WHAT IS CALL OPTION ( CE) & PUT OPTION ( PE) ? | कॉल ऑप्शन ( CE) आणि पुट ऑप्शन ( PE) म्हणजे काय?

 ऑप्शन ट्रेडिंग | OPTION TRADING 

भाग -2 - कॉल ऑप्शन ( CE) , पुट ऑप्शन ( PE),   डेरिव्हेटिव्ह | DERIVATIVES,  ऑप्शन प्रिमीयम | OPTION PREMIUM, ऑप्शन खरेदी |OPTION BUYING, ऑप्शन विक्री | OPTION SELLING

                     मागील लेखात आपण ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय ? याविषयी माहिती घेतली आहे आता त्याच लेखमालेतील दुसरा भाग यामध्ये आपण ऑप्शनच्या प्रकाराविषयी माहिती घेणार आहोत.

ऑप्शन चे दोन प्रकार असतात 

  1. कॉल ऑप्शन 
  2. पुट ऑप्शन

                  वरील दोन्ही प्रकारच्या ऑप्शन मध्ये खरेदी किंवा विक्री करता येते. ऑप्शन मध्ये काम करणाऱ्या ट्रेडर्सचा नफा किंवा नुकसान याचे गणित हे तो ऑप्शन खरीदार आहे, की विक्रेता आहे यानुसार मांडले जाते. याविषयी आपण पुढे चर्चा करणारच आहोत. या लेखामध्ये फक्त कॉल ऑप्शन ट्रेडिंग आणि पुट ऑप्शन ट्रेडिंग याविषयीची सविस्तर माहिती पाहू.  ऑप्शन ट्रेडिंग समजण्यासाठी अगोदर डेरिव्हेटिव्ह ही संकल्पना समजणे गरजेचे आहे म्हणून थोडक्यात डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे पाहू.

Call & put option
कॉल - पुट ऑप्शन 


डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? | WHAT IS DERIVATIVE 

                  डेरिव्हेटिव्ह म्हणजे अशी वस्तू किंवा मालमत्ता जिची किंमत ही स्वतःवर अवलंबून असत नाही. तर तिची किंमत ही तिच्या मुळ स्रोतावर / मालमत्तेवर अवलंबून असते. डेरिव्हेटिव्ह ला स्वतःची अशी मूळ किंमत असत नाही ते अंडरलाईन असेट वरून किंमत मिळवत ( DERIVE) असतात.   खालील दोन उदाहरणावरून ही संकल्पना समजून येईल, त्यामधील एक हे दैनंदिन जीवनातील उदाहरण आहे तर दुसरे हे शेअर मार्केटची संबंधित आहे.

                              सर्वांच्या दैनंदिन वापरातील महत्त्वाची वस्तू म्हणजे साखर. ही साखर वर्तमानपत्रांमधील मथळ्यात कायम गोड किंवा कडू होत असते. म्हणजेच साखरेची किंमत कमी किंवा जास्त होत असते, बर आता ही किंमत कमी किंवा जास्त होण्यासाठी महत्वाची गोष्ट कारणीभूत असते, ती म्हणजे ऊसाच्या उत्पादनातील सकारात्मक किंवा नकारात्मक बदल होय. ( बाकी ही घटक असतात ते सध्या विचारात घेऊ नका)  यामध्ये ऊस हा साखरेचा मूळ स्त्रोत म्हणजे अंडरलाईन आसेट ( UNDERLYING ASSET) आहे. आणि साखर ही उसाची डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजेच साखरेची किंमत ही उसाच्या किमतीने नियंत्रित केली जाते.

              जगातील सर्वात जास्त ट्रेडिंग हे डेरिव्हेटिव्ह मध्ये होते. यामधील मुख्य प्रकार म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग आणि फ्युचर ट्रेडिंग. भारतात एकूण डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग मधील जवळजवळ 80 टक्के व्यवहार हे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये होतात. आता याच ऑप्शन ट्रेडिंग मधील कॉल ऑप्शन ट्रेडिंग आणि पुट ऑप्शन ट्रेडिंग याविषयी माहिती पाहणार आहोत. ऑप्शन समजण्यासाठी अगोदर कॅण्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय ? हे माहित असायला हवे.

कॉल ( CE) ऑप्शन म्हणजे काय | WHAT IS CALL ( CE ) OPTION ?

