चार्ट पॅटर्न भाग -3 हेड अँड शोल्डर। CHART PATTERN -3 HEAD AND SHOULDER
या अगोदरच्या काही लेखांमध्ये आपण कंटिन्यूएशन चार्ट पॅटर्नमधील फ्लॅग / पेनंट चार्ट पॅटर्न आणि कप अँड हँडल चार्ट पॅटर्न याविषयी माहिती पाहिलेली आहे. यातीलच पुढचा भाग म्हणून रिव्हर्सल चार्ट पॅटर्न प्रकारांमधील हेड अँड शोल्डर आणि इनव्हर्टेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नची माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. ज्यांनी या अगोदरची माहिती वाचलेली नाही ते त्या ठिकाणी भेट देऊन ती वाचू शकतात. त्याच बरोबर आपण काही कॅन्डलस्टिक विषयीची माहिती मराठी मधे दिलेली आहे, त्याच बरोबर टेक्निकल इंडिकेटर भाग 1 आणि टेक्निकल इंडिकेटर भाग-2 विषयीही चर्चा केलेली आहे. अगोदर बेसिक म्हणून ती पहावी म्हणजे या लेखातील पॅटर्न ची माहिती समजायला सोपे जाईल. चार्ट पॅटर्न हा टेक्निकल अनलसिस तसेच प्राईज ॲक्शन समजण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे या गोष्टींची माहिती बेसिक पासून करून घेणे हे प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी गरजेचे आहे. पाठीमागील काही लेखांमध्ये आपण चार्ट पॅटर्न म्हणजे नक्की काय ? कंटिन्यूएशन चार्ट पॅटर्न आणि रिव्हर्सल चार्ट पॅटर्न यातील फरक आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. ती अगोदर वाचून घ्यावी.
हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न | HEAD AND SHOULDER CHART PATTERN
हा एक बेरीश रिव्हरसल चार्ट पॅटर्न आहे. म्हणजेच एखाद्या शेअरमध्ये किंवा इंडेक्स मध्ये चालू असलेल्या तेजीला खंड पडणार असून आता मंदी सुरू होणार असल्याचे संकेत चार्ट वरती हेड अँड शोल्डर पॅटर्न बनल्यानंतर मिळतात. आपले दोन्ही खांदे आणि डोके या आकाराचा हा पॅटर्न दिसत असतो. म्हणूनच याला हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न असे संबोधण्यात येते. यामध्ये तीन वेगवेगळ्या पॅटर्नचे घटक एकत्र येऊन हा पूर्ण हेड अंड शोल्डर चार्ट पॅटर्न बनलेला असतो, यामध्ये डाव्या बाजूचा चार्टला लेफ्ट शोल्डर तर मधील कॅन्डलस्टीकने जो भाग बनतो त्याला हेड तर उजव्या बाजूला कॅन्डल स्टिक मुळे जो भाग बनतो त्यास राईट शोल्डर असे म्हणतात. या सर्वांचा एकत्रित विचार करून या पूर्ण पॅटर्न ला हेड अँड शोल्डर असे नाव देण्यात येते.
हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न कसा बनतो ?
शेअर मध्ये तेजी चालू असताना एका लेवल वरती रेजिस्टन्स बनवून वाढणाऱ्या किमतींना अडथळा निर्माण होतो. त्या ठिकाणावरुन शेअर्सच्या किमती कमी होण्यास सुरुवात होतात, आणि एका ठराविक लेवल वरून किमती पुन्हा वाढायला सुरुवात करतत. ज्या लेवल वरून किमती पुन्हा वाढायला सुरुवात करतात हा पहिला सपोर्ट बनतो. यानंतर किमती वरती जायला सुरुवात करतात. हा आपला लेफ्ट ( डावा) शोल्डर बनलेला आहे. अगोदरच्या रेजिस्टन्स च्या वरती जाऊन शेअरच्या किमती पुन्हा एका रेजिस्टन्स पासून खाली यायला सुरवात करतात. हा चार्ट पॅटर्न मधील हेड बनलेला आहे. पुन्हा पहिल्या सपोर्ट च्या आसपासच सपोर्ट घेऊन वरच्या दिशेने जायला सुरुवात करतात. आता चार्ट पॅटर्नमधील राईट ( उजवा) शोल्डर बनलेला आहे. लेफ्ट शोल्डर चा सपोर्ट आणि राईट शोल्डर चा सपोर्ट या दोघांना जोडणारी एक रेषा आखली जाते त्या रेषेस नेकलाइन असे म्हणतात. त्यानंतर जो लेफ्ट शोल्डरचा रेजिस्टन्स होता त्या ठिकाणावरुन किंवा थोडेफार कमी जास्त किमतीवरून किंमत खाली यायला सुरूवात होते. यावेळेस शेअर्स ची किंमत नेकलाईन ला ब्रेक करते. या प्रकारे पूर्ण हेड शोल्डर चार्ट पॅटर्न बनतो नेकलाइन ब्रेक केल्यानंतर शेअर्समध्ये मंदीला सुरुवात होते.
हेड अंड शोल्डर चार्ट पॅटर्नप्रमाणे विक्री कशी करावी ?
चार्ट वरती हेड अँड शोल्डर पॅटर्न बनल्यानंतर कॅन्डल स्टिक ज्या वेळेस नेकलाइन ला ब्रेक करून नेकलाइन खाली बंद होते त्यानंतरच्या कॅण्डल स्टिक मध्ये विक्री करावी. नेकलाइन ब्रेक करताना वोल्युम मध्ये वाढ होत असेल तर चार पॅटर्न यशस्वितेची शक्यता अधिक असते. नेकलाईन ब्रेक होणाऱ्या कॅण्डल स्टिक मध्ये विक्री करण्याचे टाळावे त्यानंतरच्या कॅन्डल स्टिक मधे मंदीची खात्री ( कन्फर्मेशन कॅण्डल ) होते आणि त्या वेळेसच विक्री करावी.
हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नमध्ये टारगेट आणि स्टॉप लॉस कसा ठरवावा?
नेकलाइन ब्रेक केल्यानंतर कॅन्डल स्टिक मध्ये विक्री केल्यानंतर ज्या कॅण्डल स्टिक ने नेकलाईन ब्रेक केले होती त्या कँडल स्टीकचा सर्वोच्च स्तर ( HIGH) हा किंवा त्यापेक्षा थोडे वरती स्टॉपलॉस असायला हवा. तर टारगेट साठी चार्ट पॅटर्न मधील नेकलाइन आणि हेड यामध्ये जेवढे अंतर आहे तेवढेच अंतर नेकलाइन पासून खालच्या बाजूला मोजावे आणि तिथेच या चार्ट पॅटर्न साठीचे टारगेट असेल.
हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न नुसार विक्री करताना एक गोष्ट नक्की पाळली पाहिजे आणि ती म्हणजे ज्या ठिकाणावरून विक्री करतोय त्याचा आणि टारगेट चा रिस्क रिवॉर्ड रेशो हा योग्य असायला हवा, तरच विक्री करावी अन्यथा विक्री करायचे टाळावे.
हा चार्ट पॅटर्न सर्व टाईमफ्रेम वरती बनतो आणि योग्यप्रकारे कामही करतो ज्या प्रकारातील ट्रेडिंग करायचे आहे, त्यानुसार टाईम फ्रेम वापरून ट्रेड करावा. हेड अंड शोल्डर पॅटरन योग्य पद्धतीने बनवण्यासाठी हेड आणि दोन्ही शोल्डर मध्ये अनुक्रमे कमीत कमी सात ते आठ कॅण्डल स्टिक असाव्यात तरच तो पॅटर्न योग्य मानला जाईल. हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न मध्ये दोन्ही शोल्डर चे रेजिस्टन्स काही प्रमाणात कमी-जास्त असू शकता परंतु हेडचा रेजिस्टन्स/ हाय (HIGH) हा दोन्ही शोल्डरच्या तुलनेत वरतीच/ जास्त असायला हवा.
इंट्रा डे ट्रेड - ट्रेडिंग साठी हेड आणि शोल्डर मध्ये कमीत कमी सात ते आठ कॅण्डल स्टिक असाव्यात.
स्विंग ट्रेड - यामध्ये ट्रेडिंगसाठी हेड आणि शोल्डर मध्ये तीन ते चार आठवड्याचे अंतर असायला हवे
पोझिशनल ट्रेड / मिडीयम टर्म - या प्रकारचे ट्रेडिंगसाठी हेड आणि शोल्डर मधील अंतर तीन ते चार महिन्याचे असेल तर चांगले परिणाम मिळू शकतात.
याप्रकारे हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न चा वापर करू शकता. वरती दिलेले अंतर हे फक्त माहितीसाठी आहे त्यामध्ये अनुभवानुसार कमी जास्त होऊ शकते.
मार्केट मधे सुरवात करणारे डिमॅट विषयी माहिती मराठी मधून याठिकाणी वाचू शकतात शकतात.
इथे 👉 डिमॅट अकाउंट UPSTOX ओपन करू शकता.
तुम्हाला कॅन्डल स्टिक म्हणजे काय? हे जाणुन घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही कॅन्डल स्टिक भाग-1 आणि कॅन्डल स्टिक भाग-2 या ठिकाणी ती मिळवू शकता.
इनव्हर्टेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न | INVERTED HEAD AND SHOULDER CHART PATTERN
नावावरूनच लक्षात येत असेल हा चार्ट पॅटर्न हेड अँड शोल्डर पॅटर्नच्या अगदी विरुद्ध पद्धतीने बनणारा चार्ट पॅटर्न आहे. याची माहिती अगदी थोडक्यात देत आहे तुम्ही ही वरती दिलेल्या माहितीशी जोडून याचे आकलन करू शकता.
- हा एक बुलिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न आहे. म्हणजेच चार्ट वरती हा पॅटर्न बनला तर सुरु असलेल्या मंदीला खंड पडून तेजी सुरू होते.
- लेफ्ट (डावा) शोल्डर, हेड आणि राईट ( उजवा) शोल्डर या सर्वांचा मिळून इनव्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न बनतो.
- लेफ्ट शोल्डरचा रेजिस्टन्स आणि राईट शोल्डर चा रेजिस्टन्स यांना जोडणार्या रेषेला नेकलाइन असे म्हणतात.
- नेकलाइन ला ब्रेक करणाऱ्या कॅण्डल स्टिक नंतरच्या कॅण्डल मध्ये खरेदी करावी आणि स्टॉप लॉस हा नेकलाइन ब्रेक करणाऱ्या कॅण्डल स्टिक चा निम्नस्तर ( LOW) किंवा त्याखाली लावावा.
- इनव्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न चे टारगेट हे नेकलाइन आणि हेड यामध्ये जेवढे अंतर आहे तेवढेच अंतर नेकलाइन पासून वरच्या बाजूला असावे.
- यामध्ये दोन्ही शोल्डर चे निम्नस्तर ( low) थोडेफार कमीजास्त असू शकतात. परंतु हेड चा लो ( low) हा दोन्ही शोल्डर पेक्षा नेहमी खालीच असावा लागतो.
इनव्हर्टेड अँड शोल्डर पॅटर्न मध्येही टाईम फ्रेम चे महत्व हे वरती दिल्याप्रमाणेच असते. ज्या पद्धतीचा ट्रेड करायचा आहे त्याप्रमाणे टाईम फ्रेम चा उपयोग करावा. त्याची सविस्तर माहिती वरती दिलेली आहे.
स्विंग ट्रेड किंवा पोझिशनल, मीडियम टर्म ट्रेड साठी टेक्निकल बरोबरच फंडामेंटल अनालिसिस ची गरज पडते. चार्ट पॅटर्न बरोबर त्याचाही अभ्यास असणे जरुरीचे आहे.
लवकरच आपण या ठिकाणी प्राईस ॲक्शन आणि ऑप्शन ट्रेडिंग याविषयीची बेसिक माहिती घेऊन येणार आहोत. काही शंका किंवा सूचना असेल तर तुम्ही कमेंट करून किंवा आपल्या टेलिग्राम चैनल वरती कळवू शकता. तसेच रोजचे अपडेट ही chanel वर मिळतील.
Ek number Sir
उत्तर द्याहटवाthank you
हटवासर, अजून chart pattern आहेत ना like double top, double bottom etc.ते पण सांगितले तर बरं होईल
उत्तर द्याहटवाsurely .
हटवाthank you
उत्तर द्याहटवा