Stock Market Weekly Prediction 26 - 30 APRIL 2021 |स्टॉक मार्केट विकली प्रेडिकशन २६ - ३० एप्रिल २०२१
PREDICTION 05 :-
19 एप्रिल ते 23 एप्रिल मार्केटचा आढावा :
या वीक साठीचा आपला अंदाज BEARISH TO SIDEWAYS होता आणि तो तंतोतंत बरोबर आलेला आहे. हे आपले चौथे prediction होते. ज्यामध्ये तीन बरोबर आणि एक आपल्या दिशेने गेले नाही परंतु विरुद्धही गेले नाही. मागील विक साठी आपण निफ्टी साठी 14450 हे पहिले आणि 14240 हे दोन टारगेट दिले होते. त्याच बरोबर कोरोना रूग्ण संख्या वाढली तर 14125 हे शेवटचे टारगेट दिले होते. निफ्टीने 14151 चा लो (low) बनवला. तर बँक निफ्टी साठी 31400 हे पहिले टार्गेट दिले होते,तर दुसरे आणि आठवडयात 30700. बँक निफ्टी ने 30405 हा लो(low) बनवला. तर निफ्टी फायनान्स सर्व्हिस साठी 15125 - 14800/850 आणि 14450/500 असे तीन टारगेट दिले होते. निफ्टी फायनान्स सर्विस ने 14675 हा लो ( low) बनवला. अशाप्रकारे तिन्ही इंडेक्स मधील आपले टारगेट पूर्ण झाले. या आठवडाभरात दोन्ही बाजुला ट्रेडिंग ची संधी असेल असे आपण नमुद केले होते त्याचप्रमाणे दोन्ही बाजुला संधी मिळाली आणि टेलिग्राम चैनल वरती त्याविषयी वेळोवेळी सुचना ही दिल्या. तसेच ग्लोबल मार्केट विषयी तेजीत राहण्याचे संकेत केले होते तेही अगदी बरोबर आले. आहेत. Prediction 4 या ठिकाणी जाऊन तुम्ही पाठीमागील वीक चा अंदाज पाहू शकता.
सर्व संकेत आणि टेक्निकल ऍनालिसिस आणि काही टेक्निकल इंडिकेटर्स चा अभ्यास करता या वीक साठी मार्केटचे अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहोत. हा एप्रिल महिन्यातील शेवटचा आठवडा आहे. म्हणजेच की मंथली एक्सपायरी सुद्धा आहे म्हणूनच रोल ओवर डेटा मार्केटच्या बंद होण्याच्या भावा वरती काही प्रमाणात परिणाम करू शकतो.
मार्केट साठीचे सकारात्मक संकेत:
- आरबीआयकडून अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत सी पी आय ( CPI) 4% एवढा आहे 6% च्या वरती जात नाही तोपर्यंत मार्केट साठी ते फायदेशीर आहे.
- युएस फेडने 2023 पर्यंत व्याज दर न वाढविण्याचे सांगितले आहे .
- यूएस मध्ये स्टिम्युलस पॅकेजचा पैसा लोकांच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खर्च वाढत आहे त्यामुळेच युएस मार्केट बुलिश आहे.
- Covid-19 व्हॅक्सिनेशन यांची गती वाढलेली आहे तसेच 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस भेटणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. ही बाब मार्केट साठी खूप महत्त्वाची ठरू शकते
- डॉलर इंडेक्स नव्वद 90.79 तेवढा आहे म्हणजेच तो मार्केटच्या हिताचा आहे
- इंडियन रुपीस (INR) ची किंमत 75.03 एवढा आहे तो वाढला आहे परंतु एका रेंजमध्ये स्थिर आहे. चालू खात्यातील तूट वाढण्यासाठी INR मधील चढ-उतार कारणीभूत असतो. तो जर स्थिर असेल तर आयात-निर्यात मधील तुट / नफा स्थिर राहते हे अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर असते.
- रिलायन्स अजूनही कन्सोलिडेशन मध्ये आहे. तो वरच्या बाजूला म्हणजेच पॉझिटिव ब्रेक आउट देण्याची शक्यता आहे.
- टेक्निकल चार्ट चा अभ्यास करतात निफ्टीची जास्तीत जास्त वरच्या बाजूची चाल ही 4.5 टक्के तर खालच्या बाजूची 2.3 टक्के एवढी आहे. म्हणजेच अप - डाऊन रेशो निफ्टी साठी 0.51 एवढा येतो
- बँक निफ्टी साठी जास्तीत जास्त अपसाईड 4% तर डाऊन साईड 2.25 म्हणजेच अप टू डाउन 0.56 एवढा आहे
- या महिन्यात डी आय आय ( DII ) ने 7689 करोड ची खरेदी केलेली आहे आणि ते अजून खरेदी करत आहेत
- सध्या Q4 चे रिझल्ट चालू आहेत त्यात त्यातील काही रिझल्ट आलेले आहेत तर काही येण्याच्या तयारीत आहेत परंतु सध्या मार्केट रिझल्ट वरती नाही तर जास्तीत जास्त कुरणावरती अवलंबून आहे.
मार्केट साठीचे नकारात्मक संकेत:
- इंडिया वीक्स ( VIX) 22.69 एवढा आहे.
- मार्केटचा पीई (PE) 32.07 एवढा आहे.
- यु एस 10 इयर बॉंड़ ईल्ड ( BOND YEILD) 1.55 एवढा आहे.
- यूएस मध्ये बायडन सरकारने कार्पोरेट टॅक्स 21.28 टक्के पर्यंत वाढवण्याचे निर्णय घेतला आहे. तसेच अतिश्रीमंत लोकांवर रिच टॅक्स लावणार असल्याचे सांगितले आहे.( हा निर्णय आपल्या सामान्य जनतेच्या मनातील आहे खरं )
- बायडन सरकारने कॅपिटल गेन टॅक्स ( CGT) दुप्पट करण्याचे संकेत दिले आहेत. या एका बातमी वरून यूएस मार्केट 300 पॉइंट ने खाली पडले होते.
- गेल्या वर्षभराच्या रॅलीने आपले इंडियन मार्केट ओवर व्हॅल्यू झालेले आहे.
- एप्रिल साठी चा पी सी आर (PCR) 1.07 एवढा आहे तर मे महिन्यासाठी चा पीसीआर 1.94 एवढा आहे.
- गेल्या काही दिवसापासून मार्केट ज्याच्यावरती सर्वात जास्त अवलंबून आहे अशा कोरोना रुग्णसंख्यात मोठी वाढ दिसून येत आहे. भारतातील रुग्ण संख्या प्रति दिवस 3.50 लाख पर्यंत पोहोचलेली आहे.
- कमोडिटी मार्केटमध्ये क्रूड ऑइल 66.12 या भावावर ट्रेड करत आहे.
- निफ्टी आणि निफ्टी फ्युचर मध्ये -8.35 डिस्काउंट आहे.
- एफ आय आय ( FII) एप्रिल महिन्यामध्ये 8237 करोडची विक्री केलेली आहे.
26 - 30 एप्रिल मार्केट दिशा:
सर्व सकारात्मक आणि नकारात्मक संकेत पाहिल्यानंतर कोणते संकेत जास्त प्रभावशाली आहेत, आणि मार्केट वरती जास्त परिणाम करू शकतात यावरून आपण मार्केट ची दिशा ठरविण्याचा प्रयत्न करतो. सध्याला कोरोना हाच सर्वात मोठा संकेत आहे रुग्ण संख्या 3.50 लाख जवळ पोहोचलेली आहे. ही जरी चिंताजनक बाब असली तरी वाढणारे व्हॅक्सिनेशन दिलासादायक बाब आहे. तसेच 1 मे तारखेपासून सुरु होणारे 18 वर्षावरील सर्वांसाठी चे लसीकरण कोरोना ला
आळा घालण्यातील महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रासारख्या काही राज्यात लावलेले निर्बंध रुग्ण संख्या कमी करण्यात किंवा वाढ स्थीर करण्यात उपयुक्त ठरू शकते. येत्या काही दिवसात कोरोना रुग्ण संख्येचा उतार चालू होण्याचा आशा आहे. मार्केटला कोरोनाच्या स्थितीचा अंदाज आलेला आहे. त्यामुळे खूपच मोठी वाढ होत नाही तोपर्यंत घाबरण्याचे ( मार्केट विषयी ) कारण नाही. 14250 हा स्तर मार्केट ने अजूनही तोडलेला नाही. ( बंद भावांचा नुसार) त्यामुळे आता डाऊन साईडची रिस्क माहिती झालेले आहे. यु एस मार्केट तेजीत आहेत तर युरोपियन मार्केट कन्सोलिडेशन फेजमध्ये आहेत.
मागील आठवडा प्रमाणे या आठवड्यातही दोन्ही बाजूचे ट्रेड करण्याची संधी मिळू शकते. कोरोना आहे तोपर्यंत सावधगिरीने ट्रेड करावेत. डी आय आय (DII) खरेदी करत आहेत तर एफ आय आय ( FII) विक्री करत आहे.
या आठवड्यासाठी मार्केटचा आपला VIEW BULLISH असणार आहे.
निफ्टी 26 ते 30 एप्रिल अंदाज:
- पी सी आर ( PCR ) 1.07 आहे.
- निफ्टी चा पी ई ( PE) 32.07 एवढा आहे. हा अजून थोडा खाली येणे गरजेचे आहे.
- ऑप्शन चैन ओपन इंटरेस्ट (OI) चा विचार केला तर, या आठवड्यासाठी चा ओपन इंटरेस्ट 15000 च्या कॉल (CE) वर 52,98,375 एवढा आहे. तर 14,500 च्या कॉल (CE) वर 29,66,925 एवढा ओपन इंटरेस्ट आहे. तसेच 14000 च्या पुट(PE) वर 55,27,500 तर 14200 PE वर 27,78,450 एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
- ओपन इंटरेस्ट (OI) वरुन 15000 हा रेजिस्टंस तर 14000 हा सपोर्ट ही 1000 पॉइंट ची रेंज या महिन्याच्या बंद साठी दिसत आहे.
- निफ्टीचा बंद भाव हा 14341.35 आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद बंद भाव 14333 आहे म्हणजेच फ्युचर चा डिस्काउंट 8.35 एवढा आहे.
- अपसाईड लेवल : निफ्टीने तिच्या बंद भाव 14341.35 पासून वरच्या बाजूला जायला सुरुवात केल्यानंतर पहिला सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स 14550 हा आहे. आणि हीच आपली पहिली लेवल आहे यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर आपली दुसरी लेवल 14660 ही येऊ शकते. यावरती एक दिवस बंद राहिल्यानंतर आपली तिसरी लेवल आणि या आठवड्यासाठी चे टारगेट 14875/925 हेे असू शकते.
- डाउन साईड लेवल : निफ्टीने तिच्या बंद भावापासून खालच्या बाजूला जायला सुरुवात केली तर तिचा पहिलाच महत्त्वाचा सपोर्ट 14151 हा मागील आठवड्याचा लो (low) हा असेल जोपर्यंत एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅन्डल स्टिक त्याच्याखाली बंद होत नाही तोपर्यंत खालची लेवल येण्याची शक्यता कमी आहे. तरी पण दुसरी लेवल आणि आठवड्याचे जास्तीत जास्त डाउन साईड 13960 ही असण्याची शक्यता आहे. खूपच काही नकारात्मक बाब समोर आली तर निफ्टी 13700 पर्यंत जाऊ शकते पण ही शक्यता खूपच कमी आहे.
- NIFTY 50 @ 14631.15
S1 - 14151 S2- 13960 S3- 13700
बँक निफ्टी 26 ते 30 एप्रिल अंदाज:
- बँक निफ्टी पीसीआर या वीक साठी 1.04
- बँक निफ्टी चा पीई ( PE) 24.52 एवढा आहे.
- बँक निफ्टी चा बंदभाव 31722.3 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 31602.80 एवढा आहे म्हणजेच डिस्काउंट 119.5 पॉईंट चा आहे.
- ओपन इंटरेस्ट चा विचार करता मध्ये आठवड्यासाठी 32000 CE कॉल वरती 9,11,575 तर 33000 कॉल वर 964450 आणि 31000 PE पुट वर 1018375 तर 30500 PE वर 763850 ओपन इंटरेस्टआहे.
- बँक निफ्टी डाऊन साइड लेवल : बँक निफ्टी ने तिच्या बंद भावापासून 31722.3 वरती जायला सुरुवात केली तर पहिला रेजिस्टन्स 32000 ही लेवल असेल. यावरती जर एक तासाची कॅण्डल बंद झाली तर 32275/325 ही दुसरी लेवल असेल आणि या वरती जर एक तासाची किंवा एक दिवसाची कॅण्डल स्टिक बंद झाली तर 33075/125 ही लेवल येऊ शकते, आणि हे आपले या आठवड्याचेही टारगेट असेल.
- बँक निफ्टी डाऊन साइड लेवल : बँक निफ्टी ने तिच्या बंद भावा पासून 31722.30 खाली जायला सुरुवात केली, तर पहिला सपोर्ट 31100 या लेव्हल वरती आहे. जर या खाली एक तासाची कॅण्डल बंद झाली. तर दुसरी लेवल 30475/525 ही असेल याखाली एक दिवसाची कॅण्डल बंद झाली, आणि एखादी वाईट बातमी आली तरच 29800 ही लेवल येण्याची शक्यता असेल परंतु याठिकाणी येण्याची शक्यता फार कमी आहे.
- BANK NIFTY @ 31722.30
S1- 31100 S2- 30475/525 S3- 29800
वरती खूप वेळा कॅन्डल स्टिक चा उल्लेख झालेला आहे जर तुम्हाला कॅन्डल स्टिक विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कॅन्डल स्टिक भाग 1 आणि कॅन्डल स्टिक भाग 2 या ठिकाणी ती मिळवू शकता.
निफ्टी फायनान्स सर्वीस 26 ते 30 एप्रिल अंदाज:
NIFTY financial services: @ 15238.25
R1 - 15480/510 R2- 15775/825 R3- 16000 WT
S1 - 15050/100 S2- 14675/700 S3- 14400
निफ्टी फायनान्स सर्विस चे हे आपले तिसरे परीक्षण आहे या अगोदरच्या दोन्ही ही अगदी बरोबर आलेले आहेत. सहसा जास्त ट्रेडिंग या इंडेक्समध्ये होत नाही तुम्ही थोडा फार अभ्यास केला तर या इंडेक्समध्ये ट्रेडिंगसाठी चांगली संधी आहे. यामध्ये डेली टाईम फ्रेम कॅन्डल स्टिक पॅटर्नवर एमएसीडी MACD इंडीकेटर चा क्रॉसओवर होण्याच्या तयारीत आहे.
महत्त्वाच्या बाबी:
कोरोनाच्या परिस्थितीतून अजूनही बाहेर पडलेलो नाही त्यामुळे इंडेक्स मध्ये ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस शिस्तीने पाळत चला. जो सेटअप बनत आहे त्यानुसार या आठवड्यात देखील दोन्ही बाजूचे ट्रेड मिळण्याची शक्यता आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूक करणाऱ्यांनी मार्केट खाली आले तर एवरेज करायला काही हरकत नाही. आठवड्यासाठी चा अंदाज जरी बुलिश असला तरी काहीवेळा शॉर्ट सेलींग ची संधी मिळू शकते यावेळेस आपण टेलिग्राम चैनल ला अपडेट करत असतो. ओव्हर नाइट ट्रेड करताना SPREAD किंवा HEDGE चा आधार घेऊन ट्रेड करा. प्राप्त डेटा वरून आपण हा अंदाज व्यक्त करत असतो काही बातमी आली तर मार्केट डेटा चा विरुद्ध काम करण्याची जोखीम लक्षात घेऊन कामकाज करावे.
DISCLAIMER : वरील सर्व एनालिसिस दिसणार्या डेटा वरून केलेले आहे मार्केटमध्ये चढ-उतार होऊ शकतात त्यामुळे खरेदी किंवा विक्री करताना तुमच्या फायनान्शिअल ॲडव्हायझर चा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.