  1.  जेव्हा अंडरलाईन आसेटची किंमत वरती जाण्याचा अंदाज असतो आणि त्यासाठी चा ऑप्शन खरेदी केला जातो, त्याला कॉल ऑप्शन म्हणतात.
  2. कॉल ऑप्शन हा तेजीचा संकेतक आहे. 
  3. गणितातील समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण आठवतात का ? तर कॉल ऑप्शन हा अंडरलाईन च्या समप्रमाणात असतो. म्हणजेच अंडरलाईन आसेट ची किंमत वाढली, तर त्या प्रमाणात कॉल ऑप्शन ची किंमत ही वाढते. आसेटची किंमत कमी झाली तर त्याच प्रमाणात कॉल ऑप्शन ची किंमत ही कमी होत जाते. 
  4. कॉल ऑप्शन जरी तेजी दर्शवित असला तरीही कॉल ची विक्री | CALL OPTION SELL करून मंदीची पोझिशन ही बनवता येते.

                   रिलायन्सचा शेअर हा अंडरलाईन आसेट आहे. तर  रिलायन्स ऑप्शन हा झाला डेरिव्हेटिव्ह. जर आत्ता 2500 असलेला रिलायन्स या महिन्यात 2600 जाणार आहे.  असे टेक्निकल अनालिसिस ने समजते. तेव्हा ट्रेडर कडून रिलायन्सचा 2550 चा कॉल ऑप्शन खरेदी केला जातो, ज्याची किंमत आता 20 रुपये आहे ( 20×250 लॉट साईज = 5000) . ही किंमत म्हणजेच प्रिमीयम. पाठी मागील लेखामध्ये जे सदनिकेचे उदाहरण दिले होते. त्याच प्रमाणे इथेही तीन परिस्थिती तयार होतील 1. रिलायन्स एनालिसिस प्रमाणे 2600 ला गेला तर महिन्याच्या शेवटी म्हणजे एक्सपायरी ला ऑप्शन ची किंमत ही शंभर रुपये असेल. म्हणजे यामध्ये प्रीमियम चे वीस रुपये सोडून 30 (30×250 = 7500) रुपये नफा होईल. 2) जर रिलायन्स 2450 पेक्षा खाली राहिला तर जास्तीत जास्त दिलेल्या प्रीमियम एवढे म्हणजेच 5000 एवढे नुकसान होईल.  याप्रकारे रिलायन्स सारखे मोठ्या अंडरलाईन आसेट मध्ये 5000 एवढ्या छोट्याशा रकमेमध्ये तेजीची पोझिशन बनवता आली. जसे की आपण मागील लेखामध्ये ऑप्शन ट्रेडिंग चे फायदे येथे उल्लेख केलेला आहे.

पुट ( PE) ऑप्शन म्हणजे काय ? | WHAT IS PUT ( PE) OPTION ?

  1. जेव्हा एखाद्या अंडरलाईन आसेटची किंमत कमी होते आहे, आणि ऑप्शन ची किंमत वाढत आहे. त्या डेरिव्हेटिव्ह ऑप्शनला पुट ऑप्शन म्हणतात. म्हणजेच जेव्हा अंडरलाईन आसेट आहे ह्या किमतीपेक्षा कमी होणार असा अंदाज असतो तेव्हा पुट ऑप्शन खरेदी केला जातो.
  2. हा मंदी दर्शवणारा ऑप्शन प्रकार आहे.
  3. कॉल ऑप्शनच्या विपरीत पुट ऑप्शन हा अंडरलाईन आसेटच्या किमतीशी व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे अंडरलाईन आसेटची किंमत कमी झाल्यास पुटची किंमत वाढते , याउलट अंडरलाईन आसेटची किंमत वाढल्यास  पुटची किंमत कमी होते.
  4. हा ऑप्शन प्रकार जरी मंदीचा दर्शक असला तरीही पुट विक्री | PUT SELLING  करून कोणत्याही आसेटमध्ये तेजीची पोझिशन बनवता येऊ शकते.

                           वरील उदाहरणात रिलायन्स ची किंमत जर 2500 वरून 2400 जाणार हा अंदाज असेल, तर 2450 चा पुट खरेदी केला जाऊ शकतो. ज्याचा  प्रीमियम 20 ( 20 ×250 लॉट साईज) =5000  असेल. जर एनालिसिस प्रमाणे रिलायन्स 2400 ला गेला तर नफा ( 50 - 20 प्रिमीयम =30×250 = 7500 ) होईल. 2450 च्या वरती राहिला तर दिलेल्या प्रीमियम एवढे नुकसान होईल. 

              हा सर्व व्यवहार हा लॉट साईज प्रमाणे असतो. हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे. गोंधळ होत असेल तर अगोदर लॉट साइज चे ऑप्शन मधील महत्व समजण्यासाठी अगोदर ते वाचून या. वरील उदाहरणातील कॉल साठी 2550 आणि पुट साठी 2450 म्हणजे स्ट्राइक प्राईज होय. महिन्याच्या शेवटच्या गुरुवार म्हणजे एक्सपायरी होय.

ऑप्शन प्रिमीयम म्हणजे काय ? | WHAT IS OPTION PREMIUM ?

           ऑप्शनच्या ज्या किंमतीला खरेदीदार आणि विक्रेता दोन्ही उपलब्ध असतात, त्या किमतीला ऑप्शन प्रिमीयम असे म्हणतात. म्हणजेच अंडरलाईन आसेटच्या एखाद्या स्ट्राइक प्राईस साठी ज्या किमतीवर ऑप्शनची खरेदी-विक्री होऊ शकते, त्या किमतीला त्या स्ट्राइक प्राईज साठीचे प्रिमीयम समजले जाते. ऑप्शन प्रिमीयम मुख्यतः दोन किमतीवर ते अवलंबून असते.

1. इंट्रेंसिक व्हॅल्यू | INTRENSIC VALUE 

2. एक्सट्रेंसिक व्हॅल्यू | EXTRINSIC VALUE 

   ऑप्शन प्रिमीयम विषयाची सविस्तर माहिती पुढील लेखांमध्ये येईल. ऑप्शन मधे ट्रेड करण्यासाठी डिमॅट अकाउंट मधे फ्यूचर अँड ऑप्शन  व्यवहार सुरू करुन घ्यावा लागेल.

Click Open Free demat account - UPSTOX 

Click Open demat account  - ZERODHA 

ऑप्शन ट्रेड | OPTION TRADE

पहिल्या भागामध्ये आपण ऑप्शन मध्ये चार वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेड करता येते हे पाहिले होते आता त्याचे सविस्तर माहिती घेऊ.

 उदाहरण: निफ्टी सध्याला 17000 या किमतीवर  ट्रेड करत आहे.  चार ट्रेडर शिवाजी, अनिल, तेजस आणि प्रमोद यांची ऑप्शन मधील पोझिशन आपण आता समजून घेऊ.

1. शिवाजीने पन्नास रुपये प्रीमियम देऊन 17200 या स्ट्राइक प्राईस चा चालू एक्सपायरी चा कॉल खरेदी केला. 

2.अनिल ने चालू एक्सपायरी चा 17200 या स्ट्राइक प्राईस चा कॉल 50 रुपयाला विकला.

3. तेजस याने 16800 या स्ट्राइक प्राईसचा पुट 50 रुपयाला खरेदी केला.

4. प्रमोदने 16800 या स्ट्राइक प्राईसचा पुट 50 रुपयात विकला.

       ऑप्शन मध्ये ट्रेड करण्याचे मुख्य दोन प्रकार आहेत 

1.ऑप्शन खरेदी | OPTION BUY

                 काही ठराविक प्रिमियम देऊन एका स्ट्राइक प्राईस चे ऑप्शन खरेदी करणे म्हणजे ऑप्शन बाय होय. या ऑप्शन खरेदी करणाऱ्याला ऑप्शन बायर/ खरेदीदार | OPTION BUYER असे म्हणले जाते. ऑप्शन खरेदी करून तेजी किंवा मंदी ची पोझिशन बनवली जाते. वरील उदाहरणात शिवाजी आणि तेजस हे दोघेही ऑप्शन खरेदीदार आहे.

कॉल ऑप्शन खरेदी | CALL OPTION BUYER  

            जे ट्रेडर कॉल ऑप्शन खरेदी करून तेजीचे पोझिशन बनवतात त्यांना कॉल ऑप्शन खरेदीदार म्हणतात. वरील उदाहरणातील शिवाजी हा तेजीचा खरेदीदार आहे. 

पुट ऑप्शन खरेदी  | PUT OPTION BUYER

               जे ट्रेडर पुट ऑप्शन खरेदी करून मंदी ची पोझिशन बनवतात त्यांना पुट ऑप्शन बायर खरेदीदार असे म्हणतात. वरील उदाहरणातील तेजस हा मंदीचा खरेदीदार आहे.

ऑप्शन खरेदी मधील महत्त्वाचे मुद्दे | IMPORTANT FACT IN OPTION BUYER 

  • ऑप्शन खरेदीसाठी प्रीमियम द्यावे लागते. ट्रेडिंग अकाउंट ला प्रीमियम एवढेच रक्कम असेल तरी हा ट्रेड करू शकता.
  • ऑप्शन खरेदीमध्ये अमर्याद / अनलिमिटेड नफा | UNLIMITED PROFIT होऊ शकतो.
  • यामधील जास्तीत जास्त नुकसान हे दिलेले प्रीमियम एवढेच असु शकते.
  • यामध्ये अंडरलाईन आसेटची वाटचाल ही स्ट्राइक प्राईसच्या दिशेनेच व्हायला हवी आणि तीही ठरलेल्या वेळेतच.
  • एक्सपायरी च्या वेळस खरेदी केलेला ऑप्शन इन द मनी | ITM  नसेल तर कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्याचे बंधन ऑप्शन खरेदीदारावर नसते.

