BEST Technical Indicators for Trading in marathi

TECHNICAL INDICATORS । टेक्निकल इंडिकेटर्स 

          टेक्निकल इंडिकेटर म्हणजे तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून मार्केट कश्या पद्धतीने व्यवहार करणार आहे याचा अंदाज  किंमत , व्हॉल्युम आणि इतर घटकांच्या आधारे व्यक्त करणारा एक संकेतक . यासाठी तुम्हाला थोडेफार तांत्रिक विश्लेषण येणे गरजेचे आहे ते नसेल येत तर अगोदर त्याची माहिती घेऊन मग पुढील माहिती अभ्यासा. अगोदरच्या लेखामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि टेक्निकल इंडिकेटर्स चे प्रकार याची माहिती दिली आहे 

यामध्ये आपण खालील इंडिकेटर्स पाहणार आहोत . 

  1. MOVING AVERAGE । मूव्हिंग एव्हरेज 
  2. MACD  । एम ए सी डी 
  3. V - WAP । व्ही - वॅप 
  4. RSI  । आर एस आय 
  5. SUPERTREND । सुपरट्रेंड
  6.  Fibonacci retracement । फिबोनाची रेट्रेसमेंट


  1. MOVING AVERAGE । मूव्हिंग एव्हरेज 

                                                     एखाद्या शेअरच्या वा निर्देशांकाच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असले तर आपल्याला त्याचा ट्रेंड/ दिशा ठरविणे  कठीण होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मूव्हींग एवरेज या  तंत्राचा / इंडिकेटर चा वापर सुरू झाला.मूव्हींग एवरेज म्हणजे एका ठराविक कालावधीसाठी त्या शेअरच्या किंवा निर्देशांकाच्या बंद भावांची सरासरी. उदा.15 दिवसांच्या पिरिअडची मूव्हींग एवरेज म्हणजे त्या 15 दिवसांच्या बंद भावांची सरासरी होय.अशा पध्दतने प्राप्त सरासरी किंमतीचा ग्राफ काढला जातो आणि त्यावरून त्या शेअरची दिशा ठरवली जाते. कालावधी जेवढा जास्त तेवढा हा ग्राफ कमी चढ-उतार असलेला असतो आणि यामुळे तात्पुरत्या वरखाली होणार्या किंमतीमुळे होणारी दिशाभूल टाळणे शक्य होते.


 मूव्हिंग एवरेजेसचे प्रकार -

  •  सिम्पल मूव्हिंग  एवरेज (SMA)- 

                                                  मूव्हिंग एव्हरेज साठी निवडलेल्या कालावधीतील सर्व  दिवसांना   सारखेच महत्व (वेटेज) दिले जाते- म्हणजेच त्या कालावधीच्या सर्व दिवशीच्या बंद भावांची साधी बेरीज करून तीला दिवसांच्या संख्येने भागले जाते. या प्रकारच्या मूव्हींग एवरेजमध्ये अगदी अलिकडील भावाला पूर्वीच्या भावाएवढीच किंमत असल्याने ट्रेडर्स या प्रकाराला जास्त विश्वासु मनात नाही 


 ट्रेंड ओळखण्यासाठी शक्यतो ५० SMA  मूव्हिंग एव्हरेज चार्ट मध्ये लावावे , प्रत्येकाला हे वेगळे लावता येऊ शकते पण ५० दिवसाचा चांगल्या प्रकारे ट्रेंड दर्शवितो. जेव्हा किंमत ५० SMA ला क्रॉस करून वरती जाते तेव्हा त्याला बुलिश क्रॉसओव्हर समजावे हा एक खरेदीचा (तेजी )  संकेत आहे याउलट जेव्हा चार्ट मध्ये किंमत ५० SMA ला वरून खाली क्रॉस करते तेव्हा हा बेयरिश क्रॉसओव्हर समजावा आणि हा विक्री ( मंदी ) संकेत असतो 


  • लिनीअर वेटेड एवरेज-

                                   या प्रकारामध्ये प्रत्येक दिवशीच्या बंद भावाला वेगवेगळे महत्व दिले जाते.उदा. सोमवार ते शुक्रवार या ५ दिवसांचा पिरिअड असेल तर सोमवारच्या म्हणजेच पहिल्या दिवशीच्या बंद भावाला १ ने गुणले जाते, मंगळवारच्या म्हणजे दुसर्या दिवशीच्या भावाला २ ने तिसर्या म्हणजे बुधवार या दिवशीच्या भावला 3 ने आणि असेच पुढे शुक्रवारपर्यंत येणार्या किंमतींची बेरीज केली जाते, आणि त्या बेरजेला १+२+३+४+५ ची बेरीज म्हणजेच १५ ने भागले जाते. अशा प्रकारे त्या ५ दिवसांची लिनीअर वेटेड मूव्हीन्ग एवरेज काढले  जाते.या पद्धतीत प्रत्येक दिवसाला त्याच्या क्रमानुसार वेगळे महत्व मिळत असल्यामुळे एव्हरेज जास्त बरोबर येते. 


३) एक्सपोनेन्शियल मूव्हीन्ग एवरेज (EMA)-

                                                              हा ट्रेडर्स कडून जास्त वापरला जाणारा आणि विश्वास ठेवला जाणारा प्रकार आहे.   यामध्ये आकडेमोड खूपच आहे, मूव्हीन्ग एवरेजचा वापर ट्रेडींगसाठी कसा करायचा या गोष्टीला महत्व द्यायला हवे. मात्र एक्सपोनेन्शियल एवरेजमध्ये देखील सर्वात अलिकडच्या बंद भावांना अधिक महत्व दिले आहे एवढे ध्यानात घेतले तरी पूरेसे आहे.

SMA च्या तुलनेत EMA ही किंमतीत होणार्या बदलांना अधिक प्रतिसाद देत असल्याचने  EMA जास्त अचूक पद्धतीने ट्रेंड ची दिशा दर्शवू शकतो  


मूव्हींग एवरेजेसचा ट्रेडींगमध्ये वापर-

                                  टेक्निकल चार्ट पहाताना मूव्हींग एवरेजची किंमत कशी काढतात ते आपण यापूर्वी पाहिले आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाचे त्याचा प्रत्यक्ष ट्रेडींगमध्ये कसा वापर करतात हे जाणून घेणे आहे. मूव्हींग एवरेजचा सर्वात सोपा अर्थ म्हणजे आपण असे म्हणु शकतो की एखाद्या शेअरची वा कमोडिटीची किंवा निर्देशांकाची  एखाद्या ठराविक काळापूरती सरासरी किंमत होय. हा ठराविक काळ किती असावा हे अर्थातच प्रत्येका साठी वेगळे असु शकते ते अपापल्या अनुभवाने  ठरवायचे आहे.





काही मूव्हिंग एव्हरेज चे कॉम्बिनेशन वापरून तुम्ही ट्रेंड घेऊ शकता . यामध्ये कमी दिवसाच्या मूव्हिंग एव्हरेज ला फास्ट लाईन ( FAST LINE ) आणि जास्त दिवसाच्या एव्हरेज ला स्लो लाईन ( SLOW LINE ) समजले जाते . जेव्हा फास्ट लाईन खालून वरती जाताना स्लो लाईन ला क्रॉस करते तेव्हा त्याला बुलिश क्रॉसओवर म्हणतात हा तेजीचा संकेत असून येथे खरेदी करावी. आणि जर फास्ट लाईन ने वरून खाली येताना स्लो लाईन ला क्रॉस केले तर हा बेयरिश क्रॉसओवर असून मंदीचा संकेत आहे. 

 काही महत्वाचे क्रॉसओवर कॉम्बिनेशन 

                                        फास्ट लाईन                                      स्लो लाईन 

इंट्राडे ट्रेडर्स  -               ७ दिवस EMA / SMA                     २१ दिवस EMA /SMA 

स्विंग ट्रेडर्स -              २१ दिवस                                            ५० दिवस 

दीर्घ गुंतवणूक -             ५० /१०० दिवस                                 २०० दिवस 


यापैकी ५० -  २०० कॉम्बिनेशन ला गोल्डन क्रॉसओवर मानले जाते. २०० SMA / EMA  खूप महत्वाचा मानावा जर हा किमतीच्या वरती असेल तर तो रेसिस्टन्स चे काम करतो आणि खाली असेल तर सपोर्ट बनतो 


इंट्राडे-ट्रेड साठी ५ मि , १० मि  आणि १५ मि चार्ट वापरावा आणि स्विंग ट्रेडसाठी १दिवस, १ आठवडा  चार्ट वापरावा दीर्घ गुंतवणुकीसाठी  १ आठवडा ,  १ महिने तसेच ६ महिने कालावधीचे चार्ट निवडून त्यावर विविध पिरीअडच्या मूव्हींग एवरेजेस कशा काम करतात हे पहायला हवे.

फ़ंडामेंटल अनलसिस | FUNDAMENTAL analysis हे दिर्घ कालावधी  गुंतवणुक करताना खुप महत्वाचे आहे त्याची ही महीती हवी. कुठल्या पद्धतीने कमीतकमी चूकीचे सिग्नल (WHIPSAW) निर्माण होतात ते पडताळून ती पद्धत सातत्याने स्टॉपलॉस सहीत वापरल्याने फायद्याचे प्रमाण नक्कीच वाढेल.

यात खालील गोष्टी नियम म्हणून पाळाव्यात-


१) छोट्या पिरीअडची लाईन ही मोठ्या पिरीअडच्या लाईनपेक्षा वर असेल तरच खरेदीचा विचार.


२) दोन्ही एवरेजेस एकमेकांच्या फार जवळ नसाव्यात.


३) दोन्ही एवरेजेस या वरचे बाजूस जाणार्या म्हणजे चढत जाणार्या असाव्यात.



MACD  ।एम ए सी डी : मूव्हींग एवरेज कनवर्जन  डायवर्जन  

                                     एम ए सी डी मूव्हींग एवरेजे कनवर्जन  डायवर्जन  यामध्ये शेअरच्या किमतीच्या चढ-उतारतील  दोन किमतींच्या सरासरी  मधील संबंध दर्शविला जातो. 

  1.  26 दिवसाच्या  एक्सपोनेन्शियल मूव्हींग एवरेज ( EMA )  आणि १२ दिवसाच्या एक्सपोनेन्शियल मूव्हींग एवरेज ( EMA )  यांच्या फरकाने काढला जातो. त्या फरकाने तयार होणारी लाईन म्हणजे एम ए सी डी लाईन .
  2.  ९ दिवसाच्या एम एस सी डी लाईनचे EMA  म्हणजे सिग्नल लाईन.
 या दोन्ही लाईन  एकत्र चार्ट मध्ये ड्रॉ केल्यानंतर सिग्नल लाईन हे खरेदी किंवा विक्री साठी ट्रिगर म्हणून काम करते.  

३. अजून एक लाईन असते ती अगदी मधोमध स्थित असते तिला झिरो लाईन म्हणतात .

4. झिरो लाईन वरती व्हॉल्युम सारखे काही बार दर्शविलेले असतात त्यांना हिस्टोग्राम असे म्हणतात हे डायव्हर्जन अचूकतेने दर्शवितात 

 एम एस सी डी हा ट्रेंड फॉलो  इंडिकेटर आहे त्यामुळे एका दिशेने जाणाऱ्या मार्केट मध्ये हा जास्त  अचूकतेने काम करतो 




एम ए सी डी ( MACD ) चा ट्रेडींगमध्ये वापर - 

                                               जेव्हा एम ए सी डी लाईन ही सिग्नल लाईनला  खालून वरती ओलांडते तेव्हा खरेदीचा सिग्नल मिळतो यालाच पॉझिटिव्ह क्रॉसोवर ( BULLISH CROSSOVER ) असे म्हणतात.  याउलट जेव्हा एम एस इ डी लाईन  सिग्नल लाईनला वरतून खालच्या बाजूला ओलांडते तेव्हा विक्रीसाठी चा सिग्नल मिळतो यालाच निगेटिव्ह क्रॉसओव्हर ( BEARISH CROSSOVER ) असे म्हणतात. पॉझिटिव्ह क्रॉसोवर हा तेजीचा संकेत मानला जातो तर निगेटिव्ह क्रॉसोवर हा मंदीचा संकेत मानला जातो परंतु यामध्ये झिरो लाईन ला खूप महत्त्व असते जर पॉझिटिव्ह क्रॉसोवर हा झिरो लाईन च्या वरती झाला असेल तर तो स्ट्रॉंग सिग्नल मानला जातो आणि जर पॉझिटिव्ह क्रॉसोवर हा झिरो लाईनच्या खाली झाला असेल तर बहुदा हा क्रॉसोवर फसवा ही असू शकतो त्यासाठी एम एस सी डी लाईन नंतर झिरो लाईन ओलांडून जाताना खरेदी करणे हे जास्त फायद्याचे ठरेल याच प्रमाणे जेव्हा निगेटिव्ह क्रॉसओव्हर  हा झिरो लाईनच्या वरती होतो तेव्हा तो ही फसवा असण्याची शक्यता असते याठिकाणीही क्रॉसोवर नंतर एम ए सी डी लाईन झिरो लाईन खालच्या बाजूला ओलांडताना विक्री केली तर फायदा होण्याची शक्यता जास्त असते अगोदरच सांगितल्याप्रमाणे एम एस सी डी हा ट्रेंड फॉलो  इंडिकेटर आहे त्यामुळे एका बाजूने जाणाऱ्या मार्केटमध्ये हा जास्त चांगल्या प्रकारे काम करतो.

 MACD ट्रेंड रिव्हर्सल सिग्नल -

          तेजीचा मार्केटमध्ये जेव्हा एम ए सी डी लाईन आणि सिग्नल लाईन हे जर झिरो लाईनच्या भरती जर डबल टॉप बनवत असतील तर मार्केट मधील तेजीचा ट्रेंड बदलून तो मंदी मध्ये जाण्याचा संकेत असतो  याविपरीत जर  एम ए सी डी लाईन आणि सिग्नल लाईन झिरो लाईनच्या खाली डबल बॉटम बनवत असतील तर तो ट्रेंड रिवर्सल  चा संकेत असू शकतो. म्हणजेच मंदी मधून मार्केट तेजीत जाऊ शकते. इथे डबल टॉप किंवा बॉटम हा उल्लेख  एम ए सी डी लाईन आणि सिग्नल लाईन  विषयी आहे शेअर च्या किमती विषयी नाही हे लक्षात घावे. 

 HISTOGRAM DIVERGENS  । हिस्टोग्राम डायव्हर्जन्स  

               जेव्हा एम एस सी डी लाईन आणि शेअरची किंमत वरती जात आहे परंतु हिस्टोग्राम  हा खालच्या दिशेने जात आहे तेव्हा यास हिस्टोग्राम निगेटिव्ह डायवर्जन्स  असे म्हणतात, यानंतर मार्केटमध्ये मंदी येण्याची शक्यता असते याउलट जेव्हा चार्ट वरील किंमत  आणि एम ए सी डी  लाईन खाली जात आहे परंतु हिस्टोग्राम हा वरच्या दिशेने जात आहे तेव्हा पॉझिटिव्ह डायवर्जन्स  तयार होते यानंतर मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता असते. हिस्टोग्राम डायव्हर्जन्स हा सर्वात जास्त विश्वासू संकेत मानला जातो. हा संकेत खूप कमी वेळा मिळतो पण जेव्हा मिळतो तेव्हा जास्त नफा होतो . 

MACD चा खरेदी विक्री साठी वापर 

                   या इंडिकेटर चा वापर करून ट्रेडिंग करताना क्रॉसोवर मिळाल्याच्या कॅण्डल चा हाय ब्रेक करताना खरेदी करायची असते आणि स्टॉप लॉस  हा त्या कॅण्डल च्या लो ( LOW ) च्या  खाली लावला जातो आणि टारगेट जोपर्यंत ट्रेंलिंग स्टॉप लॉस हिट होत नाही किंवा रिव्हर्स पॅटर्न  बनत नाही तोपर्यंत ठेवावे.  असेच विक्रीच्या  बाबतीत बेयरिश क्रॉसओवर मिळालेल्या कॅण्डल च्या नंतर च्या कॅण्डल ने LOW क्रॉस करताना विक्री करावे आणि स्टॉप लॉस क्रॉसओव्हर कॅण्डल च्या HIGH च्या वरती लावावा.  

एम एस सी डी चा उपयोग करून जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करणार असाल तर ५ मि, १० मि आणि१५ मि या टाइम फ्रेम चा उपयोग करावा जर स्विंग ट्रेडिंग साठी उपयोग करणार असाल तर  १ तास,१ दिवस , १ आठवडा  यांचा उपयोग करावा आणि गुंतवणुकीच्या उद्देशाने उपयोग करत असाल तर १ दिवसा, १ आठवड्याचा , १ महिना  कॅन्डल चा उपयोग करावा.


V- WAP ( VOLUME WEIGHTED AVERAGE PRICE )  । वोल्युम वेटेड एवरेज प्राईस

                                     आज मार्केटमध्ये जे  नवीन लोकं दाखल होत आहेत त्यापैकी बहुतेक जणांना झटपट पैसा कमवायचा असतो त्यासाठी त्यांचा  भर हा इंट्राडे ट्रेडिंग वरती असतो इंट्राडे ट्रेडिंगसाठी सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त वापरला जाणारा इंडिकेटर म्हणजे V-WAP  इंडिकेटर. हा फक्त इंट्राडे ट्रेडिंग साठी काम करतो या इंडिकेटर चा वापर  तुम्ही  शेअर मार्केट , कमोडिटी मार्केट , फोरेक्स मार्केट , फ्युचर मार्केट  या ठिकाणी सुद्धा करू शकता. 



               याच्या नावावरूनच एक गोष्ट लक्षात आली असेल की हा इंडिकेटर वोल्युम आणि कॅण्डल स्टिक च्या ऍव्हरेज किमती वरती आधारित असतो.  हा दिसायला जरी मूव्हिंग एव्हरेज  किंवा सुपरट्रेंड ( SUPERTREND )  सारखा असला तरी याचे कॅल्क्युलेशन त्यांच्यापेक्षा वेगळे आहे याची किंमत काढण्याचा फॉर्मुला समजून घेणे  जास्त महत्वाचं नाही कारण आज-काल उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये याचे सर्व कॅल्क्युलेशन केलेले असतात .  ते तुम्ही सिलेक्ट करून वापरू शकता याची किंमत काढण्याचा फॉर्मुला खूप किचकट आहे त्यामुळे त्या फंदात न पडलेलेच बरं फक्त V-WAP  काम कसं करतो आणि ट्रेडिंग मध्ये त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे समजून घेऊया

 V-WAP चा ट्रेडींगमध्ये वापर -

                  यामध्ये एक बँड लाईन  असते जो इंडिकेटर चे काम करतो तो वापरायला अगदीच साधा आणि सोपा आहे परंतु जर कन्फर्मेशन चा उपयोग केला नाही तर बऱ्याच वेळा नुकसान होण्याची शक्यता असते.  यामध्ये जेव्हा चार्ट कॅण्डल  वि व्याप ( V-WAP)  रेषेला खालून वरती क्रॉस करून त्या रेषेच्या वरती बंद होते तेव्हा त्याला बुलिश  क्रॉसोवर समजले जाते हा खरेदीचा संकेत असतो.  याउलट जेव्हा कॅण्डल पॅटर्न वरतून खाली जाताना    वि-व्याप रेषेला क्रॉस करून  त्याच्या खाली बंद होते तेव्हा हा बेयरिश  क्रॉस ओव्हर असतो हा विक्री चा संकेत असतो

                  जसं की अगोदरच सांगितले आहे हा इंडिकेटर फक्त इंट्राडे साठी उपयोगात येत असल्याकारणाने यामध्ये टाईम फ्रेंम चे महत्व खूप जास्त आहे यामध्ये तुम्ही ५ मिनिट, १० मिनिट आणि १५ मिनिट या टाईम प्रेम चा उपयोग करून तुमचा ट्रेड ठरवू शकता. 

               यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो चे महत्व आणि स्टॉप लॉस थेरी चे महत्व खूप जास्त आहे ट्रेडच्या कन्फर्मेशन साठी ज्या केंडल ला खरेदीचा ( BUYING ) सिग्नल मिळाला आहे त्यानंतर त्या कॅण्डल चा HIGH याच्या वरती खरेदी करावी आणि सिग्नल मिळालेल्या कॅण्डल च्या लो ( LOW )  च्या खाली स्टॉप लॉस लावा.   खरेदी किंमत आणि स्टॉप लॉस यामध्ये २% पेक्षा जास्त अंतर असू नये. असे असेल तरच खरेदी करावी अन्यथा खरेदी करणे टाळावे यामध्ये टार्गेट 1:3  किंवा जोपर्यंत बेयरिश  क्रॉसोवर मिळत नाही किंवा ट्रेंलिंग  स्टॉप  लॉस हिट होत नाही ते असावे.  विक्रीसाठी सुद्धा बेयरिश  क्रॉसोवर मिळालेल्या कॅन्डल च्या लो ( LOW ) च्या खाली विक्री करावी आणि स्टॉप लॉस सिग्नल मिळालेल्या कॅण्डल च्या हाय ( HIGH ) च्या वरती लावा.  इथे ही रिस्क रिवार्ड रेशो  आणि स्टॉप लॉस थेरी याचा उपयोग करावा

महत्वाचे काही :-  शेअर मार्केट मध्ये कधीही कोणतीही पद्धत सर्व ठिकाणी सर्व काळी बरोबर असू शकत नाही आणि टेक्निकल इंडिकेटर्स तर खूप संवेदनशील असतात ते दिसायला जरी सोप्पे वाटत असले तरी ते कोणत्या शेअर ला कोणत्या परिस्थितीत लागू होतील आणि केव्हा नाही हे समजण्यासाठी तुम्हाला खूप काही शिकून समजून घ्यावे लागेल आणि तदनंतर जो अनुभव पदरात पडेल तो शिकवेल तुम्हाला योग्य इंडिकेटर आणि योग्य ट्रेंड ची निवड तोपर्यंत सावध ऐका पुढल्या हाका . 

आपुलकीचा सल्ला - आपण प्रत्येक लेखाच्या शेवटी १ स्टॉक अभ्यासाच्या उद्देश्याने देत असतो. अगोदरचे लेख पाहून मिळालेला परतवा तुम्ही पाहू शकता . तर यावेळेस चा स्टॉक आहे PC JWELLERS @ 26.5-27.5 . अजूनही दररोजचे अपडेट आणि स्टॉक बद्दल माहिती हवी असल्यास majhemarket हा telegram चैनल जॉईन करा.

हा लेख खूपच मोठा होतोय म्हणून बाकीचे इंडिकेटर्स घेऊन याचा दुसरा भाग दोनच दिवसात भेटीला येईल सहकार्य असावे . 

FAQ

1. स्विंग ट्रेडसाठी कोणते मूव्हींग एवरेज वापरावे ?

- 21 EMA  आणि 50 EMA  हे दोन्ही एकत्र वापरणे योग्य आहे.

2. MACD ची कोणती सेटिंग ठेवली पाहिजे?

- MACD साठी शक्यतो DEFAULT सेटिंग जी की 12-26-9 ठेवावी. 



9 टिप्पण्या

  1. Very useful indicator and strategy information in Marathi...Great efforts for Writing...

    उत्तर द्याहटवा
  2. I NEW AND LEARNING FROM YOU . JOINED YOUR TELEGRAM THREE MONTH BACK . WATCHING YOUR ANALISYS. OPENED MY DMAT ACCOUNT . NOT YET STARTED TRADING . HOPEFULLY I SHALL BUY MY FIRST SHARE SHORTLY. KEEP TEACHING US. GOD BLESS YOU

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने