Stock Market Weekly Prediction 17 - 21 MAY 2021 |स्टॉक मार्केट विकली प्रेडिकशन 17 - 21 मे २०२१
PREDICTION 08 :-
10 मे ते 14 मे मार्केटचा आढावा :
10 मे ते 14 मे हा आपण दिलेला सातवा आठवड्यासाठी चा अंदाज होता. आपला अंदाज हा साईडवेज ( SIDEWAYS) याचा अर्थ शेअर मार्केट ची दिशा एका रेंज मध्ये काम करणारी असेल असा होता. तो अगदी बरोबर आलेला आहे. पाठीमागील आठवड्याचा बंद भाव आणि या शुक्रवारचा बंद व्हावा यांची जर तुलना केली तर ती फक्त 146 पॉइंट येते. ग्लोबली शेअर मार्केटमध्ये खूप चढ-उतार होऊनही आपले मार्केट एका ठरावीक रेंज मध्येच काम करत राहिले. माझेमार्केट च्या अंदाजाप्रमाणे अगदी पहिला सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोन्ही लेवल लाही मार्केट मे तोडले नाही. बँक निफ्टी विषयी बोलायच तर बँक निफ्टी नेही रेजिस्टन्स तर ब्रेक केला नाहीच परंतु दुसरा सपोर्ट आणि आठवड्यासाठी चे खालचे टार्गेट दिले होते बरोबर त्या ठिकाणी जाऊन सपोर्ट घेतलेला दिसतो आणि बंदही त्याच्या आसपासच आहे. तिसरा इंडेक्स निफ्टी फायनान्स सर्विसेसही आपल्या पहिल्या सपोर्ट च्या आसपासच बंद झालेला दिसेल यांनीही आपला रेजिस्टन्स तोडलेला नाही. रिलायन्स विषयी कन्सोलिडेशन पोलीस हाा अंदाज होत रिलायन्स फक्त पाच अंक पॉझिटिव्हह बंद दिलेला आहे. गेल्या सात अंदाजा पैकी आपला एकही अंदाज चुकीचा ठरलेला नाही. तो चुकणारच नाही असा आमचा दावाा नाही. डेटा प्रमाणे ज्या गोष्टी मार्केट संबंधित दिसतात त्या आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. आपण नेहमी मार्केटच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करतोय अगदी तंतोतंत कोणत्याही लेवल येण्याची शक्यता खूपच कमी असते आणि तसा दावाही कुणी करू नये म्हणूनच मार्केट ची दिशा आणि त्याप्रमाणे जाण्यासाठी दोन्ही बाजूच्या लेवल दिल्या जातात. ज्या ठिकाणी संधी मिळेल त्याप्रमाणेे ट्रेड करावा मार्केटशी भांडून नाहीतर मैत्री करूनच नफाा कमावला जाऊ शकतो.
सर्व संकेत, टेक्निकल अनालिसिस , काही टेक्निकल इंडिकेटर्स चा तसेच मार्केटच्या टेक्निकल अनालिसिस मध्ये बनणाऱ्या काही चार्ट पॅटर्नचा अभ्यास करता या वीक साठी मार्केट अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहोत.
मार्केट साठीचे सकारात्मक संकेत:
- आरबीआयकडून अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत सी पी आय ( CPI) 4% एवढा आहे 6% च्या वरती जात नाही तोपर्यंत मार्केट साठी ते फायदेशीर आहे.
- युएस फेडने 2023 पर्यंत व्याज दर न वाढविण्याचे सांगितले आहे . परंतु गेल्याच आठवड्यात अमेरिकन अर्थव्यवस्था ओवरहीटेड आहे त्यामुळे व्याजदराचा विचार करावा लागेल या अनुषंगाने चे निवेदन अमेरिकेत आले होते. ते पुन्हा मागेही घेण्यात आले. त्यामुळे अमेरिकन मार्केट काही प्रमाणात पडले निवेदन मागे घेण्याच्या घोषणेनंतर मार्केट मध्ये पुन्हा तेजी दिसून आली.
- यूएस मध्ये स्टिम्युलस पॅकेजचा पैसा लोकांच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खर्च वाढत आहे.उत्पादनांची मागणी वाढत आहे. त्यामुळेच युएस मार्केट बुलिश आहे. आणि ते आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन कामकाज करत आहे.
- लसीकरण हे कोरोना घालवण्यासाठी आणि मार्केटच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचं आहे. 18 वर्षावरील लसीकरण जोमाने करण्याचा प्रयत्न केंद्र तसेच राज्य सरकारे करत आहेत याचा वेग वाढणे गरजेचे आहे तसेच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.जसे लसीकरण वाढत जाईल ही बाब मार्केट साठी खूप महत्त्वाची ठरू शकते.
- जीएसटी (GST) कलेक्शन एप्रिल साठी 1.41 लाख करोड झाले आहे. हे ऐतिहासिक उच्च कलेक्शन आहे. मेच्या तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करताना आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या महिन्यासाठी चे जीएसटी कलेक्शनमध्ये घट होऊ शकते याचा मार्केटला अंदाज येत आहे यामध्ये समजून घेण्यासारखा दुसरा पैलू म्हणजे कोरोना मुळे सर्व उद्योगधंदे प्रभावित झाले असताना जीएसटी गेले काही महिने वाढत चालला आहे. ( मार्च 1.21 लाख कोटी) म्हणजेच अर्थव्यवस्थेत काहीतरी सकारात्मक पणा येत आहे. याचा अर्थ कोरोना मधून बाहेर पडल्यानंतर अर्थव्यवस्था धावायला तयार आहे. हे येणाऱ्या काळात मार्केट साठीचे सर्वात सकारात्मक घटक असू शकतात.
- डॉलर इंडेक्स 90.287 आहे. हा भारतीय मार्केट साठी फायदेशीर आहे.
- भारतीय रुपया 73.28 आहे. रुपयाचा भाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत काहीसा वधारला आहे. परंतु एकंदरीत स्थिर असल्याकारणाने आयात-निर्यात खाते स्थिर आहे. त्यामुळे जास्त चढ-उतार न होणे हे मार्केट साठी चांगले संकेत असतात.
- रिलायन्स कन्सोलिडेशन ते बुलिश राहण्याची शक्यता आहे. जाहीर झालेला Q4 चा रिझल्ट हा रिलायन्स साठी अतिशय उत्तम होता. मागील वर्षाच्या तुलनेत 129 टक्के एवढी वाढ रिलायन्सने नोंदवलेली आहे. निफ्टी मधील सर्वात जास्त भर असलेला रिलायन्स निफ्टी ला वरती घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.
- निफ्टी मधील बऱ्याचशा कंपन्यांचे Q4 रिझल्ट येत आहेत. ते खूपच चांगले येत नसले तरी अपेक्षा कमी असल्याकारणाने अपेक्षे पेक्षा ते बर्यापैकी चांगले लागत आहे. त्यामुळे हा एक मार्केट साठी चांगला संकेत आहे.
- निफ्टीचा बंद भाव 14677.80 हा आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद भाव हा 14717.50 आहे म्हणजेच 39.70 पॉईंटचा प्रीमियम आहे. हा प्रीमियम हा मार्केट साठी सकारात्मक संकेत आहे
- मे महिन्यामध्ये झालेल्या वीक मधे डी आय आय ( DII) ने 891 करोडची खरेदी केलेली आहे. ही खरेदी खूप जास्त नाही परंतु आकडे खरेदीचे असणे केव्हाही चांगलेच
मार्केट साठीचे नकारात्मक संकेत:
- इंडिया वीक्स ( VIX) 20.26 एवढा आहे.
- मार्केटचा पीई (PE) 29.79 एवढा आहे. पीई दिसायला जरी कमी असला. तरी हा नवीन पद्धतीने मोजण्यात येणारा पीई आहे जर तो जुन्या पद्धतीने ऍडजेस्ट केला तर तो 38-40 च्या आसपास येईल. गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय तो सतत कमी होत आहे.
- यु एस 10 इयर बॉंड़ यील्ड ( BOND YEILD) 1.635 एवढा आहे.काही प्रमाणात कमी होत असलेला बॉंड़ यील्ड या आठवड्यात अचानक खूप वरती गेला आहे.
- अमेरिकेमध्ये बेरोजगारीचे वाढणारे आकडे अमेरिकन मार्केट बरोबरच युरोपियन तसेच अशियन मार्केटवर दबाव निर्माण करत आहेत.
- यूएस मध्ये बायडन सरकारने कार्पोरेट टॅक्स 21.28 टक्के पर्यंत वाढवण्याचे निर्णय घेतला आहे. तसेच अतिश्रीमंत लोकांवर रिच टॅक्स लावणार असल्याचे सांगितले आहे.
- यु एस मधील कॉर्पोरेट गेन टैक्स ( CGT) वाढवण्याची तयारी चालू आहे. 5-6 हे दोन मुद्दे गेल्या दोन तीन आठवड्यापासून सतत येत आहे. मार्केट ने या दोन्ही वरती रिअक्शन दिलेली आहे. परंतु हे मुद्दे अजूनही पूर्णत्वाला गेले नाहीत, ते कधीही निर्णय होऊ शकतात आणि पुन्हा मार्केट मध्ये त्या अनुषंगाने बदल होऊ शकतो म्हणून पुन्हा पुन्हा देत आहोत.
- या आठवड्यासाठी पी सी आर ( PCR) 0.68 एवढा आहे. तर मे महिन्याचा पीसीआर 1.51 एवढा आहे. आठवड्यासाठी चा पी सी आर जरी काहीसा सकारात्मक असला तरी मेचा पीसीआर जास्त असल्याकारणाने आपण याला नकारात्मक संकेत मधे ठेवला आहे. परंतु या दोघांच्या तील फरक पाहिला तर जास्त नकारात्मक प्रभाव पडणार नाही असे दिसते
- पुन्हा या आठवड्यासाठी ही सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे तो म्हणजे कोरोना रुग्णसंख्या कालच्या आकडेवारीनुसार देशामध्ये प्रति दिवस 3,44,000 रुग्णसंख्या पोहोचलेली आहे तर दररोज 4000 पर्यंत मृत्यू कोरोनामुळे देशात होत आहे. गेल्या काही दिवसातील ही संख्या जरी कमी वाटत असले तरीही अजून हि खूप जास्त आहे.
- Covid-19 व्हॅक्सिनेशन मध्ये पुन्हा अडथळे येतान दिसतायत, बऱ्याच ठिकाणी 18 वर्षावरील जे लसीकरण सुरू केले होते ते स्थगित करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे लसीकरणाचे उद्दिष्ट वरती खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. लसीकरणाची गती ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होती, त्या प्रमाणात वाढ झालेली नसली तरी काही प्रमाणात लसीकरण चालू झालेले आहे.
- महाराष्ट्र मध्ये 1जुन पर्यंत प्रतिबंध वाढवण्यात आलेले आहेत, तर इतर काही राज्य प्रतिबंध वाढवत आहेत हा मार्केट साठी सर्वात मोठा नकारात्मक बिंदू आहे.
- टेक्निकली पाहता निफ्टी साठी अपडाउन रेशो -0.82 तर बँक निफ्टी साठी -2.61 एवढा आहे. बँकनिफ्टी साठी ही सर्वात जास्त चिंताजनक बाब आहे बँकनिफ्टी मधे अपसाईड पेक्षा डाउन साईड खूप जास्त दिसत आहे.
- क्रुड ऑईल ही काही प्रमाणात वाढत आहे. त्याचा बंद भाव $68.83 एवढा आहे. अगोदरच वाढलेल्या तेलाच्या किमतीत यामुळे वाढ होऊन भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात फटका बसू शकतो.यावर लक्ष असु दया.
- मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एफ आय आय ( FII) ने 8713 करोडची विक्री केलेली आहे. एप्रिल महिन्यातील विक्री नंतर पुन्हा FII कडून विक्रीचे आकडे चिंता वाढवणारे आहेत.
17 मे ते 21 मे मार्केट ची दिशा काय असेल ?
मार्केट विषयी उपलब्ध असणारा डेटा, काही टेक्निकल अनालिसिस केल्यावर तसेच त्याच्या साथीला असणाऱ्या ग्लोबल आणि आपल्या देशातील घडामोडींचं एकत्रित विचार करता, आपण आठवड्यासाठी दिशा ठरवत असतो. गेल्या काही दिवसापासून मार्केट साठी सर्वात महत्त्वाचे असणारी बाब म्हणजे covid-19 रुग्ण संख्या, हे काही प्रमाणात कमी होताना दिसते. यामध्ये खुप हुरळून जाण्यासारखे असे काही नाही कारण आपल्या देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी ज्या कडे सर्वजण अपेक्षेने पाहत होते, ते म्हणजे लसीकरण आणि त्यामध्ये खूप अडथळे येताना दिसत आहे. याला सरकार कसे सामोरे जाते यावर कोरोना नियंत्रणाचे भविष्य अवलंबून आहे. अमेरिकेत वाढणारे बेरोजगारीचे आकडे हे एक मार्केट साठी चिंताजनक कारण आहे. त्याचा दबाव सरलेल्या आठवड्यात काही प्रमाणात पाहायला मिळाला. बॉंड़ मध्ये तीव्र वाढ दिसून आली. अजून पर्यंत तरी मार्केट वरती जास्त परिणाम न करणारी एक गोष्ट म्हणजे इजराइल- फिलिस्तीन युद्ध तसा तर याचा जास्त परिणाम होण्याची शक्यता नाही परंतु ओआयसी ( OIC) यासंदर्भात काय पावले उचलते याचा परिणाम दिसू शकतो. अरब देशांमध्ये अशांतता असल्यास भारतातील तेलाच्या किमती वरती प्रभाव पडू शकतो. सर्वांच्यात एक सकारात्मक बाब भारतात अजूनही काही व्हॅक्सिन्स येण्यासाठी मान्यता मिळत आहे.
या आठवड्यासाठी मार्केटचा आपला VIEW BEARISH TO SIDEWAYS असणार आहे.
निफ्टी 17 मे ते 21 मे अंदाज :
- पी सी आर ( PCR ) 0.68 आहे. मार्केटची ओवरसोल्ड स्थिती दाखवत आहे.
- निफ्टी चा पी ई ( PE) 29.79 एवढा आहे. हा अजून थोडा खाली येणे गरजेचे आहे.पहिला अंदाज व्यक्त केला होता तेव्हा PE कीती हा खरेदी साठी योग्य आहे याची माहीती दिली आहे.
- ऑप्शन चैन ओपन इंटरेस्ट (OI) चा विचार केला तर, या आठवड्यासाठी चा ओपन इंटरेस्ट 15000 च्या कॉल (CE) वर 3427950 एवढा आहे. तर 14900 च्या कॉल (CE) वर 2854125 तर 15500 CE 4808625 ओपन इंटरेस्ट आहे. तसेच 14600 PE वर 1875225 तर 14500 PE 1877400 आणि 14000 PE 2053275 एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
- मे महिन्याचा ओपन इंटरेस्ट पाहिला तर 15000 कॉल वर 2847075 आहे. तसेच 14500 पुट वर 2667825 तर 14000 पुट वर 4185750 हा आहे. मागच्या आठवड्याशी पडताळून पहा.
- ओपन इंटरेस्ट (OI) वरुन 15000 हा रेजिस्टंस तर 14000 हा सपोर्ट ही 1000 पॉइंट ची रेंज या महिन्याच्या बंद साठी दिसत आहे.
- निफ्टीचा बंद भाव हा 14677.80 आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद बंद भाव 14717.50 आहे म्हणजेच फ्युचर चा प्रिमीयम 39.7 पॉइंट एवढा आहे.
- अपसाईड लेवल : निफ्टीने तिच्या बंद भाव 14677.80 पासून वरच्या बाजूला जायला सुरुवात केल्यानंतर पहिला सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स 14860/80 हा आहे. हीच आपली पहिली लेवल आहे यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर आपली दुसरी लेवल 15075/100 ही येऊ शकते. हेच या वीक साठी टारगेट येत आहे. मध्ये 14 970 हा गेल्या आठवड्यातील सर्वोच्च स्तर निफ्टी साठी एक छोटा रेजिस्टन्स चे काम करू शकतो.
- डाउन साईड लेवल : निफ्टीने तिच्या बंद भावापासून खालच्या बाजूला जायला सुरुवात केली तर तिचा पहिलाच महत्त्वाचा सपोर्ट 14600 हा असेल जोपर्यंत एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅन्डल स्टिक त्याच्याखाली बंद होत नाही तोपर्यंत खालची लेवल येण्याची शक्यता कमी आहे. दुसरी लेवल 14470/50 ही असण्याची शक्यता आहे. नकारात्मक बाब समोर आली तर निफ्टी 14250/200 पर्यंत जाऊ शकते. हीच या आठवड्यासाठी चे खालचेे टारगेट असू शकते. समजून घेण्याची गोष्ट म्हणजे 14200 हा निफ्टी साठी खूपच महत्त्वाचा सपोर्ट आहे. तो सपोर्ट जर तोडला गेला तर निफ्टी मध्ये अजून चारशे ते पाचशे पॉईंट ची मंदी येऊ शकते.
- NIFTY 50 @ 14677.80
S1 - 14600 S2- 14475/50 S3- 14250/200 - WT
बँक निफ्टी 17 ते 21 मे अंदाज:
- बँक निफ्टी पीसीआर या वीक साठी 0.62 तर मंथली 1.05 आहे.
- बँक निफ्टी चा पीई ( PE) 22.43 एवढा आहे.
- बँक निफ्टी चा बंदभाव 32169.55 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 32202.9 एवढा आहे म्हणजेच प्रिमीयम 33.45 पॉईंट चा आहे.
- ओपन इंटरेस्ट चा विचार करता या आठवड्यासाठी 32500 CE कॉल वरती 1028650 तर 33000 कॉल वर 976075. तर 31500 PE वर 560625 आणि 31000 PE वर 774475 ओपन इंटरेस्टआहे.
- मे महिन्याचा ओपन इंटरेस्ट 33000 कॉलवर 395575 आहे. तसेच 33500 कॉल वर 235600 आहे.तर 32000 पुट वर 323475 तसेच 31000 PE 232075 हा ओपन इंटरेस्ट तुम्ही मागच्या वीकशी पडताळून पहा बऱ्याच बाबी लक्षात येतील.
- बँक निफ्टी अप साइड लेवल : बँक निफ्टी ने तिच्या बंद भावापासून 32169.55 पासुन वरती जायला सुरुवात केली तर पहिला रेजिस्टन्स 32450/500 ही लेवल असेल. यावरती जर एक तासाची कॅण्डल बंद झाली तर 33075/125 ही दुसरी लेवल असेल आणि हे या आठवड्यासाठीचे वरचे टारगेट असेल. या वरती जर एक तासाची किंवा एक दिवसाची कॅण्डल स्टिक बंद झाली तर 33700/775 ही लेवल येण्याचीही शक्यता आहे परंतु ती कमी आहे.
- बँक निफ्टी डाऊन साइड लेवल : बँक निफ्टी ने तिच्या बंद भावा पासून 32169.55 खाली जायला सुरुवात केली, तर पहिला सपोर्ट 31775/725 या लेवल वरती आहे. जर या खाली एक तासाची कॅण्डल बंद झाली. तर दुसरी लेवल 31125/050 ही असेल . हे या वीक साठीचे टारगेट असेल आणि जर या खाली एक दिवसाची कॅण्डल बंद झाली, आणि एखादी वाईट बातमी आली तरच 30200 ही लेवल येण्याची शक्यता असेल परंतु याठिकाणी येण्याची शक्यता फार कमी आहे.
- BANK NIFTY @ 32169.55
S1- 31775/725 S2- 31125/050- WT S3- 30200
वरती खूप वेळा कॅन्डल स्टिक चा उल्लेख झालेला आहे जर तुम्हाला कॅन्डल स्टिक विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कॅन्डल स्टिक भाग-1 आणि कॅन्डल स्टिक भाग-2 या ठिकाणी ती मिळवू शकता.
निफ्टी फायनान्स सर्वीस 17 ते 21 मे अंदाज:
NIFTY financial services: @ 15412.35
future @15441
R1 - 15600/25 R2- 15800/850 - WT R3- 16000
S1 - 15275 S2- 15000 S3- 14750/800-WT
महत्त्वाच्या बाबी:
या सर्व या आठवड्या साठीच्या लेवल आहे. गेल्या एक महिन्यापासून मार्केट एका रेंज मध्ये काम करत आहे, मागील आठवड्याचा अंदाज व्यक्त करतानाही याचा उल्लेख आला होता. सर्व परिस्थिती पाहता मार्केटलाा वरती जाण्यात अडचण आहे. 15000 ते 15100 या लेवल वरून मार्केट पुन्हा खााली येत आहे. आणि 14200 ही लेवल राखण्याचा प्रयत्न करत आहे.परंतु ती कमजोर बनत असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ट्रेडिंग करताना सावध व्हावे. होल्डिंग किंवा स्विंग ट्रेडिंग साठी घेतलेल्या स्टॉक चे स्टॉपलॉस ट्रेल करत चला आणि हिट झाल्यावर बाहेर पडा. वरती रेजिस्टन्स ब्रेक केल्यावर पुन्हा खरेदी करता येईल किंवा खाली सपोर्ट ला आल्यानंतर खरेदी करा. प्रत्येक ट्रेड करताना रिस्क रिवॉर्ड रेशो तपासून पहा. गेल्या काही दिवसापासून मेटल तसेच काही कमोडिटी संबंधित शेअर मध्ये खूप तेेजी पाहायला मिळाली. चीनमध्ये कमोडिटी मार्जिन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मेटल मध्ये स्टॉपलॉस वर लक्ष असल्यास बरे. पुन्हा पुन्हा यासाठी साावध करतोय की मार्केट वरती गेले तर चांगलेच आहे. परंतु खालची रेंज ब्रेक केले तर नफा बुक केलेला असावा. आठवड्याच्या मध्ये होणाारे बदल याविषयी आपण टेलिग्राम चैनल वर अपडेट करत असतो तुम्ही तिथे भेट देऊ शकत किंवा फेसबुक वर आपल्या पेजला लाईक करू शकता. नवीन लोकांसाठी डिमॅट ची सर्व माहिती या अगोदरच्या लेखांमध्ये आपण उपलब्धध करून दिलेली आहे ज्यांना आवश्यकता वाटते त्यांनी तिथेे भेट दयावेे.
DISCLAIMER : वरील सर्व एनालिसिस दिसणार्या डेटा वरून केलेले आहे मार्केटमध्ये चढ-उतार होऊ शकतात त्यामुळे खरेदी किंवा विक्री करताना तुमच्या फायनान्शिअल ॲडव्हायझर चा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.