2. ऑप्शन विक्री | OPTION SELLER 

     काही ठराविक प्रेमियम घेऊन एका स्ट्राइक प्राईस चे ऑप्शन विकणे म्हणजे ऑप्शन विक्री | ऑप्शन सेलिंग | OPTION SELLING होय. ऑप्शन विक्री करूनही तेजी किंवा मंदीची ट्रेडींग पोझिशन बनवली जाऊ शकते. वरील उदाहरणातील अनिल आणि प्रमोद हे ऑप्शन सेलर आहेत.

कॉल ऑप्शन विक्री | CALL OPTION SELLER

                 यामध्ये कॉल ऑप्शन ची विक्री करून मंदी ची पोझिशन बनवली जाते. वरील उदाहरणातील अनिल ने कॉल ची विक्री करून मंदी ची पोझिशन बनवले आहे. त्याला मंदीचा विक्रेता असेही म्हणतात.

पुट ऑप्शन विक्री | PUT OPTION SELLER

                          यामध्ये पुट ऑप्शन ची विक्री करून तेजीची पोझिशन बनवली जाते. वरील उदाहरणातील प्रमोद पुट विकून तेजीची ट्रेडिंग पोझिशन बनवत आहे. यालाच तेजीचा विक्रेता असे म्हणतात.

ऑप्शन विक्री मधील महत्त्वाचे मुद्दे | IMPORTANT FACT FOR OPTION SELLING

  • यामध्ये ठराविक प्रीमियम स्वीकारले जाते. ऑप्शन विक्री करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट ला प्रीमियम पेक्षा जास्त रकमेची गरज असते. ती ब्रोकर प्रमाणे थोडीफार बदलत असते.
  • ऑप्शन विक्रीमध्ये जास्तीत जास्त नफा हा स्वीकारलेल्या प्रीमियम एवढाच असतो. तर नुकसान हे अमर्याद असू शकते.| LIMITED PROFIT UNLIMITED LOSS
  • यामध्ये अंडरलाईन आसेटची वाटचाल ही तुमच्या स्ट्राइक प्राईस च्या विरुद्ध दिशेने किंवा अंडरलाईन आसेट आहे त्याच जागेवर राहिला तर नफा होतो.
  • ऑप्शन विक्रेत्याला कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करणे बंधनकारक असते.

वरील उदाहरणात जर निफ्टीने 1700 च्या वरती  वाटचाल सुरू केली तर शिवाजी ( buyer) आणि प्रमोद  ( sellar) या दोघांना फायदा होईल.

जर निफ्टीने 17000 खाली वाटचाल सुरू केली तर अनिल ( option sellar  आणि तेजस ( option buyer ) यांना फायदा होईल.

निफ्टी 17000 जवळच राहिली तर प्रमोद ( option sellar ) आणि अनिल ( option sellar )  यांना फायदा होईल.

         वरती दिलेल्या किमती आणि वाटचाल हे फक्त  ऑप्शन खरेदी- विक्री यांचे बेसिक समजण्यासाठी आहे यामध्ये अजून  बर्‍याच गोष्टींची भर पडायचे आहे. जसे की प्रीमियम डीके , टाईम इरोजन,  विविध स्ट्राईक प्राईज म्हणजेच मनिमेस | moneymess,   VI । VOLATILITY INDEX , ऑप्शन चैन, ऑप्शन ग्रीक त्यामुळे लगेच कोणत्याही निष्कर्षावर ती पोहोचू नका.पुढील भागामध्ये आपण विविध स्ट्राईक प्राईज याविषयी माहिती घेऊ.

काही प्रश्न  किंवा सूचना असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता तसेच हा प्रयत्न आवडत असेल तर कमेंट करून आम्हाला प्रोत्साहनही देऊ शकता तसेच इतर माहितीसाठी टेलिग्राम चैनल जॉईन करू शकता मार्केट विषयीच्या रोजच्या अपडेट साठी YOUTUBE  वर भेट देऊ शकता क्रमश...

इतर वाचावे असे काही 

फंड़ामेंटल अनालसिस म्हणजे काय ?


7 टिप्पण्या

  1. आत्तापर्यंत कुठेही न मिळालेली सविस्तर माहिती. 🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. महाशय मी सध्या फक्त इंट्राडे ट्रेडिंग करत आहे मी नवीन आहे आणि माझे शेरखान कडे अकाउंट आहे मला ऑप्शन शिकायचे आहे तुमच्या लेखावरून मला थोडे फार समजले तुम्ही उदाहरणादाखल ऑप्शन ट्रेडिंग चे कॉल ऑप्शन बाय करून सेल केल्याचे एकच उदाहरण सविस्तर सहज समजेल असे लिहा तसेच ब्रोकर कडून लिवरेस घेऊन कॉल ऑप्शन बाय आणि सेल केल्याचे उदाहरण लिहून सांगा

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने