Stock Market Weekly Prediction 07june - 11JUNE |स्टॉक मार्केट विकली प्रेडिकशन 07 जुन - 11 जुन २०२१|स्टॉक मार्केट साप्ताहिक अंदाज
PREDICTION 11 :-
31 मे ते 04 जुन स्टॉक मार्केटचा आढावा :
मार्केट साठीचे सकारात्मक संकेत:
- अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बँकेने तिच्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदर स्थिरच ठेवले. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो दर किमान अशा ४ टक्क्यांवर कायम ठेवत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.
- युएस फेडने 2023 पर्यंत व्याज दर न वाढविण्याचे सांगितले आहे .
- यूएस मध्ये स्टिम्युलस पॅकेजचा पैसा लोकांच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खर्च वाढत आहे.उत्पादनांची मागणी वाढत आहे. त्यामुळेच अमेरिकन मार्केट आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन कामकाज करत आहे.
- लसीकरण हे कोरोना घालवण्यासाठी आणि मार्केटच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचं आहे. 18 वर्षावरील लसीकरण जोमाने करण्याचा प्रयत्न केंद्र तसेच राज्य सरकारे करत आहेत याचा वेग वाढणे गरजेचे आहे तसेच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.जसे लसीकरण वाढत जाईल ही बाब मार्केट साठी खूप महत्त्वाची ठरू शकते.
- देशात Covid चि स्थिती सुधारत असून देश अनलॉक च्या दिशेने वाटचाल करत आहे.
- जीएसटी (GST) कलेक्शन मे महिन्यात 1.02 लाख करोड झाले आहे, या महिन्यासाठी चे जीएसटी कलेक्शनमध्ये घट जरी झालेली असली (एप्रिल1.41लाख cr) तरी यामध्ये समजून घेण्यासारखा दुसरा पैलू म्हणजे कोरोना मुळे सर्व उद्योगधंदे प्रभावित झाले असताना देखील जीएसटी गेले काही महिने वाढत चालला आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेत हळू हळू सकारात्मक पणा येत आहे. याचा अर्थ कोरोना मधून बाहेर पडल्यानंतर अर्थव्यवस्था धावायला तयार आहे. हे येणाऱ्या काळात मार्केट साठीचे सर्वात सकारात्मक घटक असू शकतात.
- डॉलर इंडेक्स 90.13आहे. हा भारतीय मार्केट साठी फायदेशीर आहे.
- भारतीय रुपया 72.89आहे. रुपयाचा भाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत काहीसा वाढला आहे. परंतु एकंदरीत स्थिर असल्याकारणाने आयात-निर्यात खाते स्थिर आहे. त्यामुळे जास्त चढ-उतार न होणे हे मार्केट साठी चांगले संकेत असतात.
- रिलायन्स बुलिश झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून कन्सोलिडेशन मध्ये असलेला रिलायन्सने तेजीच्या बाजूचा ब्रेक आऊट दिलेला आहे.निफ्टी मधील सर्वात जास्त भर असलेला रिलायन्स निफ्टी ला वरती घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.
- निफ्टी मधील कंपन्यांचे Q4 रिझल्ट संपत आहेत. ते खूपच चांगले येत नसले तरी अपेक्षा कमी असल्याकारणाने अपेक्षे पेक्षा ते बर्यापैकी चांगले लागले आहेत.
- निफ्टीचा बंद भाव 15670.25 हा आहे. तर निफ्टी फ्युचर चा बंद भाव हा 15699आहे म्हणजेच 28.75 पॉईंटचा प्रीमियम आहे. हा प्रीमियम हा मार्केट साठी सकारात्मक संकेत आहे.
- मे महिन्यामध्ये डी आय आय ( DII) ने 15582.80करोडची खरेदी केलेली आहे.
मार्केट साठीचे नकारात्मक संकेत:
- इंडिया वीक्स ( VIX) 15.94एवढा आहे.
- मार्केटचा पीई (PE) 27.32 एवढा आहे. पीई दिसायला जरी कमी असला. तरी हा नवीन पद्धतीने मोजण्यात येणारा पीई आहे जर तो जुन्या पद्धतीने ऍडजेस्ट केला तर तो 36-38 च्या आसपास येईल. गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय तो सतत कमी होत आहे. जवळ जवळ सकारात्मक लेवल ला आला आहे.
- यु एस 10 इयर बॉंड़ यील्ड ( BOND YEILD) 1.583 एवढा आहे. काही प्रमाणात कमी होत असलेला बॉंड़ यील्ड या लेवल ला स्थिर होण्याचा प्रयत्न करत आहे.
- अमेरिकेमध्ये बेरोजगारीचे वाढणारे आकडे अमेरिकन मार्केट बरोबरच युरोपियन तसेच अशियन मार्केटवर दबाव निर्माण करत आहेत.
- यूएस मध्ये बायडन सरकारने कार्पोरेट टॅक्स 21.28 टक्के पर्यंत वाढवण्याचे निर्णय घेतला आहे. तसेच अतिश्रीमंत लोकांवर रिच टॅक्स लावणार असल्याचे सांगितले आहे. यु एस मधील कॉर्पोरेट गेन टैक्स ( CGT) वाढवण्याची तयारी चालू आहे.परिणामी अमेरिकन मार्केट या आठवड्यात consolation फेज मध्ये राहण्याची शक्यता आहे.
- 4-5 हे दोन मुद्दे गेल्या दोन तीन आठवड्यापासून सतत येत आहे. मार्केट ने या दोन्ही वरती रिअक्शन दिलेली आहे. परंतु हे मुद्दे अजूनही पूर्णत्वाला गेले नाहीत, ते कधीही निर्णय होऊ शकतात आणि पुन्हा मार्केट मध्ये त्या अनुषंगाने बदल होऊ शकतो म्हणून पुन्हा पुन्हा देत आहोत.
- या आठवड्यासाठी पी सी आर ( PCR) 0.99 एवढा आहे. तर जून महिन्याचा पीसीआर 1.59 एवढा आहे.
- Covid-19 साथीच्या तडाख्यात सापडलेल्या चालू आर्थिक वर्षातील देशाचा एकूण विकास दर अंदाज रिझर्व्ह बँकेने कमालीचा खाली आणला आहे.
- कोरोना बरोबरच ब्लॅक फंगस ( MUCORMYCOSIS ) चा खूप मोठा धोका उद्भवलेला आहे. यामध्ये मृत्यूदर ही जास्त असल्या कारणाने हा आजार धोकादायक बनला आहे.
- टेक्निकली पाहता निफ्टी साठी डाउन-अप रेशो - 1% (nifty upside 2.11% & down side -4.28%)तर बँक निफ्टी साठी -(upside0.59 & down side -0.59)एवढा आहे. हा रेशो ऑप्शन चैन वरून काढला जातो.
- क्रुड ऑईल ही काही प्रमाणात वाढत आहे. त्याचा भाव $71.63 एवढा आहे.
- मे महिन्यात एफ आय आय ( FII) ने 8,427.73 करोडची विक्री केलेली आहे. एप्रिल महिन्यातील विक्री नंतर पुन्हा FII कडून विक्रीचे आकडे चिंता वाढवणारे आहेत.
- जगातील काही मुख्य रेटिंग एजन्सी भारताचे रेटिंग कमी करण्याची शक्यता आहे. ही एक भारतीय मार्केट साठी चिंताजनक बाब आहे. फिचने तर भारतीय सोवरिन बॉण्डची रेटिंग BBB केलेली आहे. कदाचित याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून एफ आय आय विक्री करताना दिसत आहे.
7 जून ते 11 जून मार्केट ची दिशा काय असेल ?
मार्केट विषयी उपलब्ध असणारा डेटा, काही टेक्निकल अनालिसिस केल्यावर तसेच त्याच्या साथीला असणाऱ्या ग्लोबल आणि आपल्या देशातील घडामोडींचं एकत्रित विचार करता, आपण आठवड्यासाठी दिशा ठरवत असतो. यावेळेस जून महिन्यासाठीची मंथली सिरीज बरोबर मान्सून हंगाम चालू होत आहे. त्यामुळे मे महिन्यातील किती रोल ओवर झालेला आहे हा एक घटक लक्षात घेऊन दिशा ठरवावी लागते. कोरोनाची रुग्ण संख्या ही मार्केट साठी एक चिंताजनक बाब असली तरी, त्यामध्ये गेल्या 1/2आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आलेले आहे. याने एक दिलासा मिळाला आहे परंतु त्या बरोबरच ब्लॅक फंगस-व्हाईट फंगस याचा धोका समोर उभा राहिलेला आहे. या सर्वांबरोबर रेटिंग कमी होण्याची संभाव्य शक्यता नाकारता येत नाही व्हॅक्सिनेशन लसीकरण यची गती वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न यावर पुढील दिशा अवलंबून राहील या आठवड्यात ग्लोबल मार्केट कडून जास्त तेजीची अपेक्षा नाही कारण ते खूप महत्वाच्या लेव्हल वरती आहेत. महाराष्ट्र व इतर राज्यात एक जून पासून बंधनात काही प्रमाणात शिथीलता आणली आहे थोडक्यात आपण अंशता अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहोत त्याचा सकारात्मक परिणाम उद्योगधंद्यांवरती दिसू शकतो.
भारतीय मार्केट पॉझिटिव्ह ब्रेक आउट देऊन वरती उच्च स्तरावर बंद झालेले आहे. परंतु नकारात्मक बाबी लक्षात घेता या आठवड्यासाठी तरी 15660 हि लेव्हल खुप महत्वपुर्ण असेल.
या आठवड्यासाठी मार्केटचा आपला अंदाज थोडासा सकारात्मक (SIDEWAYS TO SLIGHTLY BULLISH) असणार आहे.
निफ्टी 7 जुन ते 11जुन अंदाज :
- पी सी आर ( PCR ) आहे. 1.59
- निफ्टी चा पी ई ( PE) 27.32 एवढा आहे. हा अजून थोडा खाली येणे गरजेचे आहे. पहिला अंदाज व्यक्त केला होता तेव्हा PE कीती हा खरेदी साठी योग्य आहे याची माहीती दिली आहे.
- ऑप्शन चैन ओपन इंटरेस्ट (OI) चा विचार केला तर, या आठवड्यासाठी चा ओपन इंटरेस्ट 16000(CE) च्या कॉलवर 3053775 एवढा आहे. तर 15700 च्या कॉल वर (CE) 3451500 वर ओपन इंटरेस्ट आहे. तसेच 15600PE वर 1997850 तर 15500 PE वर 2627775 एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
- या जुन महिन्याचा विचार करता 16000 CE वर 2668950 तर 15700 CE वर 975825 आणि 15200 PE वर1816800 तर 15000 PE वर 3349800 एवढा ओपन इंटरेस्ट आहे. यातुन या महिन्यासाठी 15000 ते 16000 ही रेंज दिसुन येते.
- निफ्टीचा बंद भाव हा 15670.25 आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद बंद भाव 15699आहे म्हणजेच फ्युचर चा प्रिमीयम 28.75पॉइंट एवढा आहे.
निफ्टी अपसाईड लेवल :
निफ्टीने तिच्या बंद भाव 15670.25 पासून वरच्या बाजूला जायला सुरुवात केल्यानंतर पहिला सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स 15760/80 हा आहे, हीच आपली पहिली लेवल आहे. यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर दुसरी लेवल हि 15825/45 येउ शकते हेच या आठवड्यासाठी चे टारगेट असेल. शिवाय बँक निफ्टी आणि ग्लोबल मार्केट खुपच पॉसिटीव्ह झाली तर 16000 हा सर्वोच्च स्तर निफ्टी प्राप्त करू शकते. निफ्टी 16000 पर्यत पोहोचण्याची या आठवडयात तरी शक्यता कमीच आहे.
निफ्टी डाउन साईड लेवल :
निफ्टीने तिच्या बंद भावापासून खालच्या बाजूला जायला सुरुवात केली तर पहिलाच महत्त्वाचा सपोर्ट 15430/40 जो कि या आठवड्याचे टार्गेट असू शकते. जोपर्यंत या खाली एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅन्डल स्टिक त्याच्याखाली बंद होत नाही, तोपर्यंत खालची लेवल येण्याची शक्यता कमी आहे.
नकारात्मक बाब समोर आली तर निफ्टी 14950/14970 पर्यंत जाऊ शकते.निफ्टीने पॉझिटिव ब्रे्कआउट दिलेला आहे त्यामुळे खालचेे टारगेट येण्याची शक्यता कमी आहे. परंतु जे डेटामध्येेे दिसतंय तेच देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
NIFTY 50 @ 15670.25
S1 -15550/25 S2- 15430/400 WT S3-14950/70
बँक निफ्टी 7 जून ते 11जून अंदाज:
- बँक निफ्टी या आठवडयात पीसीआर 0.64 आहे. तर महिन्याचा 0.83.
- बँक निफ्टी चा पीई 24.86 ( PE)
- बँक निफ्टी चा बंदभाव 35291.65 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 35535 एवढा आहे म्हणजेच प्रिमीयम 273.35 पॉईंट चा आहे.
- ओपन इंटरेस्ट चा विचार करता या आठवड्यासाठी जे की जुन् महिन्याची सुरवात आहे. 35500 CE कॉल वरती 1522025 तर 36000 कॉल वर 1132700. तर 35000 PE वर 705525 आणि 34500 PE वर 868600 एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
- जुन महिन्याच्या एक्सपायरी विचार करता 35500 CE वर 229125 आणि 35700 CE वर 374900 तसेच 35000 PE वर 235625आणि 34000 PE वर 257000 एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
बँक निफ्टी अप साइड लेवल :
बँक निफ्टी डाऊन साइड लेवल :
निफ्टी फायनान्स सर्विस 07 जून ते 11 जून अंदाज:
महत्वाच्या बाबी:
एक जून पासून नवीन लागू झालेल्या मार्जिन नियमाप्रमाणे कामकाज सुरू झाले आहे त्यामुळे मार्केटमधील वोल्युम वर काही प्रमाणात परिणाम दिसून येऊ शकतो त्यावरतीही लक्ष असू द्यावे. सप्टेंबर मध्ये पूर्णपणे मार्जिन बंद होणार आहे त्यानुसार आपल्या ट्रेडिंग मध्ये बदल करायला सुरुवात करावी म्हणजे या नवीन नियमाप्रमाणे कामकाजाची सवय होईल.