STOCK MARKET WEEKLY ANALYSIS 28JUNE TO 1JULY 2021| 28 जून ते 1 जुलै स्टॉक मार्केट अँनालिसिस

 

STOCK MARKET WEEKLY ANALYSIS  28 JUNE TO 1 JULY  2021| 28 जून ते 1 जुलै स्टॉक मार्केट अँनालिसिस|स्टॉक मार्केट साप्ताहिक अंदाज 

PREDICTION 14 :-

21 जुन ते 25 जुन स्टॉक मार्केटचा आढावा : 

            जून मंथली एक्सपायरी साठी व्यक्त केलेला अंदाज बरोबर आलेला आहे. जून सेरीज 15850 चा आसपास बंद होऊ शकते हा अंदाज अगदी बरोबर आलेला आहे. गेल्या 13 पैकी बारा अंदाज बरोबर आलेले आहेत. majhemarket.com या ठिकाणी ते सर्व लेख वाचायला मिळतील काहीशी संदिग्ध सुरुवात या आठवड्याची झाली होती. मार्केट सध्या सर्वोच्च स्तरावर आहे तरीही काहीशा संथ गतीने गेल्या आठवड्यात मार्केटने वरचा प्रवास केलेला आहे. निफ्टी बरोबरच बँक निफ्टी आणि निफ्टी फायनान्स सर्व्हिस यांनीही त्यांचे आठवड्याचे टारगेट पूर्ण केलेले आहे. रिलायन्स विषयीचा अंदाज मात्र चुकलेला आहे. चांगल्या लेवलचा ब्रेक आउट नंतर रिलायन्स एजीएम (AGM) झाल्या पासून खालच्या लेवल पाहत आहे. ग्लोबल मार्केट पुन्हा तेजीत येताना दिसले आहेत. अमेरिकन मार्केट पुन्हा एकदा सर्वोच्च स्तराजवळ आहेत तसेच युरोपियन मार्केटिंग वरच्या दिशेने वाटचाल करताना मागील आठवड्यात दिसले.
नवीन लोक डिमॅट विषयी माहिती मराठी मधून याठिकाणी वाचू शकतात शकतात.
  इथे 👉 डिमॅट अकाउंट UPSTOX ओपन करून ट्रेडिंग सुरू करू शकता.

Majhemarket






सर्व संकेत,  टेक्निकल अनालिसिस , काही टेक्निकल इंडिकेटर्स चा  तसेच मार्केटच्या टेक्निकल अनालिसिस मध्ये बनणाऱ्या काही चार्ट पॅटर्नचा अभ्यास करता या वीक साठी मार्केट अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहोत.

मार्केट साठीचे सकारात्मक संकेत:

  1. देशात तीन महिन्यानंतर प्रथमच नवीन रुग्णांची संख्या 50 हजारांच्या खाली आली आहे.
  2. एकाच दिवसात कोरोना लसींच्या 86 लाख मात्रा देण्याचा विक्रम भारताने प्रस्थापित केलेला आहे यावरून लसीकरणा मध्ये आलेली गती दिसून येत आहे. लसीकरणाने 31 कोटींचा टप्पा पार केला आहे.
  3. आर्थिक वर्ष 2021/22 च्या पहिली तिमाही संपताना डायरेक्ट टॅक्स 1.85 लाख करोड इतके झाले आहे.
  4. जून मध्ये परकीय गुंतवणूक दाराचा indian equity  मध्ये कल वाढत आहे 5848.76 करोड  इंडियन मार्केट मध्ये आले आहेत.
  5. अपेक्षेप्रमाणे  रिझर्व्ह  बँकेने तिच्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदर स्थिरच ठेवले. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो दर किमान अशा ४ टक्क्यांवर कायम ठेवत असल्याचे जाहीर केले.
  6.  युएस फेडने 2023 पर्यंत व्याज दर न वाढविण्याचे सांगितले आहे .
  7.  केंद्र सरकारने 18 वर्षावरील लसीकरण पूर्णपणे मोफत सुरू केलेले आहे. शिवाय लसीकरण जोमाने करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी खाजगी मधे कमी किमती मधे लस उपलब्ध होत आहे.
  8. देशात Covid चि स्थिती सुधारत आहे , देश अनलॉक च्या दिशेने वाटचाल करत आहे.
  9. जीएसटी (GST) कलेक्शन मे महिन्यात 1.02 लाख करोड झाले आहे, जुन चे आकडे अजुन सकारात्मक येण्याची अपेक्षा आहे.
  10. डॉलर इंडेक्स 91.797 आहे. हा भारतीय मार्केट साठी फायदेशीर आहे.
  11. बुलिश  असलेला रिलायन्स. गेल्या दोन  दिवसांपासून बेअरिश असला तरी तो केव्हाही तेजीच्या दिशेने वाटचाल करू शकतो.निफ्टी मधील सर्वात जास्त भर असलेला रिलायन्स निफ्टी ला वरती घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.
  12. FII ने सतत दोन महिने विक्री केल्यानंतर जूनमध्ये 3162 करोड  खरेदीचे आकडे दिलासा देणारे वाटताहेत. DII ने सलग तिसऱ्या महिन्यात खरेदी दर्शविलेली आहे.

मार्केट साठीचे नकारात्मक संकेत:


  1. इंडिया वीक्स ( VIX) 13.37 एवढा आहे.कमी जास्त होत असला तरी सतर्क राहणे गरजेचे आहे.
  2. मार्केटचा पीई (PE) 26.67 एवढा आहे. 
  3. यु एस 10 इयर बॉंड़ यील्ड ( BOND YEILD) 1.443 एवढा आहे. 
  4. अमेरिकेमध्ये बेरोजगारीचे सतत वाढून येणारे आकडे अमेरिकन मार्केट बरोबरच युरोपियन तसेच अशियन मार्केटवर दबाव निर्माण करत आहेत.
  5. भारतीय रुपया 74.22 आहे. याने चालू खात्यावर दबाव येऊ शकतो.
  6. crude oil $76.12 वर आले आहे. या वाढत जात असलेल्या किमती भारतीय मार्केट साठीची धोक्याची घंटा होऊ शकते.
  7. या आठवड्यासाठी पी सी आर ( PCR) 0.97 एवढा आहे. तर जूलै महिन्याचा पीसीआर 1.39 एवढा आहे. 
  8. Covid-19 साथीच्या तडाख्यात सापडलेल्या चालू आर्थिक वर्षातील देशाचा एकूण विकास दर अंदाज रिझर्व्ह  बँकेने   खाली  आणला आहे.
  9. Covid-19 चा धोका कमी होत असतानाच नवीन डेल्टा प्लस व्हेरीअंट मुळे चिंता पुन्हा वाढत आहेत. काही ठिकाणी निर्बंध लावण्यास सुरुवात झाली आहे.
  10. टेक्निकली पाहता निफ्टी साठी डाउन-अप रेशो  जवळपास -6.14 % तर बँक निफ्टी साठी जवळपास -0.57 %एवढा आहे. हा रेशो ऑप्शन चैन वरून काढला जातो.
  11. या आठवडय़ात खासकरून FII आणि DII यांच्या खरेदी विक्रीवर मार्केटचि दिशा बदलू शकते.

28 जून ते 01 जुलै स्टॉक मार्केट ची दिशा काय असेल ?

              या आठवड्यापासून जुलैची मंथली सिरीज सुरू होत आहे. यासाठी सकारात्मक आणि नकारात्मक घटकांबरोबरच रोल ओवर किती प्रमाणात झाले आहेत, हेही तितकेच महत्त्वाचे असते. निफ्टी मध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत काही प्रमाणात कमी म्हणजेच 91 लाख कॉन्ट्रॅक्ट रोलो ओवर झाले आहेत. म्हणजे मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात वाढण्यासाठी मार्केटला संधी आहे .कोरोना रुग्णसंख्या मध्ये घट दिसून येत आहे परंतु नवीनच डेल्टा प्लस व्हेरीअँट  यांचा धोका वाढताना दिसत आहे. या सर्वां बरोबरच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडिया विक्स (vix) हा बारा तेराच्या जवळ आलेला आहे, तो पुन्हा वाढण्याची शक्यता आहे त्याबरोबरच मार्केटमध्ये चढ-उतार तीव्र होऊ शकतात. परंतु मार्केट सर्वोच्च स्तरावर आहे त्यामुळे मंदीच्या दिशेला मोठी मोव्हमेंट होऊ शकते. यासाठी तयार राहायला हवे या आठवड्यात खूप मोठी मंदी होईल असे संकेत सध्या तरी नाहीत. परंतु 16000 ते 16200 यामध्ये कुठेतरी करेक्शन पुढील काही दिवसात येऊ शकते. या आठवड्यात निफ्टी पेक्षा बँक निफ्टी मध्ये जास्त तेजी दिसत आहे. मार्केटमध्ये वरती थोडीच जागा शिल्लक असल्याचे संकेत मिळत आहेत करेक्शन साठी काहीतरी बातमी किंवा फंडामेंटल याची साथ लागेल. या मंथली सिरीज चा ऑप्शन डेटा पाहता 15000 ते 16500 ही रेंज दिसून येत आहे या सेरिज पासून निफ्टी लॉट साइज 75 वरुन 50 होत आहे हे लक्षात घ्यावे.
हे सर्व लक्षात घेता आणि टेक्निकल चार्ट आणि ऑप्शन चैन अनालिजिस केल्यानंतर या आठवड्याचा अंदाज हा...
कन्सोलिडेशन ते काहीसा सकारात्मक असा असेल CONSOLIDATION TO SLIGHTLY BULLISH 

निफ्टी 28 जुन ते 01 जुलै  अंदाज :


  • पी सी आर ( PCR ) 0.97 आहे. 
  • निफ्टी चा पी ई ( PE)   26.67 एवढा आहे.
  • ऑप्शन चैन ओपन इंटरेस्ट (OI) चा विचार केला तर, या आठवड्यासाठी चा ओपन इंटरेस्ट 16000(CE) च्या कॉलवर  3189750 एवढा आहे. तर 16200 च्या कॉल वर (CE) 2500500 ओपन इंटरेस्ट आहे. तसेच 15800PE वर 2428875 तर 15700 PE वर 2444400 एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
  • निफ्टी साठी मंथली सिरीज चा विचार करता 16000 चा कॉल वर 1672700 तर 16500 कॉल वर 1713450 एवढा ओपन इंटरेस्ट आहे. त्याचबरोबर 15500 PE  वर 2598650 तर 15000 PE वर 2460500 एवढा इंटरेस्ट आहे.
  • निफ्टीचा बंद भाव हा 15860.35 आहे, तर निफ्टी फ्युचर चा बंद बंद भाव 15880 आहे. म्हणजेच फ्युचर चा प्रिमीयम 19.65 पॉइंट एवढा आहे.

 निफ्टी अपसाईड लेवल :


                निफ्टीने तिच्या बंद भाव  15860.35 पासून वरच्या बाजूला जायला सुरुवात केल्यानंतर पहिला सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स 15920/30  हा आहे, हीच आपली पहिली लेवल आहे. यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर दुसरी लेवल हि 16025/50 येउ शकते हेच या आठवड्यासाठी चे टारगेट असेल. यावर एक दिवस बंद झाले तर 16200 लेवल येऊ शकते. 

निफ्टी डाउन साईड लेवल : 


      निफ्टीने तिच्या बंद भावापासून खालच्या बाजूला जायला सुरुवात केली तर पहिलाच महत्त्वाचा सपोर्ट 15730/700 असेल  जोपर्यंत या खाली एक तासाची किंवा एक दिवसाचि कॅन्डल स्टिक  बंद होत नाही तोपर्यंत मार्केट बुलिश आहे. जर त्याखाली बंद झाले, तर 15570/50 हि लेवल येऊ शकते, जे या आठवड्याचे टार्गेट असू शकते. खाली एक दिवस बंद झाले तर 15450 हा भाव येऊ शकतो, हा 
  अता मार्केट साठी बॉटम चे काम करत आहे. याखाली दुसरा बॉटम 15100/150 च्या जवळ येत आहे.
जे डेटामध्येेे दिसतंय तेच देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

NIFTY 50 @ 15860.35

    R1-15920/30   R2 -16020/40-WT     R3- 16200

   S1 -
15775/50    S2- 15570/50 WT    S3-1548/50 


बँक निफ्टी 28 जून ते 01 जुलै अंदाज:

  • बँक निफ्टी या आठवडयात पीसीआर 1.09 आहे. तर जुलै  महिन्याचा 1.06 आहे.
  • बँक निफ्टी चा पीई 24.25 ( PE) आहे.
  • बँक निफ्टी चा बंदभाव 35364.65 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 35471 एवढा आहे.  म्हणजेच 106.25 प्रिमीयम पॉईंट चा आहे.
  • ओपन इंटरेस्ट चा विचार करता या आठवड्यासाठी जे की. 35500 CE कॉल वरती 896050  तर 36000 कॉल वर 1086475. तर 35000 PE वर 1114050 आणि 34500 PE वर 812075  एवढा ओपन इंटरेस्ट आहे. 
  • जुलैच्या मंथली सेरिजचा विचार करता 36000 च्या कॉल वर 376900 एवढा ओपन इंटरेस्ट आहे. तर 36500 कॉलवर 2678000 एवढा ओपन इंटरेस्ट आहे. याच बरोबर 35000 PE  वर 291425 तर 34000 PE वर 335025 एवढा ओपन इंटरेस्ट आहे.

बँक निफ्टी अप साइड लेवल : 



           बँक निफ्टी ने तिच्या बंद भावापासून 35364.35 पासुन वरती जायला सुरुवात केली, तर 35700/50 या ठिकाणी पहिला रेजिस्टंस आहे, ही पहिली लेवल असेल. यावर 1 तास किंवा 1 दिवस बंद झाले तर  36150/200 ही लेवल भेटू शकते जे कि हे या आठवड्यासाठीचे वरचे टारगेट असेल. यावरती 1 दिवस बँक निफ्टी बंद झाली तर 36700 हि लेवल येऊ शकते.


बँक निफ्टी डाऊन साइड लेवल : 



            बँक निफ्टी ने तिच्या बंद भावा पासून खाली जायला सुरुवात केली तर पहिला सपोर्ट  35070/30 ही लेवल असेल.
जर या खाली एक दिवसाची कॅण्डल बंद झाली, तर 34970/30 ही लेवल येण्याची शक्यता असेल. हे या वीकचे  खालचे टार्गेट असेल. याखाली 1 दिवसांची कॅन्डल स्टिक बंद झाली तर 34700 ही लेवल येवू शकते. परंतु 35000 हे लेवल बँक निफ्टी साठी मोठा सपोर्ट चे काम करेल.

BANK NIFTY @ 35364.35

    R1- 35700/50    R2- 36150/200-WT    R3- 36600/700  

    S1- 35075/25       S2- 34975/25-WT   S3- 34700 

वरती खूप वेळा कॅन्डल स्टिक चा उल्लेख झालेला आहे जर तुम्हाला कॅन्डल स्टिक विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कॅन्डल स्टिक भाग-1 आणि कॅन्डल स्टिक भाग-2 या ठिकाणी ती मिळवू शकता.

निफ्टी फायनान्स सर्विस 28 जून ते 01 जुलै अंदाज :

FTY financial services: @ 16722.35
future @16768.70

R1 - 16800/25   R2- 17000/25 - WT    R3- 17150 

S1 - 16580/50    S2- 16375/50 -WT     S3- 15250/200



फ्लॅग चार्ट पॅटर्न आणि कप अँड हँडल चार्ट पॅटर्न विषयी मराठी मधून माहिती वाचू शकता.
डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 👉 DEMAT ACCOUNT 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने