ऑप्शन ग्रीक्स । OPTION GREEKS
ऑप्शन ट्रेडिंग भाग - ३
ऑप्शन ट्रेडिंग ची तोंड ओळख आणि सुरुवातीची काही माहिती आपण अगोदरच करून घेतलेली आहे. ऑप्शन मधील काही महत्त्वाच्या संकल्पना जसे की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? अंडरलाईन असेट कशाला म्हणतात ? ऑप्शन चे प्रीमियम म्हणजे काय? स्ट्राइक प्राइस चे महत्व काय असते. लॉट साइज आणि एक्सपायरी यांचा ऑप्शन ट्रेडिंग सी असणारा संबंध. या सर्वांचा उहापोह आपण अगोदरच्या लेखांमध्ये केलेला आहे. म्हणजेच ऑप्शनच्या विश्वात आपण आता प्रवेश केलेला आहे, आणि त्यातील दोन मुख्य कर्तेधर्ते म्हणजे ज्यांच्या खांद्यावरती या ऑप्शन विश्वाचा गाडा आहे, असे कॉल आणि पुट यांचीही आपल्याला ओळख आणि माहिती झालेली आहे. आता वेळ आहे ते या कॉल आणि पुटला आपल्या तालावर ती नाचवणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने ऑप्शन ट्रेडिंग मधील नफा आणि नुकसानीला जबाबदार असणाऱ्या शक्तीची ओळख करून घेण्याची !!!
आणि ती अदृश्य शक्ती आहे ऑप्शन ग्रीक ... अदृश्य यासाठी की वरील सर्व संकल्पना वरती खूप चर्चा होताना किंवा लक्ष दिले जात असलेले पाहायला मिळते परंतु ऑप्शन ग्रीक कडे सहसा कुणाचेही लक्ष नसते.
|
Option greeks |
शेअर मार्केट मधील ऑप्शन या डेरिव्हेटिव्ह प्रकारामध्ये खूप साऱ्या ट्रेडर्स ची एक तक्रार नेहमी पाहायला मिळते की : "अंडरलाईन ॲसेट वरील माझे अंदाज बरोबर असतात परंतु मला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सहसा नुकसान होते किंवा हवा तसा नफा मिळत नाही" याचे कारण म्हणजे ऑप्शन मध्ये कॉल आणि पुट हेच सर्वस्वआहेत असे समजून काम करणे. आणि ऑप्शन ग्रीक्स या प्रकाराला दुर्लक्षित करणे किंवा दुय्यम स्थान देणे होय . यातच भर म्हणून की काय ऑप्शन ट्रेडिंग हे प्रकरण अगोदरच काहीसे किचकट समजले जाते आणि त्याचा कळस म्हणजे हे ऑप्शन ग्रीक नावाचे पात्र. वरून याबाबत अगदी हिंदी आणि इंग्रजी मध्ये ही मोजकीच माहिती उपलब्ध मग मराठीतील माहिती विषयी बोलायलाच नको . म्हणूनच या लेखात आपण याच ऑप्शन ग्रीक चा उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीलाच एक सूचना आहे जर तुमचा मूड चांगला नसेल किंवा तुम्ही घाईत असाल तर इथेच थांबा नंतर सविस्तरपणे पुढील माहिती वाचा कदाचित एकदा वाचून समजणार नाही गोंधळ निर्माण होईल पुन्हाही वाचायला लागू शकते.
|
OPTION GREEKS MARATHI |
ऑप्शन ग्रीक म्हणजे काय ? । WHAT IS OPTION GREEKS ?
डेरिव्हेटिव्ह प्रकारातील ऑप्शन मग तो कॉल असो की पुट याच्या किमतीमध्ये (प्रीमियम) मध्ये बदल घडवून आणणारे घटक म्हणजेच ऑप्शन ग्रीक होय. ही आपल्या मायबोलीत समजेल अशी व्याख्या केलेली आहे यामध्ये तांत्रिक बाज टाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. कॅन्डलस्टिक प्रकरण आठवते का त्याची नावे कशी अनाकलनीय जपानी भाषेतील होती / आहेत, तशीच ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये बदल घडवणाऱ्या या घटकांची नावे संज्ञा या ग्रीक भाषेत आहेत. म्हणूनच याचे नावही ऑप्शन ग्रीक असेच आहे. यावरही जर संकल्पना समजली तर याला तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे हवे ते नाव ठेवा त्यात काय आहे ? ही नावे पाहून घाबरू नका कारण आता जी नावे समोर येणार आहेत त्यांनी शाळा कॉलेजमध्ये असताना खूप त्रास दिलाय आणि हे आता पुन्हा गणिताची आठवण करून देतील आणि हो थोडेफार गणितीय आकडेमोडेसाठी ही तयार व्हा !
ऑप्शन ग्रीक चे किती प्रकार आहेत ? TYPES OF OPTION GREEKS
एकूणच पाच ऑप्शन ग्रीक आहेत. यातील प्रत्येकाचे काम आणि त्याचा ऑप्शन प्रीमियम वरती होणारा परिणाम ही वेगवेगळा आहे.
- डेल्टा । DELTA
- गॅमा । GAMMA
- थिटा । THETA
- वेगा । VEGA
- रो । RHO
आता आपण यातील प्रत्येकाची सविस्तर माहिती पाहूया. हे सर्व ग्रीक्स तुम्हाला
UPSTOX च्या मोबाईल अँप मधे पाहायला मिळतील.
डेल्टा । DELTA
अंडरलाईन ॲसेट म्हणजेच स्टॉक किंवा इंडेक्स यांच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलानुसार त्यांच्या विशिष्ट स्ट्राईक प्राईस च्या ऑप्शन प्रीमियम मध्ये किती बदल होऊ शकतो हे दर्शविण्याचे काम डेल्टा करत असतो.
- डेल्टाची किंमत ही 0 ते १ यामध्ये असते.
- कॉल साठी डेल्टा हा धन / पॉझिटिव्ह असतो तर पुट साठी डेल्टा हा ऋण / निगेटिव्ह असतो परंतु त्याचा परिणाम हा एकसारखाच असतो.
आता हे सर्व आपण एका उदाहरणावरून समजून घेऊ हे उदाहरण लक्षात असू द्या बाकी सर्व ग्रीक्स साठी आपण याच उदाहरणाचा संदर्भ घेणार आहोत.
समाजा आता निफ्टीचा भाव १८००० आहे आणि तुमच्या अँनालिसिस
नुसार निफ्टी १८१०० पर्यंत जावू शकते. यानुसार तुम्ही १८००० या ATM ( AT THE MONEY ) स्ट्राईक प्राईस चा कॉल ऑप्शन १०० या प्रिमिअम ला खरेदी केला ज्याचा डेल्टा ०.५० एवढा आहे. आता तीन शक्यता निर्माण होतात. हवे तर बेसिक माहितीसाठी
ऑप्शन ट्रेडिंग विषयीचे दोन्ही लेख अगोदर वाचून घ्या.
- अँनालिसिस नुसार निफ्टी १८१०० ला जाईल .
- अँनालिसिस च्या विरुद्ध निफ्टी १७९०० जाईल .
- निफ्टी मध्ये कोणताही बदल होणार नाही आणि निफ्टी १८००० लाच कायम राहील.
शक्यता १ : निफ्टी ने १८००० ते १८१०० हा १०० पॉईंट चा प्रवास केला आहे म्हणजे तुमच्या कॉल च्या दिशेने मुव्हमेंट झाली आहे. १८००० CE याची किंमत १०० आणि डेल्टा ०. ५० यानुसार,
ऑप्शन च्या प्रिमियम मध्ये होणारी वाढ = अंडरलायिंग ॲसेट ची स्ट्राईक प्राईस च्या दिशेने झालेली मुव्हमेंट X स्ट्राईक प्राईस चा डेल्टा
वाढ = १०० X ०.५०
= ५०
एकुण किंमत = प्रीमियम + वाढ
१०० + ५० = १५०
म्हणजेच सुरवातीला १०० असणारे प्रीमियम आता १५० झाले म्हणजे ऑप्शन खरेदीदाराला ५० पॉईंट चा नफा झाला. हा नफा लॉट साइज नुसार मोजायचा असतो हे मागील लेखात आपण पहिले.
शक्यता २ : निफ्टी ने १८००० ते १७९०० हा १०० पॉईंटचा तुमच्या कॉल च्या विरुद्ध दिशेने प्रवास केलेला आहे म्हणजे यात आता होणारे नुकसान किती असेल
ऑप्शन च्या प्रिमियम मध्ये होणारी घट = अंडरलायिंग ॲसेट ची स्ट्राईक प्राईस च्या विरुद्ध दिशेने झालेली मुव्हमेंट X स्ट्राईक प्राईस चा डेल्टा
प्रीमियम घट = १०० X ०.५०
घट = ५०
एकुण किंमत = सुरवातीचे प्रीमियम - घट
= १०० - ५०
= ५०
म्हणजेच सुरवातीला १०० असणारे प्रीमियम आता ५० झाले म्हणजे ऑप्शन खरेदीदाराला ५० पॉईंटचे नुकसान झाले.
शक्यता ३: यामध्ये निफ्टी मधे कोणताही बदल झाला नाही त्यामुळे डेल्टा नुसार ऑप्शन प्रीमियम मध्ये कोणताही बदल होणार नाही.
यावरून समजलेच असेल कि डेल्टा हा ऑप्शन खरेदी करणाऱ्यास अगोदरच ही माहिती पुरवत असतो कि अंडरलाईन ॲसेट ची किंमत ज्याप्रकारे बदलते ( वाढ किंवा घट ) त्यानुसार ऑप्शन मध्ये कसा बदल होणार आहे. वरती सांगितलेल्या पद्धतीनेच पुट ऑप्शन मध्ये सुद्धा होणारी वाढ किंवा घट काढता येते त्याअगोदर कॉल आणि पुट मधील मुळ फरक समजून घ्या.
डेल्टा विषयी काही महत्वाच्या बाबी :
- कॉल ऑप्शन मध्ये डेल्टा हा सकारात्मक ( + ) असतो.
- पुट ऑप्शन मधे डेल्टा हा नकारात्मक (-) असतो.
- ITM स्ट्राईक प्राईस चा डेल्टा १ च्या जवळ पोहचत असलेला पाहायला मिळतो.
- सर्वसाधारण पणे ATM स्ट्राईक प्राईस चा डेल्टा हा ०.५० च्या आसपास असतो.
- OTM स्ट्राईक प्राईस चा डेल्टा ० च्या जवळ जात असतो.
ऑप्शन खरेदीदाराने शक्यतो ०.५० च्या जवळचा डेल्टा निवडायचा असतो कारण तो ACCELARATION म्हणजे वेगाने वाढण्यास अनुकुल स्तिथीमध्ये काम करत असतो . जास्त OTM चा डेल्टा जो शुन्य ( ०) च्या जवळ गेलेला असतो तो जवळ जवळ मृतप्राय झालेला असतो त्यामुळे त्या स्ट्राईक प्राईस च्या प्रीमियम मधे वाढ होण्याची शक्यता कमी असते. तर याउलट जास्त ITM चा डेल्टा हा स्थिर झालेला असतो .
गॅमा । GAMMA
अंडरलाईन ॲसेट च्या अनुषंगाने डेल्टा मध्ये जो बदल होतो, त्या डेल्टाच्या बदलाचा दर म्हणजे गॅमा होय. ही झाली व्याख्या हे आपण पुन्हा एकदा वरील उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ. वरील उदाहरणांमध्ये १८००० या एट द मनी ( ATM ) स्ट्राइक प्राइस चा कॉल आपण खरेदी केलेला होता, ज्याचा डेल्टा 0.५0 होता. त्यानंतर निफ्टीचा प्रवास १८१०० पर्यंत झाला , म्हणजेच १८००० चा कॉल जो पूर्वी
ऍट द मनी ( ATM ) तो आता इन द मनी (ITM ) झाला आहे. म्हणजे त्याचा डेल्टाही ०.५० वरून वाढवू वरती गेला असेल. आता हा डेल्टा 0.50 वरून कुठपर्यंत आणि कसा जाईल हे ठरवण्याचं काम गॅमा करत असतो. म्हणजेच अंडरलाईन ॲसेट इथे निफ्टी मध्ये जेवढी वाढ होईल आणि त्यावेळेस असणारा गॅमा यांच्या परस्पर संबंधाने डेल्टा मध्ये वृद्धी किंवा घट होत असते. जसे डेल्टा हा ऑप्शन प्रीमियमच्या वाढीस किंवा घटीस कारणीभूत असतो त्याचप्रमाणे गॅमा हा डेल्टा च्या वाढीस किंवा घटीस कारणीभूत असतो आता वरील उदाहरणातील नफा तोटा पुन्हा मांडून पाहू. आता त्यामध्ये गॅमा ०.००२० आहे असे समजूयात.
डेल्टा बदल दर = अंडरलाईन ॲसेट मधे होणारा बदल X गॅमा
= १०० X ०.००२
डेल्टा बदल दर = ०.२
१८१०० येथे १८००० कॉल चा डेल्टा = सुरवातीचा डेल्टा (०.५०) + डेल्टा बदल (०.२) = ०.७
फक्त डेल्टा विचारात घेतला तर अंडरलाईन ॲसेट ( इथे निफ्टी ) मधे १०० पॉईंट चा बदल झाला तर ऑप्शन प्रीमियम मधे ५० पॉईंट चा बदल होणार होता. परंतु जेव्हा डेल्टा बरोबर गॅमा चाही विचार केला गेला तेव्हा ऑप्शन प्रीमियम मधे होणारा बदल हा ७० पॉईंट चा असेल.
- जर अंडरलायिंग ॲसेट चा प्रवास ऑप्शन स्ट्राईक प्राईस च्या दिशेने होत असेल तर गॅमा मुळे होणारा बदल हा सकारात्मक असतो.
- जर अंडरलायिंग ॲसेट चा प्रवास ऑप्शन स्ट्राईक प्राईस च्या विरुद्ध दिशेने होत असेल तर गॅमा मुळे होणारा बदल हा नकारात्मक असतो. म्हणजे दुसरी शक्यता मधे डेल्टा हा ०.५० - ०.२ = ०.३० असेल.
- डेल्टा आणि गॅमा ने ऑप्शन किमती काढण्यासाठी अगोदर टेक्निकल अँनालिसिस विषयी सविस्तर माहीती असणे खूप गरजेचे आहे.
थिटा । THETA
जर इतर सर्व घटक स्थिर असतील तर एखाद्या ऑप्शनचा प्रीमियम प्रत्येक दिवसागणिक किती कमी करावा हे ठरवण्याचे काम थिटा करत असतो. यालाच टाईम डिके असे म्हणतात. ( वेळेनुसार ऑप्शन ची किंमत कमी होत जाणे. )
- जरी अंडरलाईन असेटमध्ये काहीही बदल झाला नाही, तरीही त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऑप्शन चा प्रीमियम एक्सपायरीच्या अनुषंगाने कमी कमी होत जाऊन एक्सपायरीच्या दिवशी फक्त इंट्रेन्सिक व्हॅल्यू शिल्लक राहते. हे संपूर्ण काम थिटा करत असतो . आता हे इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि व्हॅल्यू हे समजून घेण्यासाठी तुम्हाला अगोदरचे दोन्ही भाग समजून घ्यावे लागतील.
- अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर थिटा हे तुमच्या ऑप्शनच्या प्रीमियमला लागलेली वाळवी आहे. जे सतत तुमच्या ऑप्शनच्या प्रीमियमला म्हणजेच किमतीला कमी करत असते.
- वरील उदाहरणात आपण ज्या तीन शक्यता पाहिल्या होत्या त्यातील तिसरी शक्यता ज्यावेळेस असेल त्यावेळेस डेल्टा आणि गॅमा कितीही असला तरी ऑप्शन चा प्रीमियम काही प्रमाणात कमी होईल ही सर्व थिटाची करामत असते.
- एक्सपायरीच्या दिवशी सर्व आउट ऑफ द मनी ( OTM ) ऑप्शनचा प्रीमियम शून्य (०) केला जातो आणि इंन द मनी ( ITM ) ऑप्शन चा प्रीमियम फक्त इंट्रेन्सिक व्हॅल्यू इतकाच शिल्लक राहतो.
- जसे डेल्टा आणि गॅमा हे ऑप्शन खरेदीदाराचे ( OPTION BUYER ) सहाय्यक असतात याउलट थिटा हा ऑप्शन विक्रेत्याच्या ( OPTION SELLER ) बाजूने असतो.
वेगा । VEGA
अंडरलायिंग ॲसेट मधील अस्थिरतेमुळे ( VOLATILITY ) ऑप्शन प्रिमियम मध्ये किती बदल होऊ शकतो हे ठरविण्याचे काम वेगा करत असतो.
OPTION CHAIN मधे तुम्हाला IV विषयी माहिती मिळेल.
- वरती आकृती मधे सूचित केल्याप्रमाणे वेगा हा बाह्य घटकांवर अवलंबून असतो.
- अस्थिरता जितकी जास्त तितकाच वेगा जास्त असतो आणि त्यामुळे ऑप्शन किंमत ही त्याप्रमाणात वाढलेली असते.
- अस्थिरता जितकी कमी तितकाच वेगाही कमी, त्यामुळे ऑप्शन किंमत ही त्याप्रमाणात कमी झालेली असते.
- जास्त वेगा असणे हे ऑप्शन विक्रेत्याला ।OPTION SELLER ला फायदेशीर असते कारण काही काळासाठी त्याना विक्री जास्त प्रीमियम मिळतात.
- कमी वेगा असणे हे ऑप्शन खरेदीदार ।OPTION BUYER साठी लाभदायक असते.
रो । RHO
व्याज दरातील बदलामुळे ऑप्शन वर किती परिणाम होणार आहे हे सर्व रो । RHO वरती अवलंबून असते. जर जोखीम-मुक्त व्याजदरे ( ट्रेजरी-बिल , बॉण्ड्स )* वाढतात किंवा कमी झाले तर ऑप्शनची किंमत किती वाढावी किंवा घटावी हे तुम्हाला सांगते.
- व्याजदरे वाढल्याने, कॉल ऑप्शनचे मूल्य सामान्यपणे वाढेल.
- व्याजदरे वाढल्याने, पुट ऑप्शनचे मूल्य सामान्यपणे कमी होईल.
- या कारणांसाठी, कॉल ऑप्शनचे पॉझिटिव्ह RHO आहे आणि पुट ऑप्शनचे नकारात्मक RHO आहे.
या सर्व ग्रीक्स चा उपयोग योग्य अभ्यासानंतरच होणार आहे त्यामुळे अगोदर बेसिक समजून घ्या आणि नंतरच ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करा. मार्केट मधील रोजच्या उपडेट साठी तुम्ही आपले
MAJHEMARKET YOUTUBE CHANNEL ला भेट देऊ शकता. त्याचबरोबर माहितीसाठी
MAJHEMARKET या TELEGRAME ला भेट द्या.
या लेखाविषयीचा तुमचा अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान आहे. तो तुम्ही आम्हाला कळवाल ही अपेक्षा त्याचबरोबर शेअर मार्केट विषयी अजून कोणती माहिती वाचायला आवडेल हेही कळवावे.
अप्रतिम खूप सुंदर मांडणी केली आहे सर
उत्तर द्याहटवाएक एक वाक्य समजून आणी विचार करून् खूप मेहनत घेऊन तयार केले आहे यासारखी उत्कृष्ट माहिती मी अजून पर्यंत वाचली नाही
तुम्ही घेतलेल्या मेहनतला 100% द्यायला हवेत
धन्यवाद एक🙏🙏 !!!
धन्यवाद🙏🙏 !!!
हटवाखूप उपयुक्त माहिती आहे...
उत्तर द्याहटवालेखणी तर अप्रतिम...
Khup chan mahiti dilit sir...
हटवाधन्यवाद🙏🙏 !!!
हटवाखूप उपयुक्त माहिती आहे..
उत्तर द्याहटवालेखणी ही अप्रतिम...
धन्यवाद🙏🙏 !!!
हटवाएकदम सोपी मांडणी करून समजावले आहे. एकदा वाचून नाही समजणार. Revision करावी लागेल। धन्यवाद सर।
उत्तर द्याहटवाधन्यवाद🙏🙏 !!!
हटवाआभारी आहे सर. तुमच्यामुळे हे सर्व मराठी मध्ये पहिल्यांदा वाचतोय.
उत्तर द्याहटवाधन्यवाद🙏🙏 !!!
हटवाखुप सुंदर व अभ्यासपूर्ण लेख आहे तसेच ऑप्शन ट्रेडिंग करिता खूपच उपयोगी माहिती. धन्यवाद खुप खुप आभार.
उत्तर द्याहटवाधन्यवाद🙏🙏 !!!
हटवाNice information... Read 1st time such kind of information in Marathi ... Keep it up
उत्तर द्याहटवाधन्यवाद🙏🙏 !!!
हटवाNice information
उत्तर द्याहटवाधन्यवाद🙏🙏 !!!
हटवाHELPFUL INFORMATION
उत्तर द्याहटवाएकदम मस्त सर अशी माहिती मला आज पर्यंत मराठी मधे मला कुठेच भेटली नाही तुम्ही हे सर्व मराठी मधे समजेल अशी दिली आहे तुमचे आभार जेवढे मानेल तेवढे कमीच आहेत मी पहिल्या पासून तुम्ही दिलेल्या लेवल प्रमाणे काम करतोय अशीच माहिती देत जावा सर मनापासून आभार सर
उत्तर द्याहटवा