SHARE MARKET 14 JUNE 2021| शेअर मार्केट 14 जून 2021

 

Stock Market Weekly Prediction 07june - 11JUNE |स्टॉक मार्केट विकली प्रेडिकशन 14 जुन - 18 जुन २०२१|स्टॉक मार्केट साप्ताहिक अंदाज 

PREDICTION 12 :-

07 जुन ते 11 जुन स्टॉक मार्केटचा आढावा : 

           आतापर्यंतचा शेअर मार्केट विषयी अकरावा अंदाज गेल्या आठवड्यात majhemarket.com ने दिलेला होता.  11 अंदाज नंतर दहा अगदी बरोबर आलेले आहेत. गेल्या आठवड्यातील अंदाज हा काहीसा तेजी दर्शविणारा आणि एका ठराविक रेंजमध्ये कामकाज होईल या आशयाचा होता, तोही खरा ठरलेला आहे. मधेच एक दिवस निफ्टी मध्ये अचानक एक तासा मध्ये मोठी पडझड झाली. परंतु तरीही मार्केटने आपण दिलेल्या पहिल्या सपोर्ट वरून पुन्हा वरती यायला सुरुवात झाली. आठवड्याच्या कॅण्डल वर मार्केट हे सकारात्मक बंद होण्यात यशस्वी झाले. मार्केट आपल्या सर्वोच्च स्तरावर असतानाही मार्केट विषयी बुलिश अंदाज व्यक्त करणे थोडे धोक्याचे असते परंतु दिसणारे सर्व टेक्निकल घटक आणि मार्केट विषयीची आकडेवारी जे चित्र मांडत असते ते जसेच्या तसे मांडणे हे माझे मार्केट च्या माध्यमातून आपण  करत असतो. निफ्टी बँक निफ्टी आणि निफ्टी फायनान्स सर्विस यांच्या ज्या लेवल दिसून येत होत्या, त्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि गेल्या दहा वेळेस त्या बरोबर आलेल्या आहेत. सर्व लेख उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता त्यातून मार्केट कडे मार्केट सुरू होण्याअगोदर पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा सकारात्मक नक्कीच होईल. गेल्या आठवड्यात ग्लोबल मार्केट विषयी जो अंदाज व्यक्त केला होता. तोही अगदी बरोबर आलेला आहे तसेच रिलायन्स विषयी ही आपण बरोबर आहोत रिलायन्स विषयी मत व्यक्त करण्याचे कारण की  निफ्टी मधील सर्वात जास्त वेटेज असलेला शेअर आहे.
जे वाचक मार्केटमध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी डिमॅट विषयी सर्व माहिती या लेखात मिळेल. - डिमॅट माहिती मराठी मधे 
Nifty prediction

सर्व संकेत,  टेक्निकल अनालिसिस , काही टेक्निकल इंडिकेटर्स चा  तसेच मार्केटच्या टेक्निकल अनालिसिस मध्ये बनणाऱ्या काही चार्ट पॅटर्नचा अभ्यास करता या वीक साठी मार्केट अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहोत.


मार्केट साठीचे सकारात्मक संकेत:

  1. पाठीमागील आठवडाभरात निफ्टीमध्ये 1% वाढ़ झाली आहे जवळ जवळ पाठीमागील 4 आठवड्यांभरापासून निफ्टी मध्ये वाढ होत आहे.
  2. जून मध्ये परकीय गुंतवणूक दाराचा indian equity  मध्ये कल वाढत आहे. आतापर्यत 15500 करोड  इंडियन मार्केट मध्ये आले आहेत.
  3. अपेक्षेप्रमाणे  रिझर्व्ह  बँकेने तिच्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदर स्थिरच ठेवले. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो दर किमान अशा ४ टक्क्यांवर कायम ठेवत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.
  4.  युएस फेडने 2023 पर्यंत व्याज दर न वाढविण्याचे सांगितले आहे .
  5. यूएस मध्ये स्टिम्युलस पॅकेजचा पैसा लोकांच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खर्च वाढत आहे.उत्पादनांची मागणी वाढत आहे. त्यामुळेच अमेरिकन मार्केट आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन कामकाज करत आहे.
  6. कोविड लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढवण्यासाठी, केंद्रानं  डिसेंबरपर्यंत १२५ कोटी लसींच्या मात्राची केली व्यवस्था केली गेली आहे.
  7. नुकतेच केंद्र सरकारने 18 वर्षावरील लसीकरण पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे शिवाय लसीकरण जोमाने करण्याचा प्रयत्न केंद्र तसेच राज्य सरकारे करत आहेत जसे लसीकरण वाढत जाईल ही बाब मार्केट साठी खूप महत्त्वाची ठरू शकते.
  8. देशात Covid चि स्थिती सुधारत आहे गेल्या आठवड्यात दैनंदिन रुग्ण संख्या लाखाच्या आत मध्ये आहे देश अनलॉक च्या दिशेने वाटचाल करत आहे
  9. जीएसटी (GST) कलेक्शन मे महिन्यात 1.02 लाख करोड झाले आहे, या महिन्यासाठी चे जीएसटी कलेक्शनमध्ये घट जरी झालेली असली (एप्रिल1.41cr) तरी यामध्ये समजून घेण्यासारखा दुसरा पैलू म्हणजे कोरोना मुळे सर्व उद्योगधंदे प्रभावित झाले असताना देखील  जीएसटी गेले काही महिने वाढत चालला आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेत हळू हळू सकारात्मक पणा येत आहे. याचा अर्थ कोरोना मधून बाहेर पडल्यानंतर अर्थव्यवस्था धावायला तयार आहे. हे येणाऱ्या काळात मार्केट साठीचे सर्वात सकारात्मक घटक असू शकतात.
  10. डॉलर इंडेक्स 90.505आहे. हा भारतीय मार्केट साठी फायदेशीर आहे.
  11. भारतीय रुपया 73.23आहे. रुपयाचा भाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत काहीसा वाढला आहे. परंतु एकंदरीत स्थिर असल्याकारणाने आयात-निर्यात खाते स्थिर आहे. त्यामुळे जास्त चढ-उतार न होणे हे मार्केट साठी चांगले संकेत असतात.
  12. रिलायन्स बुलिश झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून कन्सोलिडेशन मध्ये असलेला रिलायन्सने तेजीच्या बाजूचा ब्रेक आऊट दिलेला आहे.निफ्टी मधील सर्वात जास्त भर असलेला रिलायन्स निफ्टी ला वरती घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.
  13. निफ्टी मधील बऱ्याचशा कंपन्यांचे Q4 रिझल्ट संपत आहेत. ते खूपच चांगले येत नसले तरी अपेक्षा कमी असल्याकारणाने अपेक्षे पेक्षा ते बर्‍यापैकी चांगले लागले आहेत.
मार्केट साठीचे नकारात्मक संकेत:

  1. इंडिया वीक्स ( VIX) 14.1एवढा आहे. खाली आला असला तरी सतर्क राहणे गरजेचे आहे.
  2. मार्केटचा पीई (PE) 26.70 एवढा आहे. पीई  दिसायला जरी कमी असला. तरी हा नवीन पद्धतीने मोजण्यात येणारा पीई आहे जर तो जुन्या पद्धतीने ऍडजेस्ट केला तर तो 36-37 च्या आसपास येईल. गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय तो सतत कमी होत आहे. जवळ जवळ सकारात्मक लेवल ला आला आहे.
  3. यु एस 10 इयर बॉंड़ यील्ड ( BOND YEILD) 1.454 एवढा आहे. काही प्रमाणात कमी होत असलेला बॉंड़ यील्ड या लेवल ला स्थिर होण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अमेरिकामध्ये मंदी सद्रुश्य् परिस्थिती जाणवत आहे.  याही आठवड्यात अमेरिकन मार्केट महत्त्वाच्या लेवलला असेल.
  4. अमेरिकेमध्ये बेरोजगारीचे वाढणारे आकडे अमेरिकन मार्केट बरोबरच युरोपियन तसेच अशियन मार्केटवर दबाव निर्माण करत आहेत.
  5. यूएस मध्ये बायडन सरकारने कार्पोरेट टॅक्स 21.28 टक्के पर्यंत वाढवण्याचे निर्णय घेतला आहे. तसेच अतिश्रीमंत लोकांवर रिच टॅक्स लावणार असल्याचे सांगितले आहे. यु एस मधील कॉर्पोरेट गेन टैक्स ( CGT) वाढवण्याची तयारी चालू आहे.परिणामी अमेरिकन  मार्केट या आठवड्यात consolation फेज मध्ये राहण्याची शक्यता आहे.
  6. या आठवड्यासाठी पी सी आर ( PCR) 1.04 एवढा आहे. तर जून  महिन्याचा पीसीआर 1.61 एवढा आहे. मागील आठवड्याचा विचार करता थोडासा वाढलेला दिसून येतो.
  7. Covid-19 साथीच्या तडाख्यात सापडलेल्या चालू आर्थिक वर्षातील देशाचा एकूण विकास दर अंदाज  रिझर्व्ह  बँकेने कमालीचा खाली  आणला आहे.
  8. कोरोना बरोबरच ब्लॅक फंगस ( MUCORMYCOSIS ) चा खूप मोठा धोका उद्भवलेला आहे. यामध्ये मृत्यूदर ही जास्त असल्या कारणाने हा आजार धोकादायक बनला आहे.
  9. टेक्निकली पाहता निफ्टी साठी डाउन-अप रेशो  जवळपास -4 % (nifty upside 1.27% & down side -5.07%)तर बँक निफ्टी साठी जवळपास 1% (upside0.13 & down side -0.13)एवढा आहे. हा रेशो ऑप्शन चैन वरून काढला जातो.
  10. क्रुड ऑईल ही काही प्रमाणात वाढत आहे. त्याचा भाव $72.59 एवढा आहे. 
  11. मे महिन्यात एफ आय आय ( FII) ने  8,427.73 करोडची विक्री केलेली आहे. एप्रिल महिन्यातील विक्री नंतर पुन्हा FII  कडून विक्रीचे आकडे चिंता वाढवणारे आहेत.
  12. जगातील काही  मुख्य रेटिंग एजन्सी भारताचे रेटिंग कमी करण्याची शक्यता आहे. ही एक भारतीय मार्केट साठी चिंताजनक बाब आहे. फिचने तर भारतीय सोवरिन बॉण्डची रेटिंग BBB  केलेली आहे. कदाचित याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून एफ आय आय विक्री करताना दिसत आहे.

14 जून ते 18 जून मार्केट ची दिशा काय असेल ?


                           मार्केट विषयी उपलब्ध असणारा डेटा, काही टेक्निकल अनालिसिस केल्यावर तसेच त्याच्या साथीला असणाऱ्या ग्लोबल आणि आपल्या देशातील घडामोडींचं एकत्रित विचार करता, आपण आठवड्यासाठी दिशा ठरवत असतो. कोरोनाची रुग्ण संख्या ही मार्केट साठी एक चिंताजनक बाब असली तरी, त्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आलेले आहे. याने एक दिलासा मिळाला आहे परंतु त्या बरोबरच ब्लॅक फंगस-व्हाईट फंगस याचा धोका समोर उभा राहिलेला आहे. या सर्वांबरोबर रेटिंग कमी होण्याची संभाव्य शक्यता नाकारता येत नाही व्हॅक्सिनेशन लसीकरण यची गती वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न यावर पुढील दिशा अवलंबून राहील याहि आठवड्यात ग्लोबल मार्केट कडून जास्त तेजीची अपेक्षा नाही कारण ते खूप महत्वाच्या लेव्हल वरती आहेत. महाराष्ट्र व इतर राज्यात एक जून पासून बंधनात काही प्रमाणात शिथीलता आणली आहे थोडक्यात आपण अंशता अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहोत त्याचा सकारात्मक परिणाम उद्योगधंद्यांवरती दिसू लागलेला आहे.

        भारतीय मार्केट  पॉझिटिव्ह ब्रेक आउट देऊन वरती उच्च स्तरावर   बंद झालेले आहे. परंतु नकारात्मक बाबी लक्षात घेता या आठवड्यासाठी तरी 15800 हि लेव्हल खुप महत्वपुर्ण असेल. 

या आठवड्यासाठी मार्केटचा आपला अंदाज अंशता सकारात्मक (SIDEWAYS TO NORMALLY BULLISH) असणार आहे.

निफ्टी 14जुन ते 18जुन अंदाज :


  • पी सी आर ( PCR ) आहे. 1.04
  • निफ्टी चा पी ई ( PE) 26.70  एवढा आहे. हा अजून थोडा खाली येणे गरजेचे आहे. पहिला अंदाज व्यक्त केला होता तेव्हा PE कीती हा खरेदी साठी योग्य आहे याची माहीती दिली आहे.
  • ऑप्शन चैन ओपन इंटरेस्ट (OI) चा विचार केला तर, या आठवड्यासाठी चा ओपन इंटरेस्ट 15900(CE) च्या कॉलवर 2392800   एवढा आहे. तर 16000 च्या कॉल वर (CE) 2990325वर ओपन इंटरेस्ट आहे. तसेच 15800PE वर 2025150तर 15700 PE वर  2496225एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
  • या जुन महिन्याचा विचार करता 16000 CE वर 2464725  तर 16100 CE वर 1411350 आणि 15500 PE वर2778600 तर 15000 PE वर3016125 एवढा ओपन इंटरेस्ट आहे. यातुन या महिन्यासाठी 15000 ते 16000 ही रेंज दिसुन येते.
  • निफ्टीचा बंद भाव हा 15799.35 आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद बंद भाव 15821.15आहे म्हणजेच फ्युचर चा प्रिमीयम  21.8पॉइंट एवढा आहे.

 निफ्टी अपसाईड लेवल :

                निफ्टीने तिच्या बंद भाव 15799.35 पासून वरच्या बाजूला जायला सुरुवात केल्यानंतर पहिला सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स 15900/30 हा आहे, हीच आपली पहिली लेवल आहे.यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर दुसरी लेवल हि 16015/35 असेल, हेच या आठवड्यासाठी चे टारगेट असेल.यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर 16150/16175 ही लेवल  येउ शकते.  शिवाय बँक निफ्टी आणि ग्लोबल मार्केट खुपच सकारात्मक असेल तर 16300 लेवल येऊ शकते परंतु हि शक्यता फारच कमी असेल.

निफ्टी डाउन साईड लेवल : 

                      निफ्टीने तिच्या बंद भावापासून खालच्या बाजूला जायला सुरुवात केली तर पहिलाच महत्त्वाचा सपोर्ट 15700 असेल. जोपर्यंत या खाली एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅन्डल स्टिक त्याच्याखाली बंद झाली तर 15530/15500 असू शकते. जे कि या आठवड्याचे टार्गेट असू शकते. शिवाय खूपच  नकारात्मक बाब समोर आली तर निफ्टी 15440/15400 पर्यंत जाऊ शकते.निफ्टीने पॉझिटिव ब्रे्कआउट दिलेला असला, तरी सध्य स्थिती पाहता खालचेे टारगेट येण्याची शक्यता आहे. परंतु जे डेटामध्येेे दिसतंय तेच देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

NIFTY 50 @ 15799.35

    R1-15900/20   R2 -16015/35-WT     R3- 16150/75

   S1 -
15675/50    S2- 15530/500 WT    S3-15430/400 

बँक निफ्टी 14 जून ते 18 जून अंदाज:

  • बँक निफ्टी या आठवडयात पीसीआर  0.69 आहे. तर महिन्याचा 0.84.
  • बँक निफ्टी चा पीई 24.47 ( PE) 
  • बँक निफ्टी चा बंदभाव 35047.40 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 35164 एवढा आहे म्हणजेच प्रिमीयम116.6 पॉईंट चा आहे.
  • ओपन इंटरेस्ट चा विचार करता या आठवड्यासाठी जे की. 35500 CE कॉल वरती 1269300  तर 36000 कॉल वर 1137600. तर 35000 PE वर 1326225 आणि 34500 PE वर764350  एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
  • जुन महिन्याच्या एक्सपायरी विचार करता 35500 CE वर 473175  आणि 36000 CE वर 5156500  तसेच 35000 PE वर 34400आणि 34000 PE वर 340750 एवढा ओपन इंटरेस्ट आहे.

बँक निफ्टी अप साइड लेवल : 


           बँक निफ्टी ने तिच्या बंद भावापासून 35047.40 पासुन वरती जायला सुरुवात केली तर 35340/60 ही लेवल जि कि मार्केट साठी अतिशय महत्वपुर्ण आहे हि आपली पहिली लेव्हल असेल. यावरती जर एक तासाची कॅण्डल बंद झाली तर   35700ही दुसरी लेवल असेल यावरती 1 दिवस बँक निफ्टी बंद झाली तर 36000 हि लेव्हल येऊ शकते जे कि हे या आठवड्यासाठीचे वरचे टारगेट असेल


बँक निफ्टी डाऊन साइड लेवल : 


            बँक निफ्टी ने तिच्या बंद भावा पासून  35047.40 खाली जायला सुरुवात केली तर पहिला सपोर्ट  34800 ही लेवल असेल. हे या वीक साठीचे टारगेट असेल. 
       जर या खाली एक दिवसाची कॅण्डल बंद झाली, आणि एखादी वाईट बातमी आली तरच 34000 ही लेवल येण्याची शक्यता असेल परंतु याठिकाणी येण्याची शक्यता कमी आहे.

BANK NIFTY @ 35047.40

    R1- 35340/60     R2- 35700/75     R3- 3600/100-WT  

    S1- 34800       S2- 34500/475-WT   S3- 34000 

वरती खूप वेळा कॅन्डल स्टिक चा उल्लेख झालेला आहे जर तुम्हाला कॅन्डल स्टिक विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कॅन्डल स्टिक भाग-1 आणि कॅन्डल स्टिक भाग-2 या ठिकाणी ती मिळवू शकता.

निफ्टी फायनान्स सर्विस 07 जून  ते 11 जून अंदाज:

FTY financial services: @ 16639.40
future @16734.65

R1 - 16775/800   R2- 16925/50 - WT    R3- 16100 

S1 - 16420/400    S2- 16230/200 -WT     S3- 15980/50



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने