीही नियमन करणारी संस्था नाही जस की  SEBI 
  • सरकारचे क्रिप्टो विषयी धोरण अजून स्पष्ट नाही .
यानंतरही  या ट्रेडिंग मधे परतवा ही  खूप जास्त मिळू शकतो आणि दीर्घ कालावधीची गुंतवणूक करून खूप लोकांनी तो कमावला ही  आहे. क्रिप्टोकरन्सी  च्या एकूण मालमत्ते पैकी जवळ जवळ ७५ % भाग  फक्त BITCOIN आणि ETHEREUM चा आहे. मागच्या फेब्रुअरी मधे ५ लाखाला असलेली BITCOIN आज ३५ लाखाला आहे आणि ETHEREUM याच काळात १२ हजारावरून १.३१ लाखाला गेली आहे. या दोन्ही बरोबरच येणाऱ्या काळात BTT , DOGECOIN , TRON हे येणाऱ्या काळात चांगला परतावा देऊ शकतात. पण सरकारचे धोरण येईपर्यंत थांबलेले बरं .  क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग विषयी जर तुम्हाला अजून माहिती असेल तर COMMENT  मधे तसे कळवा आम्ही त्याविषयी सविस्तर माहिती घेऊन लवकरच येऊ. योग्य माहिती आणि अभ्यास केल्याशिवाय यामध्ये ट्रेडिंग करायचे धाडस अजिबात करू नका. 

आपुलकीचा सल्ला  - मागच्या वेळी यामध्ये आपण POWERGRID  विषयी बोललो होतो त्यामध्ये १३% रिटर्न ८ दिवसात. यावेेेळी            BEL @ 135 study purpose only   तूम्हाला असेच अभ्यासासाठी स्टॉक किंवा क्रिप्टो पाहिजे असतील तर आमचा TELEGRAM CHANNEL  जॉईन करू शकता तिथे वेळोवेळी माहिती देता येते 

ता.क - पाठीमागचा इतिहास पहिला तर मार्च महिन्यात क्रिप्टोकरन्सी मध्ये नफा वसुली होत असते. जर कोणी घेऊन ठेवले असतील किंवा घेण्याचा विचार करत असतील तर  एकदा तुमच्या गुंतवणूक तज्ञांचा सल्ला नक्की घ्या 




             

              

4 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने